मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

प्रेरणादायी! लाचखोर पोलिसाशी झालेल्या भांडणामुळं बदललं आयुष्य, आधी IPS मग IAS बनल्या गरिमा सिंह

प्रेरणादायी! लाचखोर पोलिसाशी झालेल्या भांडणामुळं बदललं आयुष्य, आधी IPS मग IAS बनल्या गरिमा सिंह

एका रात्रीत बदलं आयुष्य; लाचखोर पोलिसामुळे बनली IAS

एका रात्रीत बदलं आयुष्य; लाचखोर पोलिसामुळे बनली IAS

लाचखोर व्यवस्थेचा राग अनेकांना येतो, पण अनेकदा आपण थोडा विचार करतो आणि विसरुनही जातो. पण एका लाचखोर पोलिसाशी वाद झाला म्हणून या तरुणीने त्यातून सकारात्मक उर्जा घेत सिस्टम बदलण्याचा निर्णय घेतला. IAS ऑफिसर बनत हिच व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न ही तरुणी करत आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 05 मे: आयुष्यातला घडलेला एखादा प्रसंग आयुष्य बदलवणारा ठरतो, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे गरिमा सिंह (Garima Singh). लाचखोर पोलिसांशी (Corrupt Police) झालेल्या वादानंतर गरिमा यांनी आपलं स्वप्न बाजूला ठेवत मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी सिव्हील सर्व्हिसेचा पर्याय निवडला. एवढच नाही तर गरिमा सिंह आधी IPS बनल्या आणि त्यानंतर त्यांनी IAS पर्यंत मजल मारली.

गरिमा या दिल्ली विश्वविद्यालयाच्या सेंट स्टीफेन कॉलेज (Delhi University St. Stephen's College) मध्ये शिक्षण घेत होत्या. एका रात्री मॉलमधून रिक्षाने हॉस्टेलकडे जाताना त्यांच्या बरोबर एक विचित्र प्रसंग घडला. त्याठिकाणी पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसाने त्यांची रिक्षा डवली. चौकशी करुन सोडण्याऐवजी 100 रुपयांची लाच पोलिसांनी मागितली. लाच न दिल्यास घरी फोन करुन तक्रार करण्याची धमकी पोलिसांनी दिली. गरीमाही मागे हटल्या नाहीत, त्यांनी पोलिसांबरोबर वाद घालत पैसे न देण्याचं ठणकावलं. अखेर पोलिसांना नमतं घेत त्यांना सोडावं लागलं. पण, हा प्रसंग गरिमा यांच्या मनात घर करून राहिला होता आणि एका रात्रीत त्यांनी विचार बदलला.

हे वाचा-Success Story: चहा विकून कोट्यधीश झाला 'हा' व्यक्ती, महिन्याला कमावतो 1.2 कोटी

उत्तर प्रदेशाच्या बलिया जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 1987ला गरिमा यांचा जन्म झाला. गरिमांना लहानपणापासून MBBS व्हायचं होतं. मात्र वडील ओमकार नाथ सिंह यांना वाटायचं की गरिमाने सिव्हील सर्विसेस मध्ये करियर करावं. गरिमा यांचे वडील इंजिनियर होते. गरिमा यांनी इतिहास विषयात एमए (MA) केलं. 2012 साली त्यांनी सिव्हिल सर्विसेसची परिक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्या IPS ऑफिसर बनल्या. लखनऊ मध्ये 2 वर्ष एसपी (SP) म्हणून काम केल्यावर झाशी मध्ये एसपी सीटी (SP City) म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. आता त्या आपल्या परिवारासह दिल्लीमध्ये राहतात.

एसपी एसतानाच 2016 मध्ये सिव्हील सर्वीसमध्ये 55 वा रँक मिळवत त्यांनी आयएएस (IAS) पर्यंत मजल मारली.  गरिमा यांनी आयएएस बनल्यानंतर 2 वर्षांनी लग्न केलं. त्यांचे पती इंजिनीअर असून ते नोयडामध्ये असतात. गरिमा यांनी काही वर्ष झारखंडमध्येही काम केलं आहे. त्यांच्या कामाचं लोकांनी नेहमीच कौतूक केलं आहे.

हे वाचा-मेकअपच्या हौसेसाठी स्थापन केली कंपनी, Corona काळात; लाखोंची उलाढाल

गरिमा लहानपणासून अभ्यासात हुशार होत्या. त्यामुळेच त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसध्ये जावं असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. वडिलांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयएएसची परिक्षा दिली. कधीकाळी पोलिसाबरोबर लाचखोरीवरुन वाद झाल्याने पोलिसांबद्दल मनात रोष असणाऱ्या गरिमा आयपीएस आणि आयएएस ऑफिसर बनल्या आहे. गरिमा सिंहचा यांचा हा प्रवास तरूणांसाठी प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Career, Ias officer, India, IPS Officer, Police