मराठी बातम्या /बातम्या /मनी /

FD व्याजदरात या बँकेने केला बदल, जास्त फायदा मिळवण्यासाठी तुमच्यासाठी चांगली संधी

FD व्याजदरात या बँकेने केला बदल, जास्त फायदा मिळवण्यासाठी तुमच्यासाठी चांगली संधी

अलीकडच्या काळात मुदत ठेव योजनेचे व्याजदर कमी होत असल्यानं लोक त्याकडं पाठ फिरवत आहेत. हे लक्षात घेऊन जन स्मॉल फायनान्स बँकेनं (Jana Small Finance Bank) आपल्या मुदत ठेव योजनेचे व्याजदर चांगलेच वाढवले आहेत

नवी दिल्ली, 11 मे: सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारा गुंतवणूकीचा (Investment) पर्याय म्हणजे मुदत ठेव अर्थात फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit). कमी जोखीम आणि चांगला परतावा ही महत्त्वाची वैशिष्ट्ये असलेली ही गुंतवणूक योजना नेहमीच सर्वसामान्य लोकांच्या पसंतीचा गुंतवणूक पर्याय ठरली आहे. वेळप्रसंगी या योजनेतून मुदतीपूर्वीही पैसे काढता येतात. त्यामुळं भारतात सर्वाधिक गुंतवणूक मुदत ठेव योजनांमध्ये होत असते.

सर्वसामान्य लोक बँका, पोस्ट ऑफीस अशा ठिकाणी आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या मुदतीच्या ठेव योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. या ठेवींवर मिळणारे व्याज या ग्राहकांसाठी महत्त्वाचे असते. यात मुद्दलही सुरक्षित राहते आणि त्यावर चांगले व्याजही मिळते. मात्र अलीकडच्या काळात मुदत ठेव योजनेचे व्याजदर कमी होत असल्यानं लोक त्याकडं पाठ फिरवत आहेत. हे लक्षात घेऊन जन स्मॉल फायनान्स बँकेनं (Jana Small Finance Bank) आपल्या मुदत ठेव योजनेचे व्याजदर चांगलेच वाढवले असून, बँक 5 ते 10 वर्षे मुदतीच्या ठेवींवर 7 टक्के व्याजदर देत आहे. 7 मे 2021 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत.

हे वाचा-तुमचं SBI सॅलरी अकाउंट आहे का? स्वस्त लोन आणि लॉकरसह मिळतील हे 5 मोठे फायदे

6 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 4.50 टक्के  व्याजदर :

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी बँका आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून  ते 10 वर्षापर्यंत मुदत ठेव देण्याची सुविधा देतात. जन स्मॉल फायनान्स बँकेनंही  7 दिवसांपासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुदत ठेवींवर वाढीव व्याजदर जाहीर केले आहेत. बँक 7 ते 14 दिवसांच्या ठेवीवर  2.5 टक्के दरानं व्याज देत आहे. 15 दिवस ते 60 दिवसांच्या ठेवींवर 3 टक्के, तर 61 ते 90 दिवसांच्या ठेवीवर 3.75 टक्के दरानं व्याज दिलं जाणार आहे. 3 महिन्यांपासून 6 महिन्यांच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना 4.50 टक्के दराने व्याज मिळेल.

हे वाचा-SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बचत खातं घरबसल्या करा दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर

3 ते 5 वर्ष मुदतीकरता 6.75 टक्के व्याजदर,  ज्येष्ठ नागरिकासाठी 0.5 टक्के जास्त दर

6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीतील मुदत ठेवींवर बँक 5.50 टक्के आणि 1 वर्षानंतरच्या मुदतीसाठी 6.25 टक्के व्याजदर देत आहे. त्याचवेळी, 1 वर्षापेक्षा जास्त मात्र  3 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवीवर 6.50 टक्के व्याजदर असून, 3 ते 5 वर्ष कालावधीच्या  ठेवीवर 6.75 टक्के व्याजदर देण्यात आला आहे. 5 वर्ष ते 10 वर्ष मुदतीच्या मुदत ठेवींवर 7 टक्के दरानं व्याज मिळेल. या सर्व मुदत ठेव योजनांवर ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) 50 आधारभूत अंक (50 Basis Points) म्हणजेच अर्धा टक्का जास्त व्याजदर मिळणार आहे.

First published:

Tags: Fixed Deposit, Investment, Money