मराठी बातम्या /बातम्या /करिअर /विद्यार्थ्यांनो, तुम्हाला English ची प्रचंड भीती वाटते? चिंता नको; अशा पद्धतीनं करा Improve

विद्यार्थ्यांनो, तुम्हाला English ची प्रचंड भीती वाटते? चिंता नको; अशा पद्धतीनं करा Improve

आज आम्ही तुम्हाला घरबसल्या Free मध्ये कशाप्रकारे इंग्लिश बोलणं (How to Learn English For free) आणि वाचणं शिकता येईल हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

आज आम्ही तुम्हाला घरबसल्या Free मध्ये कशाप्रकारे इंग्लिश बोलणं (How to Learn English For free) आणि वाचणं शिकता येईल हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

आज आम्ही तुम्हाला घरबसल्या Free मध्ये कशाप्रकारे इंग्लिश बोलणं (How to Learn English For free) आणि वाचणं शिकता येईल हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

मुंबई, 12 मे: आजकालच्या जगात इंग्लिशला (Importance of English) इतर कोणत्याही जागतिक भाषेपेक्षा अधिक महत्त्वं आहे. त्यात आपल्या भारतात ज्याला इंग्लिश (How to Learn English) बोलता येतं, लिहिता येतं आणि वाचता येतं अशा लोकांना सर्व क्षेत्रांमध्ये प्राधान्य दिलं जातं. अगदी अंगणवाडीपासून तर जीवनाच्या शेवट्पर्यंत इंग्लिशशिवाय जगात कोणाचंही काम होत नाही. मात्र आपल्यापैकी अनेकांना इंग्लिशच भयंकर भीती (How to remove fear of English) वाटते. कोणीही इंग्लिश बोलणारी व्यक्ती समोर आली तर आपण स्वतःला कमी समजतो. इंग्लिश येत नसेल तर आत्मविश्वासही कमी होतो. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या Free मध्ये कशाप्रकारे इंग्लिश बोलणं (How to Learn English For free) आणि वाचणं शिकता येईल हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा

प्रॅक्टिस मेक्स मन परफेक्ट असे म्हणते जाते. म्हणूनच इंग्रजी बोलण्याचा दररोजचा प्रयत्न (How to do practice of english) आपली इंग्रजी बोलण्याची क्षमता सुधारू शकतो. जर तुम्ही अशा देशात रहात असाल जिथे इंग्रजी बोलली जात नाही, तर तुम्ही शिक्षकाची मदत घेऊ शकता किंवा इंग्रजीतील तज्ञाशी बोलू शकता. स्वतःचे मोठ्याने वर्णन करा आणि स्वतःशी बोला. यामुळे तुम्हाला आत्मविश्वास येईल.

फ्रेशर्स उमेदवारांनो, नक्की कसा बनवावा Perfect Resume? इथे मिळेल योग्य उत्तर

सर्वत्र इंग्लिशची करा निवड

जर तुम्हाला खरोखरच इंग्रजी शिकण्याची आवड असेल तर इंग्रजीला तुमच्या जीवनाचा भाग बनवा. तुम्ही एखादे गॅझेट वापरता किंवा सेवा वापरता, इंग्रजी सर्वत्र प्रथम क्रमांकावर ठेवा. एखादा टीव्ही शो हिंदीत आला तर तो इंग्रजी सबटायटल्ससह पहा. अधिकाधिक इंग्रजी पुस्तकांना तुमच्या जीवनाचा भाग बनवा.

उच्चारांकडे लक्ष द्या

चांगले इंग्रजी बोलण्यासाठी उच्चारांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कारण इंग्रजी कितीही चांगले असले तरी उच्चार बरोबर नसेल तर ते आकर्षक दिसत नाही. उच्चारासाठी शब्द मोठ्याने वाचले जाणे आवश्यक आहे. चांगल्या उच्चारामुळे इंग्रजी आपोआपच सुंदर वाटू लागते.

Interview Tips: Online मुलाखतीदरम्यान घाबरू नका; तुम्हालाच मिळेल जॉब; 'या' टिप्स येतील कामी

मित्रांशी किंवा कुटुंबियांशी बोला

इंग्रजी शिकण्यासाठी दैनंदिन जीवनात इंग्रजीचा समावेश करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबियांशी, मित्रांशी इंग्लिशमध्येच संवाद साधा. मेसेजवर बोलतानाही इंग्लिशमध्येच बोला. यामुळे तुम्हाला योग्य व्याकरण वापरून इंग्लिश बोलण्याची सवय लागेल. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या इंग्रजी एक्सपर्ट व्हाल यात शंका नाही.

First published:

Tags: Career opportunities, Job, Online education