Home /News /career /

10 दिवसांत अभ्यास करून scienceमध्ये पास होण्याचा सोप्या आणि भन्नाट Idea

10 दिवसांत अभ्यास करून scienceमध्ये पास होण्याचा सोप्या आणि भन्नाट Idea

18 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. शेवटच्या क्षणी अभ्यास करून पास होणाऱ्यांसाठी या काही हटके टिप्स.

    मुंबई, 07 फेब्रुवारी: बारावीची परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. 18 फेब्रुवारीपासून HSC बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू होत आहे. सायन्स स्ट्रीमकडील मुलांना अभ्यास जास्त आणि वेळ कमी अशी अवस्था होऊन जाते. विषय कठीण असल्यानं आधीच घाम फुटलेला असतो त्यामध्ये शेवटच्या क्षणी रात्रभर जागून गाढव मजुरी करून अभ्यास करूनही बऱ्याचदा फायदा न झाल्याचं पूर्व परीक्षांमध्ये लक्षात आलेलं असतं. अशावेळी काही भन्नाट आणि सोप्या ट्रिक्स वापरून आपण अगदी सहज पास होऊ शकतो. याकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. बारावीमध्ये साधारण बऱ्या मार्कांनी पास होणं तसं कठीण नाही थोडं डोकं वापरून काही सोप्या टेकनिक आत्मसात केल्यात की आपण बिनधास्त पास होण्याइतका पेपर सोडवून परीक्षा केंद्राबाहेर हसत येऊ शकता. यासाठी नेमकं काय करायचं आहे ते ठरवायला हवं. टाईमटेबल काढा आणि आपला विषय आणि पेपर कोणत्या तारखेला आणि किती वाजता आहे पाहा. त्याचं एक वेळापत्रक आपल्या डोळ्यासमोर ठेवा. त्यानंतर विषयानुसार आपण काही सोप्या टिप्सचा अवलंब करून आपण पास होऊ शकता. विषय इंग्रजी- इंग्रजी विषयाचा पेपर सोडवताना व्याकरणाच्या भागावर लक्ष अधिक केंद्रीत करा. तिथे पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. उताऱ्याचे प्रश्न सोडवा. कोणताही प्रश्न सोडू नका. काहीतरी लॉजिकल उत्तर लिहा. त्यामुळे तुम्हाला तिथे अर्धा ते एक मार्क मिळण्याची संधी असतेच. उताऱ्याचे किंवा कवितेचे प्रश्न, लेटरचा आराखडा, निबंध आपल्या भाषेत सोप्या इंग्रजीत छोटी छोटी वाक्य कमी चुका होईल अशा पद्धतीनं लिहा. तिथे आपल्याला हमखास मार्क मिळण्याची संधी असते. हेही वाचा-Board Exam 2020: फिजिक्सच्या पेपरमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी स्मार्ट टिप्स विषय गणित- यामध्ये गणित भाग एक आणि भाग दोन असे विषय असतात. त्यामधले महत्त्वाचे थेअरम, फॉर्म्युले आणि महत्त्वाचे धडे कोणते आहेत. हे लक्षात घ्या. त्यानुसार अभ्यास करा. सगळं करत बसण्याइतका सध्या आपल्याकडे वेळ नाही. जितकं गणित येईल तेवढ्या स्टेप्स सोडवा. इथे प्रत्येत स्टेपला मार्क आहे. विषय फिजिक्स- महत्त्वाच्या व्यख्या, त्यांची नावं, सूत्र, आकृत्या तोंड पाठ करा. पेपर सोडवताना आकृत्या आणि सूत्रांचा आवश्यक तिथे वापर करा. सर्व प्रश्न सोडवण्यावर भर द्या. विषय केमेस्ट्री- यामध्ये सूत्र अधिक असतात. त्यामुळे त्यामागचं लॉजिक समजून घ्या. ऑर्गेनिक फॉर्म्युले आणि इक्वेशन लक्षात ठेवा ते सर्वात महत्त्वाचे आहेत. ‘सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉन रसायनशास्त्र, principles of isolation of elements, structures of compounds in p-block elements, विषयानुसार सूत्र समजून घेऊन ती पुन्हा पुन्हा लिहून काढा. विषय- बायोलॉजी- यामध्ये सायन्टिफिक शब्द लिहिताना काळजी घ्या. आकृत्या पाठ करा. महत्त्वाचे असणारे धडे समजून घ्या आणि उत्तरं लिहा. कोणताही प्रश्न रिकामा सोडू नका. 15 मार्कांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा 7 किंवा 8 मार्कांचे किंवा 5 मार्कांचे प्रश्न पर्यायी सोडवण्यावर भर द्या. हेही वाचा-Board Exam 2020 : इंग्रजी विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी वापरा 10 सोप्या टिप्स
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: HSC, HSC Board, Hsc exam

    पुढील बातम्या