Home /News /career /

Success Story: चहा विकून कोट्यधीश झाला 'हा' व्यक्ती, महिन्याला कमावतो 1.2 कोटी

Success Story: चहा विकून कोट्यधीश झाला 'हा' व्यक्ती, महिन्याला कमावतो 1.2 कोटी

परदेशातील आरामदायी आयुष्य सोडून भारतात चहाचा व्यवसाय करून कोट्यवधी रूपये कमवणारा 'NRI चायवाला'. आजमितीला त्यांच्या कंपनीत 35 जण कामाला आहेत. वाचा त्यांची Success Story.

  नवी दिल्ली, 28 एप्रिल : चहा हे भारतातील राष्ट्रीय पेय आहे असं गमतीनं म्हटलं जातं. गेली अनेक शतकं प्यायला जाणारा हा चहा घरातील अविभाज्य घटक झाला आहे. तुम्ही पिता तो साधा चहा. पण तुम्ही मिक्श्चर चहा, डस्ट चहा किंवा ग्रीन टी, ब्लॅक टी असे चहाचे वेगवेगळे प्रकार ऐकले असतील. प्रत्येक प्रकारच्या चहाचा स्वाद वेगळा असतो. पण तुम्ही कधी ‘मम्मी के हाथ की चाय,’ ‘प्यार मोहब्बतवाली चाय’ किंवा ‘उधारवाली चाय’ हे चहाचे प्रकार ऐकलेत का? नाही ना. जाणून घ्या परदेशातील आरामदायी आयुष्य सोडून भारतात चहाचा व्यवसाय करून कोट्यवधी रूपये कमवणाऱ्या नवउद्योजकाची कहाणी. चहा विकून उभारली कोट्यवधीची कंपनी - ही कहाणी आहे एनआरआय (NRI) जगदीश कुमार यांची. जगदीश यांनी न्यूझीलंडमध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम केलं. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी एक व्यवसाय सुरू करायचं ठरवून न्यूझीलंडला कायमचा राम राम ठोकला. भारतात आल्यावर त्यांनी चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी लोकांची आवड ओळखून चहाचे नवनवे फ्लेवर तयार केले आणि ते लोकांना विकून प्रचंड कमाई केली. त्यांनी त्यांच्या चहा कंपनीचं नाव 'NRI चायवाला' असं ठेवलं. आजमितीला त्यांच्या कंपनीत 35 जण कामाला आहेत आणि कंपनीचा टर्नओव्हर 1.2 कोटी रुपयांचा आहे. जगदीश यांचा चहा का आहे विशेष? जगदीश यांनी त्यांच्या ग्राहकांची आवड ओळखली आणि‘मम्मी के हाथ वाली चाय,’‘प्यार मोहब्बत वाली चाय’किंवा‘उधार वाली चाय’अशा वैशिष्ट्यपूर्ण नावांचे फ्लेवर तयार केले. या नावांप्रमाणेच या चहाचा स्वादही त्यांनी तयार केला आणि ते सर्व प्लेवर प्रचंड लोकप्रिय झाले. हे स्वाद तयार करण्यासाठी जगदीश त्यात वेगवेगळे मसाले टाकतात पण ते त्यांचं ट्रेड सिक्रेट (Trade Secret) आहे.

  (वाचा - सत्तरीतही आजीबाई झाल्या बिझनेसवुमेन; 77व्या वयात सुरू केलं स्वत:चं फूड स्टार्टअप)

  जगदीश म्हणाले,‘कोरोना विषाणू महामारी सुरू झाल्यावर मी तातडीने माझ्या रिसर्च टीमला सूचना दिल्या, की इम्युनिटी बूस्टर चहा तयार करा. त्यामुळे आता आमच्याकडे इम्युनिटी बूस्टर चहा हा स्वाद पण उपलब्ध आहे. या चहामध्ये ज्येष्ठमध, आलं, हळद, काढा याचा वापर केला जातो. हा चहा प्यायल्याने माणसाची प्रतिकारशक्ती वाढते.’ NRI चायवाला कसा सुरू केला व्यवसाय? नवा व्यवसाय सुरू करताना प्रश्न असतो तो व्यवसाय कसा सुरू करायचा. जगदीश यांनी त्याबाबतही सांगितलं. ते म्हणाले,‘मी चहाचं साहित्य घेऊन मोठ्या कंपन्यांच्या ऑफिसच्या बाहेरच माझं दुकान थाटलं. माझा चहा सगळ्यांना खूप आवडायला लागला. काही दिवसांनी मी दुकानात 'NRIचायवाला'चा बॅनर लावला त्यामुळे लोकांना कुतूहल वाटलं. हळूहळू मोठ्या कंपन्यांनी आम्हाला कँटिनमध्ये स्टॉल लावायला परवानगी दिली.’सध्या एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL Technologies) आणि इन्फोसिससारख्या (Infosys)आयटी कंपन्या जगदीश यांच्या क्लायंट आहेत. त्यामुळे ते कोट्यवधी रूपये कमवतात.
  First published:

  Tags: Coronavirus, Tea

  पुढील बातम्या