दारू विकून मिळालेल्या पैशातून घेतलं शिक्षण, IAS राजेंद्र भारूड यांचा प्रेरणादायी प्रवास

दारू विकून मिळालेल्या पैशातून घेतलं शिक्षण, IAS राजेंद्र भारूड यांचा प्रेरणादायी प्रवास

आईची मेहनत आणि विश्वास, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर राजेंद्र भारूड UPSC परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

  • Share this:

धुळे, 13 मे: दारू पिण्यासाठी ज्या घरात रात्रंदिवस लोकांची गर्दी होते अशा ठिकाणी अभ्यास कऱण्याचं मन तरी कसं होईल असा साधा विचार मनात केला तरी अंगावर काटा येतो. मात्र अशाच हालाकीच्या परिस्थितीवर मात देऊन डॉ. राजेंद्र भारूड यांनी UPSC परीक्षेत अव्वल यश मिळवलं होतं. त्यांचा IAS चा प्रवास नुकसता प्रेरणादायीच नाही तर कठीण परिस्थितीवर मात करून अशक्य ते शक्य कसं करायचं हा सांगणारा आहे.

धुळ्यात राजेंद्र भारूड यांचा जन्म झाला. जन्मा आधीच वडिलांचा मृत्यू झाल्यानं राजेंद्र यांच्या आईला गर्भ पाडण्यासाठी पिच्छा पुरवला पण आईनं मुलाला जन्म देण्याचा ठाम निश्चय केला आणि राजेंद्र यांचा जन्म झाला. घरी अठराविश्व दारिद्र्य आणि तीन मुलांचा सांभाळ करणं हे माऊली समोर आव्हान होतं. आदिवासी समुदायात उदर्निवाहासाठी दारू तयार करून विकणं हे त्यावेळी पैसे मिळवण्याचं साधन होतं. त्यामुळे आई दारू तयार करून विकत असे. ज्या वयात मूल रडल्यानंतर दुधाची गरज होती तिथे तीनं आम्हाला दारूचे तीन थेंब पाजून झोपवत होती. असं भारूड यांनी सांगितलं.

हे वाचा-मुंबईत 93 वर्षांच्या वृद्ध महिलेनं कोरोनाला हरवलं, डॉक्टरांनीही केलं कौतुक

हळूहळू राजेंद्र गारूड हे देखील आईला छोट्यामोठ्या कामात हातभार लावू लागले. त्याबदल्यात त्यांना येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे मिळत. त्या पैशांमधून त्यांनी पुस्तक घेऊन अभ्यास केला. त्यांना पुस्तकांची गोडी लागली आणि त्यातून शिकण्याची आवड निर्माण झाली. पुढे 10 आणि 12 वीमध्ये त्यांनी 90 टक्के मिळवून आपलं नाव उज्ज्वल केलं. 2006 रोजी त्यांनी मेडिकलची परीक्षा दिली. तिथेही त्यांनी बेस्ट स्टुडंट अॅवॉर्ड मिळवलं. त्यावेळी सर्वजण त्यांना चिडवायचे दारू विकणाऱ्या आईचा मुलगा पुढे जाऊन तेच काम करणार. ही गोष्ट राजेंद्र यांच्या मनाला खोलवर लागली आणि त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्धार केला.

आईची मेहनत आणि विश्वास, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर राजेंद्र भारूड UPSC परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले. जिल्हाधिकारी झाल्यानंतर पहिल्यांदा आईला मी भेटलो तेव्हा तिचा विश्वासच बसत नव्हता. तिचे डोळे पाणावले होते असं राजेंद्र यांनी सांगितलं.

जेव्हा गावातील लोक आणि मोठे नेते आणि अधिकारी त्यांचे स्वागत करायला आले तेव्हा त्यांना खात्री झाली. त्यावेळी ती फक्त आनंदानं रडत राहिली. राजेंद्र जी म्हणतात की आज जे काही आहे ते फक्त आईच्या विश्वासामुळे आहे. राजेंद्र भारुड हे 2013 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी लिहिलेल्या ड्रीम फ्लाइट या पुस्तकात त्यांनी आपली संघर्षाची कहाणी सांगितली आहे.

हे वाचा-आमिरनं गमावली सर्वात जवळची व्यक्ती, 25 वर्षं सोबत काम करणाऱ्या असिस्टंटचं निधन

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 13, 2020, 10:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या