मुंबई, 07 फेब्रुवारी: दहावीच्या संपूर्ण वर्षभरात जरी तुम्ही अभ्यास केला नसेल तर आता शेवटच्या काही दिवसांमध्ये थोडं लक्ष देऊन अभ्यास केला तर नक्कीच आपण फक्त पास नाही तर फस्ट क्लास मार्क मिळवून पास होऊ शकतो. हा विश्वास आधी आपण स्वत:मध्ये डेव्हलप करायला हवा. 03 मार्चपासून इयत्ता 10वीची परीक्षा सुरू होत आहे. 10वीचे विषय पाहता ही परीक्षा जवळपास महिनाभर सुरू असते साधारण 03 मार्च ते 23 मार्च चालणाऱ्या या परीक्षेची तयारी आपण अगदी थोड्यावेळात कशी चांगली करू शकतो चला जाणून घेऊया. 1. शेवटच्या क्षणी खूप कष्ट किंवा गधा मजूरी करण्यापेक्षा स्मार्टली अभ्यास करण्यावर भर द्या. 2. सध्याचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षांच्या पेपरचा थोडा स्मार्टली अभ्यास करा. त्यावरून कोणत्या धड्याला किती महत्त्व दिलं जातं याचा अंदाज येईल. 3. थेरॉटिकल आणि न्यूमरीकल प्रश्नांसाठी कसा आणि किती गुणांचं वेजेट दिलं जातं याचा अंदाज आपल्याला यामुळे येईल. याशिवाय बोर्डासाठी मागच्या दोन वर्षात कोणता धडा सर्वात महत्त्वाचा होता याचा अंदाजही येईल. अर्थात अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न बदलला नसेल तरच हे शक्य आहे. हेही वाचा- 10 दिवसांत अभ्यास करून scienceमध्ये पास होण्याचा सोप्या आणि भन्नाट Idea 4. जास्त वेजेट असणाऱ्या विषयांना आधी प्राधान्य द्या. पर्यायी प्रश्न किंवा 15 मार्काला असणारे पर्यायी प्रश्न सोडवण्यावर भर द्या. कारण 7 किंवा 8 मार्कांच्या प्रश्नांना 6 ते साडेसहा पर्यंत मार्क मिळतात तेच 15 मार्कांच्या प्रश्नांसाठी मात्र तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची संधी फार कमी असते. 5. छोटी उत्तरं आधी सोडवा. मार्क मिळवून देणाऱ्या प्रश्नांना आधी प्राधान्य द्या पण प्रश्न क्रमांक मात्र चुकवू नका. 6. मोठ्या प्रश्नांची उत्तरं तयार करताना मुद्दे लिहा आणि मुद्दे लक्षात ठेवा. हे मुद्दे आपल्या भाषेत पेपरमध्ये तुम्ही लिहू शकता. 7. मुद्दे लिहून काढा. त्यामुळे ते लक्षात राहतात. आणि पेपरच्या आधी सुट्टी असेल त्या वेळी हे फक्त मुद्दे रिमांइड करा. त्यामुळे कमी वेळात अधिक चांगला अभ्यास होईल. 8. परीक्षेसाठी वेळेवर लक्ष द्या. कोणताही प्रश्न सुटणार नाही याकडे लक्ष द्या. पेपर वेळेत पूर्ण करा. हेही वाचा- Board Exam 2020: फिजिक्सच्या पेपरमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी स्मार्ट टिप्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.