मुंबई, 11 मे: राज्यात कोरोनाने (Maharashtra corona cases) थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भिती वर्तवली जात आहे. पण अशा परिस्थितीतही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील (Mumbai corona cases) कोरोनाबाधित रुग्णांना पुण्यातील वॉररुममधून फोन येतात, असा दावाच केला आहे. महाविकास आघाडी सरकारवर एकदाही टीकेची संधी न सोडणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा गंभीर गंभीर आरोप केला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची नोंद मुंबई सोडून पुणे आणि इतर शहरात करणे हाच मुंबई पॅटर्न आहे का? असा सवाल करत नितेश राणेंनी मुंबई पॅटर्नची खिल्ली उडवली आहे.
Is the so called #MumbaiModel all about transferring patients to Pune n other cities ??
— nitesh rane (@NiteshNRane) May 11, 2021
Many tell me..Once some1 gets positive in Mumbai..he/she receives follow up calls from Pune covid war room..
That’s how the numbers r reduced for the sake of PR n a fake Mumbai Model?
मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना पुण्यातील वॉररुममधून फोन कॉल येतो, अशा प्रकार या महाविकास आघाडी सरकारने कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी कमी दाखवत आहे, असा आरोपही राणेंनी केला.
“Transferring” means the patient is still in Mumbai but shown as a Pune patient to reduce the Mumbai numbers..No wonder other cities have high numbers n Mumbai is at its lowest!!
— nitesh rane (@NiteshNRane) May 11, 2021
Full Golmaal!!
कोरोना रुग्ण हे मुंबईतून पुण्यात हलवले जातात, पण रुग्ण हलवले जात नसून फक्त आकडेवारी हलवली जात आहे. त्या रुग्णांची नोंद इतर शहरात होत आहे. त्यामुळे मुंबईची आकडेवारी ही इतर शहरांच्या मानाने कमी दाखवली जात आहे, असंही नितेश राणे म्हणाले.