मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IT क्षेत्रात DevOps आणि API ला आहे प्रचंड मागणी; यात करिअर कराल तर लाईफ सेट; इथे मिळेल माहिती

IT क्षेत्रात DevOps आणि API ला आहे प्रचंड मागणी; यात करिअर कराल तर लाईफ सेट; इथे मिळेल माहिती

DevOps API

DevOps API

नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्याचं काम करणाऱ्यांसाठी ही कौशल्यं अत्यंत मूलभूत आणि तरीही अत्यावश्यक अशी कौशल्यं मानली जातात.

मुंबई, 18 जुलै:   कल्पना करा की एखादा सुंदर बंगला आहे; पण त्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधाच नाहीत किंवा तो कोणत्याही रस्त्याशी जोडलेला नाही, तर मग तो कसा दिसत असेल किंवा तिथे काय काम होत असेल? अगदी हीच गोष्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला (Software development) लागू पडते. कोणत्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरची क्षमता वाढवण्यासाठी आणि त्याचं कार्य सुरळीत व्हावं यासाठी डेव्हलप्ड सॉफ्टवेअर (Developed Software) अन्य एखाद्या योग्य/अनुरूप सॉफ्टवेअरला जोडलं जाणं आवश्यक आहे. सॉफ्टवेअर क्लाउड सर्व्हिसेसशी प्लग इन करणं, त्यांचा समन्वय करणं किंवा सॉफ्टवेअरचं व्यवस्थापन करणं यासाठी जे कौशल्य आवश्यक असतं ते API आणि DevOps म्हणून ओळखले जाते. नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्याचं काम करणाऱ्यांसाठी ही कौशल्यं अत्यंत मूलभूत आणि तरीही अत्यावश्यक अशी कौशल्यं मानली जातात. या लेखामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधली API आणि DevOps ची भूमिका (role of devops in software development cycle) याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ या. DevOps म्हणजे काय? DevOps ही संकल्पना डेव्हलपमेंट (development) आणि ऑपरेशन्स (operations) या दोन शब्दांची मिळून बनलेली आहे. याचा अर्थ कोणतंही कार्य पूर्ण करण्यासाठी एखाद्या संस्थेच्या अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट (application development) आणि आयटी ऑपरेशन्स (IT operations) टीममध्ये असलेले सहयोगी प्रतिनिधित्व आणि सामायिक दृष्टिकोन असा होतो. अन्य शब्दांत सांगायचं, तर DevOps एखाद्या संस्थेतल्या विविध ग्रुपमधला संवाद, सहयोग, एकत्रीकरण आणि ऑटोमेशन वाढविण्यास प्रोत्साहन देते. सतत कार्यप्रवाह उपलब्ध करून देऊन सॉफ्टवेअरचा वेग आणि गुणवत्ता वाढविणं हे DevOps Pipeline चं मूलभूत उद्दिष्ट आहे. त्याशिवाय या पाइपलाइन्समुळे सुसंगत विकसनशील वातावरण आणि आणि ऑटोमेशन प्रक्रियेबरोबरच कार्यक्षम, पारदर्शक आणि सुरक्षित वितरण प्रक्रियेची खात्री असते. मुंबईतील NITIE ला IIM चा दर्जा देण्यासाठी विधेयक मांडलं जाणार DevOps टीम व्यावसायिक गरजेनुसार तांत्रिक प्रकल्पांचे आराखडे करून डेव्हलपर्स आणि सिस्टीम प्रशासन यांच्यामध्ये विश्वास आणि एकसंधता निर्माण करते आणि सांस्कृतिक बदल घडविते. उत्पादनाच्या पायाभूत सुविधांवरच्या नियंत्रणात सुधारणा घडविण्यासाठी डेव्हलपर्सना सक्षम बनविणं आणि उत्पादनाचं वातावरण (Production environment) समजून घेण्यावर ही टीम लक्ष केंद्रित करते. API म्हणजे काय? API म्हणजे अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (Application Programming Interface). प्रोग्रामिंग कोडचे सेट किंवा दोन अ‍ॅप्लीकेशन्सना एकमेकांशी संवाद साधण्यात किंवा दोन सॉफ्टवेअर प्रोडक्ट्समधलं ट्रान्समिशन करण्यास सक्षम करणारं सॉफ्टवेअर मध्यस्थ (intermediary) म्हणजे API असं आपण म्हणू शकतो. या डेटा हस्तांतरणाचे नियम आणि अटीही यात अंतर्भूत असतात. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्ही मेन्यू बघून तुम्हाला हवं ते मागवता तसंच APIचं ही आहे. म्हणजे त्या मेन्यूकार्डमधली डिशेसची नावं तुम्हाला डेटा अर्थात माहिती पुरवतात आणि तिथलं किचन ही त्या ऑर्डर पाळणारा सिस्टीमचा भाग आहे. आता API हा तो मध्यस्थ आहे जो संदेश देणारा म्हणजेच मेसेंजर आणि किचनमधला दुवा म्हणून काम करतो आणि ती विनंती घेतो किंवा मेन्यूमधून ऑर्डर करतो आणि किचनमध्ये ती डिश तयार करायला सांगतो. अर्थात, इथे किचनमध्ये ती डिश कशी तयार होते हे जाणून घेणं हे तुमच्यासाठी गरजेचं नाही; पण किचनमध्ये त्यांचं काम केलं जातं आणि तुम्ही ऑर्डर केलेली डिश तुम्हाला मिळते. त्याचप्रमाणे API मध्येही ऑपरेशन्स म्हणजेच कार्यांची यादी आणि त्याची सविस्तर माहिती असते. ही माहिती कशा प्रकारे वापरली जाते हे जाणून घेतल्याशिवायही डेव्हलपर्स ती वापरू शकतात. डेव्हलपरही आवश्यक ते कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे असलेली माहिती APIला देऊ शकतात. API हा आता अनेक संस्थांच्या महसूल प्रणालीचा किंवा आर्थिक उत्पन्नाचा (revenue system) एक गरजेचा आणि मौल्यवान भाग बनला आहे. गुगल, अ‍ॅमेझॉनसारख्या, तसंच अन्य कंपन्या त्यांची वैशिष्ट्यं आणि कार्यं स्वत: विकसित करतात, त्यांच्यासाठी API तयार करतात आणि ते इतरांना वापरासाठी विकतात आणि अशा प्रकारे त्यातून पैसे मिळवतात. DevOps मध्ये API चे महत्त्व रॅपिड डिप्लॉयमेंटसाठी कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी DevOps पुरेसं नाही. API आणि DevOps हे नेहमी हातात हात घालूनच असतात. DevOps च्या कार्यामध्ये, त्यांच्या प्रक्रियेत API महत्त्वाची भूमिका बजावतं आणि API चं व्यवस्थापन जास्तीत जास्त होण्याच्या प्रक्रियेत मदत करते. उत्पादित झालेल्या गोष्टीत API एकत्रित केलं गेलं, तर त्यामुळे DevOps मधून जास्तीत जास्त मूल्य मिळवण्यात संस्थांना मदत होते. त्याशिवाय या एकत्रिकरणामुळे ही कार्यं त्यांना पुन्हा पुन्हा करता येतात. API चा एकापेक्षा अनेक प्रकल्पांमध्ये पुनर्वापर करण्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होते. त्यामुळे सातत्य राहतं आणि नावीन्यही मिळतं. API मुळे ऑटोमेशन शक्य होतं, सुसंगती, सातत्य निर्माण होतं आणि त्यामुळे पैशांचीही बचत होते. यामुळे मानवी चुका टाळून ऑटोमेशन स्वीकारून ऑपरेशन्समध्ये कार्यक्षमता साधण्यात संस्थांना मदत होते. प्रत्येक वेळी कार्य करताना API त्याच सुसंगतीने, क्षमतेने कार्य करतं. त्यामुळे ऑपरेशनची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढते. API वर आधारित सिस्टीम्स प्रक्रियेबद्दलच्या दृष्टिकोनातून ऑटोमेशनबाबतचा दृष्टिकोन अगदी पटकन स्वीकारतात. API चा वापर संस्था त्यांच्या सिस्टीम बांधणीसाठी करू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या अ‍ॅप्लिकेशन्समधून निर्माण झालेल्या मोठ्या प्रमाणातल्या डेटावर प्रक्रिया करू शकतात आणि योग्य वेळेत अहवाल तयार करू शकतात. Career Tips: तब्बल 7 लाखांचं पॅकेज असणारं व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये करा करिअर API आणि DevOps साठी कोण काम करू शकतं? पगार काय असतो? DevOp इंजिनीअर हा प्रामुख्याने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट चक्रासाठी प्रक्रिया, टूल्स (उपकरणं) आणि त्याच्या पद्धतींची ओळख करून देण्यासाठी जबाबदार असतो. यामध्ये अगदी कोडिंगपासून ते डिप्लॉयमेंट आणि देखभाल म्हणजे मेंटेनन्स आणि अपडेट्स यांचा समावेश होतो. अ‍ॅप्लिकेशन्समध्ये बदल घडविण्यासाठी आवश्यक असलेली कृती आणि ती विश्वासार्ह करण्यासाठीची कार्यं यामधल्या अंतरामध्ये ते दुवा बनून ही प्रक्रिया साधी सोपी करतात. IT ऑपरेशन्स टीम आणि डेव्हलपमेंट टीम यांची उद्दिष्टं आणि गरजा वेगवेगळ्या असतात. उदा. डेव्हलपर्सना अ‍ॅप्लिकेशन्समध्ये नवीन फीचर्स जोडायची असतील, तर याच्या अगदी विरुद्ध ऑपरेशन्स टीमला अ‍ॅप्लिकेशन एकदा का LIVE झालं की त्याची स्थिरता महत्त्वाची असते. त्याची खात्री करून घेणं हे त्यांच्यासाठी गरजेचं असतं. त्यामुळे DevOps Engineer या दोन टीममध्ये दुवा म्हणून काम करतो आणि संपूर्ण प्रक्रिया नीट होईल याची काळजी घेतो. 'ग्लासडोअर'नुसार (Glassdoor) दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेल्या DevOps Engineer ना भारतात वार्षिक पगार सरासरी सात लाख रुपयांपर्यंत मिळू शकतो. हे पॅकेज वर्षाला 40-50 लाख रुपयांपर्यंतही जाऊ शकते; मात्र ते प्रत्येक व्यक्तीचं कौशल्य, ज्ञान, अनुभव आणि कामाचं ठिकाण यावर अवलंबून आहे. डेव्हलपर्ससाठी आवश्यक पात्रता आणि काही मूलभूत DevOps कौशल्यं सर्वसाधारणपणे DevOps च्या जागेसाठी कम्प्युटर सायन्समधली किंवा त्या क्षेत्राशी निगडित क्षेत्रातली पदवी आवश्यक असते. यामध्ये कोडिंग, QA टेस्टिंग आणि IT इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल्स यांचा अभ्यास समाविष्ट असणं गरजेचं आहे. यापेक्षा वरच्या जागेसाठी आर्किटेक्चर आणि सॉफ्टवेअर डिझाइनमधली अ‍ॅडव्हान्स्ड डिग्री घेणं गरजेचं आहे. हे सातत्याने वाढणारं, विकसित होणारं तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या व्यक्तींनी सतत नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी सज्ज असलं पाहिजे; मात्र पोस्ट कोणतीही असो, प्रत्येक DevOps Engineer कडे काही मूलभूत कौशल्यं असणं गरजेचं आहे. · विविध प्रकारची DevOps टूल्स आणि तंत्रज्ञानांची माहिती · DevOps मधल्या महत्त्वाच्या संकल्पनांचं ज्ञान आणि समज (of DevOps Key Concepts) · कोडिंग आणि स्क्रिप्टिंग (Coding and Scripting) · इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिलिव्हरीचं ज्ञान (Integration and Continuous Delivery ) · क्लाउड सर्व्हर समजून घेणं (Cloud Servers) · ऑटोमेशन आणि सुरक्षेबद्दल माहिती (Automation and Security) · संवाद आणि सहयोग (एकत्र काम करण्याची क्षमता) (Communication and Collaboration) · ग्राहककेंद्री मानसिकता (Customer-centric mindset) · निर्णयक्षम मानसिकता · टेस्टिंग स्किल्स (Testing skills) · मूलभूत सॉफ्टवेअर कौशल्यं (Basic Soft Skills) प्रत्येक एक वर्षानी जॉब बदलणं तुमच्यासाठी असू शकतं धोकादायक; हे होतं नुकसान निष्कर्ष DevOps हा सध्या प्रत्येक संस्थेमध्ये तंत्रज्ञानाशी निगडीत प्रचंड मागणी असलेला भाग आहे. हल्ली सर्व संस्था API आणि DevOps तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत आणि त्यामध्ये काम करत आहेत. त्यामुळे DevOps इंजिनीअर्सचं भविष्य उज्ज्वल आहे. योग्य कौशल्यं असलेली कोणतीही उत्साही व्यक्ती DevOps चं काम त्याच्या करिअरमधल्या कोणत्याही टप्प्यावर शिकू शकते आणि आत्मसात करू शकते.
First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams

पुढील बातम्या