मुंबई, 07 फेब्रुवारी: परीक्षेआधी येणारा ताण आपल्याला परीक्षा काळात आजारी पाडतो किंवा आपलं संतुलन बिघडवणारा असतो. त्यामुळे परीक्षा काळात आपण तणावमुक्त राहिल्यानंतर आपण पेपर अगदी चांगला सोडवू शकतो. त्यासाठी काही गोष्टी आवश्यकपणे करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला मेंदू तल्लख आणि ताजातवाना राहातो. चला तर जाणून घेऊया परीक्षेआधी आपला ताण दूर करण्यासाठी नेमक्या काय गोष्टी करायला हव्यात.
आवश्यक तेवढी झोप घ्या- परीक्षेच्या काळात आरोग्या बिघडू नये यासाठी पुरेपूर झोप घेणं आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे आपली प्रकृती बिघडू शकते आणि मेंदूवरही ताण येतो. झोप पूर्ण झाली असेल मेंदू ताजातवाना आणि जास्त वेगानं काम करतो.
सलग काही तास अभ्यास केल्यानंतर थोडा गॅप घ्या- यामध्ये तुम्ही चालू शकता किंवा नुसतं शांत बसू शकता. मेंदूला रिलॅक्स होण्यासाठी आणि अति ताण येऊ नये म्हणून छोटी विश्रांती घेणं आवश्यक आहे.
योग्य आहार घ्या- शरीरात ऊर्जा आणि मेंदू चांगला कार्यरत राहावा यासाठी य़ोग्य आहार आणि तो वेळेत घेणं आवश्यक आहे. त्यामुळे खाण्या जेवणाची हेळसांड करू नका.
मेंदूला विश्रांती- अर्धा तास आपल्याला आवडणारं काम करा. यावेळात खेळू शकता किंवा छंद जोपासू शकता. त्यामुळे सतत अभ्यासामुळे मेंदूला आलेला ताण कमी होण्यास मदत होईल. यासोबतच दिवसाचं टाईमटेबल आखून घ्या. त्यानुसार नियोजन करा. म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टी कशा आणि किती करायच्या याचाही अंदाज येईल.
अभ्यासाची वेळ निश्चित करा- यामध्ये पाठांतर किंवा वाचनाचा वेळ हा शक्यतो सकाळचा किंवा रात्री शांतपणे ठेवा मधल्या वेळेत तुम्ही लिखाण, सराव, सूत्र अथवा गणितं सोडवू शकता. त्यामुळे अभ्यासातही संतुलन राखलं जाईल. एकसूरीपणा येणार नाही.
हेही वाचा-10 दिवसांत अभ्यास करून scienceमध्ये पास होण्याचा सोप्या आणि भन्नाट Idea
हेही वाचा-SSC Board Exam : कमी वेळात संपूर्ण सिलॅबसचा अभ्यास झटपट कसा कराल?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.