मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मेकअपच्या हौसेसाठी स्थापन केली कंपनी, Corona काळात झालं ऑनलाईन मार्केटिंग; लाखोंची उलाढाल

मेकअपच्या हौसेसाठी स्थापन केली कंपनी, Corona काळात झालं ऑनलाईन मार्केटिंग; लाखोंची उलाढाल

मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या या महिलेने मॅनेजरपदाला पोचल्यानंतर नोकरी सोडून स्वतःचा ब्रँड निर्माण केला आणि 1 वर्षात मिळवलं इंटरनॅशनल मार्केट...

मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या या महिलेने मॅनेजरपदाला पोचल्यानंतर नोकरी सोडून स्वतःचा ब्रँड निर्माण केला आणि 1 वर्षात मिळवलं इंटरनॅशनल मार्केट...

मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या या महिलेने मॅनेजरपदाला पोचल्यानंतर नोकरी सोडून स्वतःचा ब्रँड निर्माण केला आणि 1 वर्षात मिळवलं इंटरनॅशनल मार्केट...

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 5 मे: ब्युटी प्रोडक्ट (Beauty Products) आजच्या काळात कोण वापरत नाही? आपण सुंदर दिसवं असं ज्यांना वाटत ती प्रत्येक व्यक्ती काहीतरी मेकअप प्रोडक्ट वापरत असते. पण, काही ब्युटी प्रोडक्टमुळे त्वचेला नुकसान होतं. हाच विचार करुन 2019 साली एक ब्युटी प्रोडक्ट कंपनी लॉन्च करण्यात आली. ऐनारा कौर (Ainara Kaur) आणि अकालाज्योत कौर (Akalajyot Kaur) या दोघींनी ही कंपनी सुरु केली. पण, ही कंपनी सुरु होण्याची कहाणीही रंजक आहे. ऐनारा आणि अकालज्योतने 5 वर्षांपूर्वीच स्वच्छ आणि स्वस्थ जीवन शैलीत जगणं सुरु केलं होतं. युरोप मधल्या बॅगपॅकिंग ट्रिप दरम्यान ऐनाराने स्वच्छ आणि नो केमिकल (No Chemical) मेकअप (Makeup) बद्दल माहिती मिळवली होती. तर, दुसरीकडे अकालज्योतला थायरॉईड असल्याने स्किन प्रॉब्लेम होते. त्यामुळेच या जोडीने उपलब्ध पर्यायांचा उपयोग करत गुरुग्राम आणि पॅरिसमध्ये 2019 मध्ये क्लीन ब्युटी ब्रँड बेलोरा कॉस्मेटिक्स लॉन्च केला.

(निवृत्तीनंतर खात्रीशीर नियमित उत्पन्न हवंय? जाणून घ्या नव्या पेन्शन प्लानविषयी..)

प्रोडक्ट आयडिया

ऐनारा सांगतात, "आम्ही दोन गोष्टींबद्दल स्पष्ट होतो. कंपनी ग्राहक प्रकारातली असावी आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून कोणतीही समस्या नको होती. सौंदर्य विषयावर संशोधन करताना मेकअपलाही महत्व दिलं. क्लीन, नॉन टॉक्सिक फॉर्म्युलेशनसह चांगला परफॉर्म करणारा ब्रँड बनवायचा होता"

प्रोडक्टची सुरुवात

या दोघींनाही हाय इम्पॅक्ट मेकअप प्रोडक्ट आवडतात. मात्र, मेकअप प्रोडक्टमध्ये असणाऱ्या केमिकल्समुळे असे प्रोडक्ट वापरता येत नाहीत. ऐनारा म्हणते, "खरं तर जगभरात मेकअपमध्ये टॉक्सिनचा वापर कोणत्याही निर्बंधाशिवाय केला जातो. त्याचाच विचार करुन आम्ही बेलोरा लाँच करुन सोडवण्याचा निर्णय घेतला. हा एक उच्च गुणवत्तेचा मेकअप ब्रँड आहे. ज्यामध्ये हाय कलर पेऑफ आणि जास्त काळ मेकअप टिकण्यासाठी चांगले स्किनकेअर फॉर्म्युले वापरण्यात आले आहेत.

(सामान्यांना झटका! प. बंगाल निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत उसळी)

आयनाराने यापूर्वी कॅनॅव्हलिसिस (Canavalicious)  या क्रिएटिव्ह टेक एजन्सीची स्थापना केली आहे. याशिवाय मायन्ट्रासारख्या कंपनीत ती वरिष्ठ मार्केटींग एक्झिक्युटिव्ह देखील आहे. दुसरीकडे, अकालज्योतने अमेरिकन एक्सप्रेस आणि मेटलाइफसारख्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे. आज सेफ कॉस्मेटिकचा चॅम्पियन असण्याव्यतिरिक्त अकालज्योत हा एक सर्टिफाइड फिटनेस ट्रेनर आहे.

ऐनारा सांगते की, तिची उत्पादनं एथोस यूरोपीय संघाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहेत. तिचं म्हणणं आहे की ज्यांना त्वचेसाठी असुरक्षीत मानलं जातं असे 1,500  प्रोडक्ट ते उत्पादनांत वापरत नाहीत. ती म्हणते की, "आमच्याकडे 500 इनग्रेडियन्सची यादी आहे जी कधीही न वापरण्याचं आमचं प्रॉमिस आहे. आम्ही त्याला बीएस किंवा बॅड स्टफ लिस्ट म्हणतो. आम्ही युरोप आणि आशियातील MADE SAFE™  सर्टिफीकेट प्राप्त करणारा पहिला मेकअप ब्रँड देखील आहोत, या सर्टिफीकेटने आमच्या प्रोडक्टची गुणवत्ता स्पष्ट होते”.

(सेलिब्रेटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिला Quarantine Diet Plan)

नॉन टॉक्सिक फॉर्मुलेशनसाठी R&D

बेलोरा कॉस्मेटिक्स लिपस्टिक, आय मेकअप आणि फेस मेकअप प्रोडक्ट बनवतात. ऐनारा म्हणतात की, प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि लॉन्चींग करण्यासाठी दीड वर्ष सुमारे दहा जणांची टीम काम करत होती, कारण त्यांना प्रिमियम श्रेणीचे हाई परफॉर्मेंस देणारे आणि नॉन टॉक्सिक फॉर्मुलेशनचे प्रोडक्ट बनवायचे होते. जे सहज सोप नव्हतं. सध्या त्यांचे प्रोडक्ट विविध सोर्सेसकडून मॅन्युफॅक्चर केले जातात. त्यांच्या टीमने थर्डपार्टी मॅन्युफॅक्चरींग आणि डिस्ट्रीब्यूटर्सबरोबर टायअप केलं आहे. त्यांच्या प्रोडक्टची किंमत 299 पासून 1,599 पर्यंत आहे. त्यांचे प्रॉडक्ट त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कमीतकमी 500 ते 800 रुपयांची ऑर्डर द्यांवी लागते.

ऐनाराच्या मते, वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांनी लीव नो एविडन्स लिक्विड लिपस्टिक आणि नॅचरल फेस कलेक्शनला चांगली पसंती दिली आहे. कोरोनामुळे एकीकडे ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम निर्माण झाला असताना. दुसरीकडे ऑनलाईन खरेदी वाढल्याने खप वाढला आहे.

(अभिनेत्रीचा फिटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम, सौंदर्यांच्या घायाळ करणाऱ्या अदा)

रिसर्च ऍन्ड मार्केटनुसार, ग्लोबल वीगन कॉस्मेटिक्स मार्केट साइज म्हणजेच विश्व शाकाहारी सौंदर्य प्रसाधनांचं मार्केट 2025 पर्यंत 20.8 अब्ज डॉलरपर्यंत पोहचेल. त्यामुळे कमी काळात जास्त पॉप्युलर होण्याचा या दोघींनाही विश्वास आहे.

First published:

Tags: Brand, Online shopping