मुंबई, 09 फेब्रुवारी: इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 03 मार्चपासून सुरू होत आहे. यामध्ये सर्वात सोप पण लिहायचा कंटाळा येणारे विषय म्हणजे भाषा हिंदी, मराठी, संस्कृत, इंग्रजी यापैकी इंग्रजीसाठी आपण टिप्स पाहिल्या होत्या. आता बाकी तीन विषयांसाठी पेपरला जाण्याआधी काय महत्त्वाचं लक्षात ठेवायला हवं ज्यामुळे आपल्याला चांगले गुण मिळू शकतात हे जाणून घेऊया.
1. भाषेच्या पेपरला जाण्याआधी धड्यांची नाव आणि त्याचे लेखक कोण आहेत हे तोंडपाठ करा. उत्तर लिहिताना प्रस्तावना उत्तर आणि समारोप अशी उत्तर लिहिण्याची पद्धत ठेवा.
2. पत्रलेख आणि निबंध लिहिताना खाडोखोड करू नका निबंधामध्ये एक बाजू मांडण्याऐवजी दोन्ही बाजू मांडून त्यानंतर आपलं मत मांडावं किंवा आपल्याला काय वाटतं ते मांडावं.
3. हिंदी आणि मराठी विषयांसाठी लिखाण खूप असल्यामुळे प्रत्येक प्रश्नासाठी वेळ ठरवून घ्या. वेळ संपल्यानंतर पुढील प्रश्नाकडे जा अन्यथा पेपर हमखास राहुन जातो.
4. कोणताही प्रश्न सोडू नका. खाडाखोड आणि चुका टाळा त्यामुळे आपल्याला अधिक जास्त मार्क मिळण्यासाठी मदत होते.
हेही वाचा-HSC-SSC Board Exam : परीक्षेला जाता जाता...या गोष्टी करायला अजिबात विसरू नका
5. संस्कृतसाठी एक उतारा मराठीमध्ये किंवा इंग्रजीत भाषांतरीत करण्यासाठी तर एक निबंध लिहिण्यासाठी येतो. दोन्ही विषय मार्क मिळवून देणारे असता.
6. याशिवाय 8 ते 12 मार्कांचं व्याकरण पक्क केलं तर तिथेही पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची संधी असते.
7. भाषा विषयाचा अभ्यास करताना गाईडचा वापर करण्याऐवजी पुस्तकावर भर द्यावा. आणि आपल्या शब्दात उत्तर लिहावं. उत्तरामध्ये म्हणी, वाक्प्रचार, अलंकारांचा वापर करावा.
8. अभ्यास करताना धड्याचं वाचन प्रस्तावनेपासून बारकाईनं करावं. त्यामुळे प्रश्न कितीही फिरवून आला तरीही उत्तर लिहिणं सोपं होतं.
9. मागील तीन वर्षाचे पेपर वेळ लावून सोडवा. त्यामुळे प्रश्न कसे विचारले जातात याचा अंदाज येईल आणि सरावही होईल.
10. भाषा विषय सोपा असला तरीही तितकाच मार्क घालवणारा असतो. छोट्या चुका ऱ्हस्व, दीर्घ किंवा उत्तराचे संदर्भ चुकल्यानं मार्क जाऊ शकतात.
हेही वाचा-Board Exam 2020 : commerceच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करावी?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.