मराठी बातम्या /बातम्या /करिअर /एकेकाळी रस्त्यावर विकायचा बांगड्या...जिद्दीच्या जोरावर आज आहे IAS ऑफिसर

एकेकाळी रस्त्यावर विकायचा बांगड्या...जिद्दीच्या जोरावर आज आहे IAS ऑफिसर

परिस्थितीसमोर हार मानून गुडघे न टेकता त्यांनी मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

परिस्थितीसमोर हार मानून गुडघे न टेकता त्यांनी मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

परिस्थितीसमोर हार मानून गुडघे न टेकता त्यांनी मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

मुंबई, 08 मे : एखादी गोष्ट जर तुम्ही मनापासून आणि जिद्दीनं मिळवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट आपल्याला मिळाल्याशिवाय राहात नाही. परिस्थितीशी दोन हात करून IAS होण्याचं स्वप्न बांगडी विकणाऱ्या व्यक्तीनं साकार केलं आहे. परिस्थितीसमोर हार मानून गुडघे न टेकता त्यांनी मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. राजेश घोलप यांनी आपल्या परिस्थितीवर मात करून यश मिळवलं आहे. आज ते अनेक तरुणांचं प्रेरणास्थान बनले आहेत. रमेश यांच्या डाव्या पायाला पोलिओ झाला होता आणि घरची परिस्थितीही बिकट होती. त्यामुळे घर चालवण्यासाठी त्यांची आई रस्त्यावर बांगड्या विकायचं काम करायची. आईसोबत त्यांनी हे काम करावं लागत होतं. रमेश यांनी प्रत्येक अडचणीवर मात करून आपलं IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

रमेश यांच्या वडिलांचं सायकलचं दुकानं होतं मात्र त्यांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे त्यांचं मोठं नुकसान झालं. वडिलांना दारूमुळे त्रास झाला आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं. त्यानंतर घर चालवण्याची जबाबदारी आईवर आली आहे. त्यामुळे आईनं बांगड्या विकून घर चालवत होती. गावात आपलं शिक्षण पूर्ण करून पुढच्या शिक्षणासाठी त्यांना काकांकडे जावं लागलं.

हे वाचा-VIDEO: रत्नागिरीमधून कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट

2005 साली रमेश हे 12 वी मध्ये असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. काकांच्या गावातून त्याच्या घरी जाण्यासाठी बसने 7 रूपये खर्च करायचे पण अपंग असल्यामुळे रमेश फक्त 2 रुपये आकारत असे पण वेळ बघा, त्यावेळी रमेश यांच्याकडे 2 रुपयेही नव्हते.

रमेश हे शेजार्‍यांच्या मदतीने त्यांच्या घरी पोहोचला. रमेश यांनी 12 वी मध्ये 88.5% गुणांसह परीक्षा दिली. डिप्लोमा करण्याबरोबरच बीएची पदवीही मिळवली. त्यानंतर शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी करून कुटुंबाचा खर्च चालवला. पण तरीही त्यांचं अंतिम ध्येय IAS होण्याचं होतं.

2012 मध्ये रमेश यांच्या मेहनतीला फळ मिळालं आहे. त्यांनी UPSC परीक्षेमध्ये 277 वा क्रमांक मिळवला. कोणतीही कोचिंग क्लास न लावता त्यांना मेहनतीत परीक्षेत यश मिळळवलं आहे.

हे वाचा-'लुडोला दिली ओसरी...' सुबोध भावेनं शेअर केलेल्या फोटोची काय आहे भानगड!

First published:

Tags: Coronavirus, Upsc exam