मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Board Exam 2020 : commerceच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करावी?

Board Exam 2020 : commerceच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करावी?

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी विषयानुसार झटपट आपली तयारी कशी करायची या संदर्भातील काही खास टिप्स

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी विषयानुसार झटपट आपली तयारी कशी करायची या संदर्भातील काही खास टिप्स

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी विषयानुसार झटपट आपली तयारी कशी करायची या संदर्भातील काही खास टिप्स

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 08 फेब्रुवारी: बारावीच्या परीक्षांना अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. 18 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होत आहे. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स अशा तिन्ही स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांचे पेपर असणार आहेत. आपण सायन्स स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांनी अंतिम टप्प्यात कसा अभ्यास करायचा हे पाहिलं. आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी विषयानुसार झटपट आपली तयारी कशी करायची या संदर्भातील काही खास टिप्स आपण पाहणार आहोत. कॉमर्स विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक भाषा विषय असतोच या शिवाय Accountacy, Business Studies, गणित, अर्थशास्त्रासह इतर विषय असतात. प्रत्येक विषयात किमान मार्क मिळवण्यासाठी काही टेक्निक्सचा वापर केला तर आपल्याला टेन्शन न घेता पास होता येईल. यासाठी आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहाणं, थोडंस जादा वेळ काढून महत्त्वाचे धडे कोणते आहेत याचा आराखडा तयार करणं गरजेचं आहे. Accountacy- हा विषय म्हटलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा आणि म्हटलं तर नापास होण्याच्या कचाट्यात अडकवणारा आहे. त्यामुळे Accountacyचे बेसिक्स क्लीअर असणं फार महत्त्वाचं आहे. ते नसतील तर तुम्हाला पेपर सोडवताच येणार नाही. त्यामुळे त्या आपल्या मित्र मैत्रिणींकडून आधी क्लिअर करून घ्या. बॅलन्स शीटचा आराखडा योग्य पद्धतीनं तयार करा. जिथे आवश्यकतेनुसार नोट लिहावी. अथवा माहिती द्यावी. हेही वाचा-Board Exam 2020 : परीक्षेआधी येणारा ताण 5 सोप्या टिप्सने करा दूर कंपनीची खाती, रोख प्रवाह स्टेटमेन्ट आणि भागीदारी संस्था यासारख्या काही प्रश्नांसाठी संपूर्ण कागदाचा 60% भाग कव्हर करण्यात आलेला असतो. सूत्र वाचा आणि समजून घ्या. इथे आपल्याला मनानुसार लिहिता येत नाही त्यामुळे उत्तरं ही अतिशय परफेक्ट असणं आवश्यक आहे. Business Studies- हा विषयही मार्क मिळवून देणारा आहे. यामध्ये येणारे विषय हे गणितं आणि लेखन असं असतं. म्हणजे सबजेक्टीव प्रश्न असतात. कंपनीची भागीदारी, कंपनीचे कायदे यांचे नियम इत्यादी. सक्रेटरी प्रॅक्टीस, ऑर्गनायझेशनल बिहेवियर सारखे विषय हे नीट समजून घेतले तर आपल्याला लिहायला सोपे जातील. हे विषय समजून घेऊन आपल्या भाषेत लिहिता येतात मात्र सूत्र आणि व्याख्या आणि कंपनीचे कायदे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. अर्थशास्त्र- यामध्ये आपल्याला मागणी, पुरवठा, दरवाढ यासोबतच जीडीपी, बजेट यावर असल्यानं त्या धड्यांमधील आकृत्या आणि नियम हे पाठ करणं गरजेचं आहे. लक्षात राहात नसेल तर लिहून काढा. प्रत्येक नियम आणि त्याची आकृती आपल्याला मार्क मिळवून देणारी असते. हेही वाचा-SSC Board Exam : कमी वेळात संपूर्ण सिलॅबसचा अभ्यास झटपट कसा कराल? गणित- यामध्ये गणित भाग एक आणि भाग दोन असे विषय असतात. त्यामधले महत्त्वाचे थेअरम, फॉर्म्युले आणि महत्त्वाचे धडे कोणते आहेत. हे लक्षात घ्या. त्यानुसार अभ्यास करा. सगळं करत बसण्याइतका सध्या आपल्याकडे वेळ नाही. जितकं गणित येईल तेवढ्या स्टेप्स सोडवा. इथे प्रत्येत स्टेपला मार्क आहे. इंग्रजी- इंग्रजी विषयाचा पेपर सोडवताना व्याकरणाच्या भागावर लक्ष अधिक केंद्रीत करा. तिथे पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. उताऱ्याचे प्रश्न सोडवा. कोणताही प्रश्न सोडू नका. काहीतरी लॉजिकल उत्तर लिहा. त्यामुळे तुम्हाला तिथे अर्धा ते एक मार्क मिळण्याची संधी असतेच. उताऱ्याचे किंवा कवितेचे प्रश्न, लेटरचा आराखडा, निबंध आपल्या भाषेत सोप्या इंग्रजीत छोटी छोटी वाक्य कमी चुका होईल अशा पद्धतीनं लिहा. तिथे आपल्याला हमखास मार्क मिळण्याची संधी असते. हेही वाचा-Board Exam 2020: फिजिक्सच्या पेपरमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी स्मार्ट टिप्स
First published:

Tags: HSC, Ssc board

पुढील बातम्या