मराठी बातम्या /बातम्या /करिअर /हिंदू मुलीने पाकिस्तानात रचला इतिहास; हजारोंमधून तिला मिळाली बदल घडवण्यासाठी सिस्टमचा भाग होण्याची संधी

हिंदू मुलीने पाकिस्तानात रचला इतिहास; हजारोंमधून तिला मिळाली बदल घडवण्यासाठी सिस्टमचा भाग होण्याची संधी

डॉ. सना राम चंद हिने पाकिस्तानमध्ये इतिहास रचलेला आहे.

डॉ. सना राम चंद हिने पाकिस्तानमध्ये इतिहास रचलेला आहे.

डॉ. सना राम चंद (Dr. Sana Ram Chand)हिने पाकिस्तानमध्ये इतिहास रचलेला आहे. डॉ. सना सेंट्रल सुपिरीयर सर्विस (CSS) परीक्षा पास करुन पाकिस्तानच्या प्रशासकिय सेवेत (Administrative Service) रूजू होणार आहेत.

कराची 11 मे: पाकिस्तानमध्ये एका हिंदू मुलींचं नाव सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात (Pakistan Sindh Province) राहणारी डॉ. सना राम चंद (Dr. Sana Ram Chand)हिने पाकिस्तानमध्ये इतिहास रचलेला आहे. डॉ. सना सेंट्रल सुपिरीयर सर्विस (CSS) परीक्षा पास झाल्या असून  पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेत (Administrative Service) रूजू होणार आहेत. त्यांना जिल्हा प्रबंधक समूह म्हणजे DMG या पदावर नियुक्ती मिळाली आहे.

डॉ. सना यांनी 2020 मध्ये CSS साठी परिक्षा दिली. 18,553 जणांनी यावर्षी पाकिस्तानमध्ये CSSची परीक्षा दिली. या परिक्षेत केवळ 2 टक्के परिक्षार्थी पास होतात. यावेळी केवळ 221 जणांनी ही परिक्षा पास केली. परिक्षेनंतर मुलाखत घेऊन यातील केवळ 79 महिलांची निवड करण्यात आली. ज्यात सना यांचं नावही आहे.

(Corona Warrior मुलांना मिठी मारणं काय भेटणंही टाळतायत डॉक्टर, धैर्याला सलाम)

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात 20 लाख हिंदू राहतात. डॉ. सना शिक्रापूर जिल्ह्यातल्या कस्बा चकमध्ये राहतात. याच ठिकाणी त्यांचं कॉलेजपर्यंतचं शिक्षण झालं आहे. त्यानंतर त्यांनी सिंध प्रांतातल्या चांडका मेडिकल कॉलेज (Chandka Medical College) मध्ये MBBS केलं आणि कराची मधल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये (Civil Hospitalहाऊस जॉब सुरु केला. एवढच नाही तर, CSS पास झाल्यानंतरही त्यांनी आपलं शिक्षण सोडलेलं नाही. त्या सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी ऍन्ड ट्रांसप्लांट (SIUT) मधून यूरोलॉजीमध्ये FCPS करत आहेत. काहीच महीन्यात त्या सर्जन (Surgeon) बनणार आहेत.

(FD व्याजदरात या बँकेने केला बदल,जास्त फायदा मिळवण्यासाठी तुमच्यासाठी चांगली संधी)

डॉ. सना यांचे वडीलही आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे चार बहिणींमध्ये सर्वात हुशार असणाऱ्या सनाने डॉक्टर बनावं असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. मात्र डॉक्टर बनल्यानंतरही जेव्हा त्यांनी सिव्हील सर्विसमध्ये जाण्याचा विचार व्यक्त केला. तेव्हा आई-वडिलांनी विरोध केला. मात्र, एकदाच प्रयत्न करण्याच्या अटीवर त्यांना परवानगी मिळाली. जेव्हा CSS चा निकाल लागला आणि डॉ. सना यांचा फोटो सर्वत्र झळकू लागला तेव्हा घरच्यांचा विरोधही निवळला आणि त्यांनी सना यांना सिव्हील सर्विसमध्ये जाण्यासाठी परवानगी दिली.

सना लहानपणापासूनच खुप हुशार आहेत. ज्या परिक्षांच्या तयारीसाठी इतरांना सहा महिन्यांचा वेळ लागते. त्या परिक्षांचा अभ्यास एका महिन्यात पूर्ण करुन त्या पासही होतात. मात्र, त्यासाठी समर्पीत होऊन अभ्यास करण्याचा सल्ला डॉ. साना देतात. डॉ. सना यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगीतलं आहे की, "जेव्हा CSS करायचं ठरवलं त्यानंतर सोशल मीडियापासून संपर्क तोडला. कौटुंबीक कार्यक्रमांनाही गेल्या नाहीत की, कोणाशी कोणताही संपर्क ठेवला नाही".

(मुंबईतील कोरोनाबाधितांना पुण्याच्या वॉररुम फोन, नितेश राणेंचा अजब दावा)

CSSची तयारी करताना सना नोकरीही करत होत्या. 12 तासांची ड्यूटी करुन त्या थेट लायब्ररी गाठून अभ्यास सुरु करायच्या. वेळ कमी पडायचा म्हणून त्या रस्त्यांने चालतानाही अभ्यास करायच्या.

डॉक्टर बनणं हेच सना यांचं स्वप्न होतं. पण, जेव्हा त्यांनी सिंध प्रांतातल्या हॉस्पिटलची दयनीय परिस्थिती पाहिली तेव्हा, आपण डॉक्टर बनण्यापेक्षा सिव्हील सर्वीसमध्ये जाऊन ही परिस्थिती बदलावी हा विचार त्यांच्या मनात आला. ब्युरोक्रसीने सिस्टीम बदलण्याचा अधिकार मिळतो. सिस्टम मध्ये बदल  केवळ डॉक्टर बनून करता येणार नाही हे त्यांना पटलं. त्यानेच डॉ. सना यांच्या  आयुष्याला कलाटणी दिली.

(मित्रच निघाला वैरी! जुन्या वादातून तरुणाची हत्या; नांदेडमधील मन हेलावणारी घटना)

सिंध प्रातातल्या बहुतांश मुली आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्येच जातात. मात्र आता इथल्या मुलींची मतं बदललेली आहेत. मुली पोलीस आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित क्षेत्राकडेही वळत आहेत. तर, आता डॉ. सना यांच्यामुळे सिव्हील सर्वीसकडेही इथल्या मुली वळतील असा विश्वास निर्माण झाला आहे.

First published:

Tags: Inspiration, Inspiring story, Success stories