मुंबई, 07 फेब्रुवारी: बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. विज्ञान शाखेत फिजिक्स आणि गणित दोन्ही तसे कठीण विषय. फिजिक्स विषयासाठी अभ्यासाला आणि पेपर सोडवताना दोन्हीकडे वेळ जास्तच लागतो. त्यामुळे चांगले गुण मिळवण्याच्या दृष्टीनं अभ्यास करणं अंतिम टप्प्यात शक्यच नसतं. मग अशावेळी काही सोप्या टिप्सचा आधार घेऊन स्मार्ट वर्क करावं लागतं. त्यामुळे आपल्याला कमी कलावधीत चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवता येतात. 1. प्रश्न पत्रिकेचा आराखडा समजून घ्या, प्रश्न पत्रिकेतील असलेल्या प्रश्नांना किती गुण आहेत आणि एका प्रश्नाला किती पर्याय आहेत. त्यानुसार प्रश्नाला किती वेटेज द्यायचं हे ठरवून घ्यायला हवं. 2. प्रत्येक धड्याला साधारण वेजेट ठरलेलं असतं. त्यासंदर्भात शिक्षकांसोबत बोलून घ्या. कोणत्या आकृत्या महत्त्वाच्या आहेत. त्या नजरेखालून पुन्हा पुन्हा घाला. 3. प्रश्नानुसार वेळेचं गणित आखून घ्या. 15 मार्कांचा एक प्रश्न सोडवण्याऐवजी 7 मार्कांचे लहान प्रश्न सोडवण्यावर भर द्या. तिथे आपल्याला वेळ कमी लागतो आणि 7 पैकी साडे सहा पर्यंत मार्क मिळवण्याची संधी असते. 4. हा पेपर गणितासारख असल्यानं कोणत्याही स्टेप वेळ जातो म्हणून परस्पर गाळू नका. इथे प्रत्येक पायरीला महत्त्व आहे. हेही वाचा- Board Exam 2020 : इंग्रजी विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी वापरा 10 सोप्या टिप्स 5. निरीक्षण आणि आलेला रिझल्ट लिहिताना ओव्हर राईट, खाडाखोड करणं टाळा. चुकून खाडाखोड झाली तरीही एक साधी आडवी रेष मारून पुढे लिहायला सुरू करा. 6. उत्तर पत्रिकेतील आकृत्या या शार्प केलेल्या पेन्सिलने ठळक काढाव्यात. त्यांना नीट नावं द्यावीत. आकृती काढून झाल्यानंतर बॉक्स करावा. त्याखाली एक ओळ सोडून पुढे त्या आकृतीसंदर्भात स्पष्टीकरण द्यावे. 7.आवश्यक तिथे ग्राफ, आकृती किंवा सूत्र लिहिण्यास विसरू नका. लिहिलेली सूत्र पेन्सिलिने अधोरेखित केल्यास ठळकपणे उठून दिसतील. 8.प्रयोग करीत असताना, प्रथम पेन्सिलने निरीक्षण टेबल भरा, निकाल निश्चित झाल्यानंतर पेनानं भरावा. 9. परीक्षेची तयारी करताना मागील काही वर्षांचे फेब्रुवारी आणि ऑक्टोबरचे पेपर पाहा. त्यामध्ये कोणत्या प्रश्न किंवा धड्यावर जास्त भर दिला आहे याचा थोडा अभ्यास करा. त्यानुसार टेन्किक वापरून अभ्यास करावा. 10. फिजिक्सच्या फॉर्म्युल्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ते लिहिण्यासोबत मुद्देसूत लिहण्यावर भर द्या. जितकं मुद्देसूत आणि सोप लिहाल तेवढी आपली उत्तर पत्रिका चांगली दिसेल. हेही वाचा- नोकरी शोधताना होऊ शकते फसवणूक, वापरा ‘या’ सोप्या 5 टिप्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.