जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Board Exam : अभ्यासात लक्ष नसेल लागत तर घाबरू नका! वापरून पाहा 'ही' ट्रिक

Board Exam : अभ्यासात लक्ष नसेल लागत तर घाबरू नका! वापरून पाहा 'ही' ट्रिक

Board Exam : अभ्यासात लक्ष नसेल लागत तर घाबरू नका! वापरून पाहा 'ही' ट्रिक

बऱ्याचवेळी परीक्षेआधी अभ्यासात आपलं मन लागत नाही अशावेळी नेमकं काय करायचं? वाचा सविस्तर.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी: इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 03 मार्चपासून सुरू होत आहे. शेवटच्या टप्प्यात अभ्यासाचा अतिरेक झाल्यानं कंटाळा आलेला असतो. मन लागत नाही. बऱ्याचदा केलेला अभ्यास तणावामुळे लक्षात राहात नाही. अशावेळी आपण अस्वस्थ होतो. पण शेवटचे काही तास महत्त्वाचे असतात अशावेळी आपलं लक्ष विचलीत होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. आज आम्ही तुम्हाला यासाठी मदत करणार आहोत. 1. आपण अभ्यास करण्याआधी एकाजागी शांत चित्तानं बसा. दोन मिनिटं शांत बसा आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. 2. ऊँ कार म्हणावा, किंवा स्तोत्र म्हणावं. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. 3. अभ्यासाला बसण्याची जागा स्वच्छ आणि प्रसन्न हवी. तिथे मनोरंजनाचं कोणतंही साधन नसावं. उदा. मोबाईल, टीव्ही इत्यादी. परीक्षा संपेपर्यंत मोबाईलपासून कटाक्षानं दूर राहा. याशिवाय आपण जे वाचलं ते सतत आठवण्याचा प्रयत्न करा. त्याची रिव्हिजन करा. हेही वाचा- SSC Board Exam : कमी वेळात संपूर्ण सिलॅबसचा अभ्यास झटपट कसा कराल? 4. रोज 20 मिनिटं ध्यान करा. मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपली एकग्रता वाढते याशिवाय आपण विसरणार नाही याची खात्री वारंवार स्वत:च्या मनाला द्या. आत्मविश्वास वाढवा. आहार, आपल्या आहाराचाही आपल्यावर परिणाम होत असतो. परीक्षेच्या काळात पौष्टीक आहार घ्या. ज्यामुळे अति आळस येणार नाही किंवा आजारी पडण्याची भीती राहणार नाही. दूध, फळ खाण्यावर अधिक भर द्या. 5. अभ्यास करताना मनोरंजन करण्याची इच्छा झाली तर स्वत:वर नियंत्रण ठेवा. अशावेळी उठून 10 मिनिटं शातंपणे ब्रेक घ्या. यामध्ये मनोरंजनाची साधनं वापरू नका पण मोकळ्या हवेत शांत फिरा, किंवा रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. हेही वाचा- Board Exam 2020 : भाषा विषयांचा अभ्यास करताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा हेही वाचा- SSC BOARD EXAM: 15 दिवसांत अभ्यास करून मिळवा 90 टक्के मार्क

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात