Home /News /career /

UPSC Tips: IAS मुलाखतीदरम्यान 'या' अक्षम्य चुकांमुळे स्वप्न राहील अधुरं; आताच अशी घ्या काळजी

UPSC Tips: IAS मुलाखतीदरम्यान 'या' अक्षम्य चुकांमुळे स्वप्न राहील अधुरं; आताच अशी घ्या काळजी

मुलाखत क्रॅक करणे सोपे नाही

मुलाखत क्रॅक करणे सोपे नाही

आज आम्ही तुम्हाला अशा काही चुका सांगणार आहोत ज्या तुम्ही UPSC मुलाखतीदरम्यान टाळल्या (How to avoid mistakes in IAS Interview) पाहिजेत.

  मुंबई, 15 मे: सहसा कोचिंग सेंटर्स किंवा शैक्षणिक यूट्यूब व्हिडिओमध्ये (IAS Preparation from Youtube) परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी काय करता येईल हे सांगितले जाते. पण परीक्षेदरम्यान उमेदवारांनी कोणत्या चुका टाळाव्यात (Mistakes to avoid during UPSC Interview) हे क्वचितच कोणी सांगेल. जर तुम्हाला UPSC मुलाखत क्रॅक (How to crack UPSC Interview) करून IAS बनायचे असेल तर तुम्हाला तुमच्या विकनेस चांगल्या प्रकारे माहित असणे आवश्यक आहे (How to become IAS). UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते, तिची मुलाखतही या शर्यतीत मागे नाही. UPSC मुलाखत क्रॅक करणे सोपे नाही. सरकारी नोकरीच्या (Government Jobs) इच्छुकांना IAS मुलाखतीत बरेच अवघड प्रश्न विचारले जातात. कधीकधी त्यांची उत्तरे देणे दूरच असते, प्रश्न समजून घेणे देखील पुरेसे असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही चुका सांगणार आहोत ज्या तुम्ही UPSC मुलाखतीदरम्यान टाळल्या (How to avoid mistakes in IAS Interview) पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया. नक्की कधी सुरु करावी तयारी? UPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी, उमेदवारांनी IAS मुलाखतीची तयारी सुरू केली पाहिजे. UPSC मुख्य निकाल जाहीर होण्याची वाट पाहत राहिल्यास खूप उशीर होईल. म्हणूनच जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर UPSC च्या Interview ची तयारी करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, English ची प्रचंड भीती वाटते का? चिंता नको; असं करा Improve खोटं बोलू नका अनेक उमेदवार UPSC मुलाखतीत प्रश्नांची उत्तरे देताना खोटेपणाचा अवलंब करू लागतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. वैयक्तिक असो वा तांत्रिक, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना नेहमी खरे बोला. तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर तेही नम्रपणे सांगा. करंट अफेअर्सवर लक्ष द्या यूपीएससी मेन्स परीक्षेनंतर तुम्ही जर रिलॅक्स मोडमध्ये गेलात तर ते चुकीचे आहे. यूपीएससी मुख्य परीक्षा आणि मुलाखत यातील वेळ खूप महत्त्वाचा असतो. या दरम्यान वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि मासिकांवर लक्ष ठेवा. कोणतीही महत्त्वाची बातमी चुकवू नका. करंट अफेअर्सवर लक्ष द्या. यावरच तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. म्हणूनच तुम्ही यासाठी तयार असणे आवश्यक आहे. UGC NET 2022: परीक्षेच्या अभ्यासक्रमात आणि अप्लिकेशन फीमध्ये झाले 'हे' मोठे बदल
  उत्तर देण्याची घाई करू नका
  आयएएस मुलाखतीदरम्यान उत्तर देण्याची घाई करू नका. तुमचा वेळ घ्या आणि प्रत्येक प्रश्नाचे आत्मविश्वासाने उत्तर द्या. मात्र याचा अर्थ असा नाही की आपण एका प्रश्नावर अडकले पाहिजे. शक्य तितकाच वेळ घ्या आणि अचूक उत्तर द्या.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Ias officer, Job, Upsc

  पुढील बातम्या