जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / UGC NET 2022: परीक्षेच्या अभ्यासक्रमात आणि अप्लिकेशन फीमध्ये झाले 'हे' मोठे बदल; वाचा सविस्तर

UGC NET 2022: परीक्षेच्या अभ्यासक्रमात आणि अप्लिकेशन फीमध्ये झाले 'हे' मोठे बदल; वाचा सविस्तर

UGC NET 2022: परीक्षेच्या अभ्यासक्रमात आणि अप्लिकेशन फीमध्ये झाले 'हे' मोठे बदल; वाचा सविस्तर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांमध्ये अ‍ॅप्लिकेशन फी, विषयांची संख्या, एक्झाम सेंटर्स आणि आन्सर की (Answer Key) चॅलेंज फीचा समावेश आहे.

    मुंबई, 12 मे:  नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) डिसेंबर 2021 आणि जून 2022 या सायकलसाठी होणाऱ्या कम्बाईन्ड यूजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नेट (UGC NET) परीक्षेचं अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. या वर्षी 30 एप्रिल रोजी यूजीसी नेट परीक्षेचं अ‍ॅप्लिकेशन रिलीज झालं आहे. आवश्यक पात्रता अटी पूर्ण करणारे विद्यार्थी यूजीसी नेट 2022 या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) करू शकतात. या वर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये (Information Bulletin) काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांमध्ये अ‍ॅप्लिकेशन फी, विषयांची संख्या, एक्झाम सेंटर्स आणि आन्सर की (Answer Key) चॅलेंज फीचा समावेश आहे. अ‍ॅप्लिकेशन फीमध्ये वाढ एनटीएनं डिसेंबर 2021 आणि जून 2022 या या सायकलसाठी अ‍ॅप्लिकेशन फी (Application Fee) वाढवली आहे. ही फी अंदाजे 10 टक्क्यांनी वाढली आहे. जनरल (General Category) किंवा अनरिझर्व्हड कॅटेगरीच्या (Unreserved Category) अ‍ॅप्लिकेशन फीमध्ये 100 रुपयांची वाढ होऊन ही फी आता एक हजार 100 रुपये इतकी झाली आहे. ईएसडब्लू (EWS), ओबीसी-एनसीएलच्या (OBC-NCL) फीमध्ये 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना यावर्षी 550 रुपये अ‍ॅप्लिकेशन फी भरावी लागणार आहे. याशिवाय, एससी(SC), एसटी (ST), पीडब्लूडी (PwD) आणि ट्रान्सजेंडरसाठीच्या अ‍ॅप्लिकेशन फीमध्ये 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच या कॅटेगरींतील विद्यार्थ्यांना आता 250 ऐवजी 275 रुपये फी भरावी लागेल. IT क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे? मग ‘हे’ टॉप Certification Courses कराच

    विषयांच्या संख्येत वाढ

    आतापर्यंत 81 विषयांसाठी (Subjects) यूजीसी नेट परीक्षा घेतली जात होती. विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) यावर्षी परीक्षेसाठी आणखी एका विषयाचा समावेश केला आहे. इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार यूजीसीनं ‘हिंदू स्टडीज’ (Subject code 102) हा नवीन विषय आपल्या यादीमध्ये समाविष्ट केला आहे. म्हणजेच आता यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना 82 विषयांच्या यादीतून आपला विषय निवडावा लागणार आहे. एक्झाम सेंटर्सची संख्या वाढवली मागील वर्षी 239 सेंटर्समध्ये (Exam Centre) यूजीसी नेट परीक्षा घेण्यात आली होती. या वर्षी (2022) एक्झाम सेंटर्सच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. या वर्षी 541 ठिकाणी नेट परीक्षा आयोजित केली जाईल. एनटीएनं आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये शहरांसह एक्झाम सेंटर्सची संपूर्ण यादीदेखील समाविष्ट केली आहे. आन्सर की चॅलेंज फी झाली कमी परीक्षा झाल्यानंतर लगेचच NTA प्राथमिक UGC NET answer key 2022, प्रश्नपत्रिका आणि सोडवलेली उत्तर पत्रिका उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींना काही आक्षेप असतील तर ते नोंदवू शकतात. विद्यार्थ्यांना यापूर्वी प्रत्येक आन्सर की चॅलेंजसाठी एक हजार रुपये भरावे लागत होते. मात्र, त्यामध्ये आता मोठी कपात करण्यात आली आहे. आता प्रत्येक चॅलेंजसाठी केवळ 200 रुपये मोजावे लागतील. JEE Advanced: JEE परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम झाला जारी; काय आहेत बदल? वाचा

    परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे आहे. यूजीसी नेट डिसेंबर 2021 आणि जून 2022 ही परीक्षा सीबीटी (Computer Based Test) मोडमध्ये घेतली जाईल. 180 मिनिटे किंवा तीन तास कालावधी असलेली ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते 12 आणि दुसरी शिफ्ट 3 ते 6 या वेळेत असेल. पेपर I साठी 100 मार्क्स असतील, तर पेपर II हा 200 मार्क्सचा असेल. दोन्ही पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न (Objective Question) असतील. सर्व प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील. परीक्षा फक्त इंग्रजी (English Medium) आणि हिंदी माध्यमात (Hindi Medium) असेल. जे विद्यार्थी या वर्षी नेट परिक्षा देण्यास इच्छुक आहेत त्यांनी हे सर्व बदल काळजीपूर्वक समजून घेणं महत्त्वाचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात