मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

वडिलांना झाला कॅन्सर, अवघ्या 22 व्या वर्षी तरुणीनं IAS परीक्षेत मिळवलं अव्वल यश

वडिलांना झाला कॅन्सर, अवघ्या 22 व्या वर्षी तरुणीनं IAS परीक्षेत मिळवलं अव्वल यश

2018 मध्ये रितिका जिंदल यांनी UPSC परीक्षेत 88 क्रमांक मिळवला आहे.

2018 मध्ये रितिका जिंदल यांनी UPSC परीक्षेत 88 क्रमांक मिळवला आहे.

2018 मध्ये रितिका जिंदल यांनी UPSC परीक्षेत 88 क्रमांक मिळवला आहे.

    मुंबई, 26 एप्रिल : छोट्या संकटांना किंवा समस्यांना आपण रडत राहातो मात्र जिद्द आणि हिम्मत न हरता देशात 88 क्रमांक मिळवणाऱ्या रितिका जिंदल यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. समस्यांचा डोंगर समोर उभा असतानाही न डगमगता यशाचा मार्ग त्यांनी गाठला. नकारात्मक विचार दूर ठेवून जिद्दीच्या जोरावर त्यांना IASच्या परीक्षेत यश मिळालं आहे. त्यांचा हा प्रेरणादायी आणि जिद्दीचा प्रवास कसा होता जाणून घेऊया. IAS पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत 2018 रोजी यशस्वी झालेल्या रितिका जिंदल पंजाबमधील मोगा इथल्या रहिवासी आहेत. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण पंजाबमध्येच झालं. त्यानंतर त्यांनी दिल्लीत श्री राम कॉलेजमधून कॉमर्स विषयात डिग्री घेतली. रितिकने ग्रॅज्युएशनमध्ये 95 टक्के गुण मिळवले आहेत. अशा परिस्थितीत, UPSC परीक्षेत त्यांनी वाणिज्य आणि लेखापाल यांना पर्यायी विषय म्हणून निवडले. हे वाचा-तुम्हीही होऊ शकता कोरोना वॉरिअर्स, PM मोदींनीच सांगितली प्रक्रिया 2018 मध्ये रितिका जिंदल यांनी UPSC परीक्षेत 88 क्रमांक मिळवला आहे. कॉमर्स अँड अकाउंटन्सी या विषयात त्यांनी 500 पैकी 300 गुण मिळाले आहेत. या परीक्षेआधी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पहिल्यांदा परीक्षा देताना वडिलांना जीभेचा कॅन्सर आणि त्यानंतर दुसऱ्यांदा फुफ्फुसांचा कॅन्सर झाला होता. अशा परिस्थित स्वत: मनानं खचून न जाता आणि घरच्यांनाही आधार देऊन त्यांनी आपलं लक्ष्य गाठलं. जर तुम्ही हसाल तर तुमच्यात लढण्याची हिम्मत येईल असं रितिका म्हणतात. रितिकानं अवघ्या वयाच्या 22 व्या हे यश मिळवलं आहे. त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. मेहनत, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जिद्दीनं आपलं लक्ष्य गाठलं पाहिजे. केवळ अभ्यास करून नाही तर सातत्यानं सराव करणं आवश्यक आहे असं रितिका म्हणतात. परीक्षेच्या तयारीबरोबरच उत्तर लेखनही महत्त्वाचे आहे. हे छोटे विषय लक्षात ठेवून आपण सहजपणे ही परीक्षा क्रॅक करू शकता. हे वाचा-प्रत्येक व्यक्तीमध्ये Corona ची विविधं रूपं; का करतोय व्हायरस स्वत:मध्ये बदल?
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Delhi, Panjab

    पुढील बातम्या