बुलंदशाह, 21 जून : IAS होण्याचं स्वप्न इतकं मनाशी पक्क आणि मोठं होतं की येणाऱ्या अडचणीही फार ठेंगण्या वाटत होत्या. घरात वडिलांची परिस्थिती नसतानाही पैसे उधार घेऊन त्यांनी UPSC परीक्षा दिली. 2018 रोजी त्यांना UPSC परीक्षेत अव्वल यश मिळालं. देशात 92 वा क्रमांक आलेल्या वीर प्रताप सिंह यांची शेतकऱ्याचा मुलगा ते IAS ऑफिसर असा प्रवास फार प्रेरणादायी आहे. वीर प्रताप सिंह हे बुलंदशहराचे रहिवासी. शेतकरी कुटुंबात वाढलेले. आधीच हवामानातील बदलामुळे शेतीचं नुकसान व्हायचं आणि त्यातून कर्ज. तरीही वडिलांनी मुलास महिन्यात तीन टक्के व्याज देऊन पैसे घेऊन मुलाची तयारी केली. तिसर्या प्रयत्नात UPSC परीक्षेत यशस्वी झाल्याचे वीर प्रताप यांनी सांगितले. यापूर्वी 2016 आणि 2017 मध्येही त्याने परीक्षा दिली होती. 2015 रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठातून बीटेक (मेकॅनिकल इंजिनियरिंग) केलं आहे. IAS होण्याचं त्यांच्या मोठ्या भावाचं स्वप्न होतं. मात्र आर्थिक संकटामुळे त्यांना ते पूर्ण करता आलं नाही. वीर प्रताप सिंह यांच्या यशामध्ये भावाचा मोठा वाटा असल्याचं सांगतात. हे वाचा- दारू विकून मिळालेल्या पैशातून घेतलं शिक्षण, IAS राजेंद्र भारूड यांचा कहाणी वीर प्रताप यांना लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला. घरापासून पाच किमी चालत इयत्ता 5 वी पर्यंतचं शिक्षण घ्यावं लागलं होतं. वीर प्रताप सिंह यांचे प्राथमिक शिक्षण आर्य समाज शाळा, कोरोरा येथून आणि सहावीपर्यंतचे शिक्षण सूरजभान सरस्वती विद्या मंदिर शिकारपूर येथून झाले. शेतकऱ्यांचा मुलगा ते IAS चा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. सर्वात मोठी अडचण पैशांची होती पण वडील आणि भावानं मला पाठबळ दिलं आणि तीव्र इच्छा शक्तीमुळे मी यशस्वी होऊ शकलो असं वीर प्रताप सिंह सांगतात. हे वाचा- एकेकाळी रस्त्यावर विकायचा बांगड्या…जिद्दीच्या जोरावर आज आहे IAS ऑफिसर हे वाचा- वडिलांना झाला कॅन्सर, अवघ्या 22 व्या वर्षी तरुणीनं IAS परीक्षेत मिळवलं अव्वल यश
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.