Home /News /news /

Corona Warrior मुलांना मिठी मारणं काय भेटणंही टाळतायत डॉक्टर, कोरोना योद्ध्यांच्या धैर्याला सलाम

Corona Warrior मुलांना मिठी मारणं काय भेटणंही टाळतायत डॉक्टर, कोरोना योद्ध्यांच्या धैर्याला सलाम

Riva doctor family corona threat पत्नीला कोरोना झाल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना लागण होऊ नये म्हणून कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर कुटुंबापासून दूर राहत आहेत.

    रिवा (म.प्र) , 11 मे : कोरोनाच्या (coronavirus) संकटकाळात डॉक्टर (Doctor) हे देवदूत नव्हे तर देवासारखं काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा (corona patient) जीवन वाचवण्यासाठी त्यांना आपल्या कुटुंबापासून (Family) दुरावाही सहन करावा लागतोय. कारण त्यांच्यामुळं कुटुंबीयांना संसर्ग (corona infection threat) होण्याचा धोका असतो. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) रीवा (Riwa) येथील डॉ. पंकज सिंह गहरवार हेदेखिल कोरोनाच्या संकटात कुटुंबापासून दूर राहत रुग्णसेवा करतायेत. त्यांची लहान मुलं समोर असूनही ते त्यांना जवळ घेऊ शकत नाहीत. रिवा येथील मऊगंज रुग्णालयात डॉ. पंकज सिंह गहरवार हे बीएमओ पदावर कार्यरत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहावं लागतं. यामुळं डॉ. पंकज यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मुलं आणि कुटुंबातील इतर सदस्यांना लागण होऊ नये म्हणू डॉक्टर पंकज हे दहा दिवसांपासून कुटुंबापासून वेगळे राहत आहेत. डॉ. पंकज गहरवार यांनी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी घरही सोडलं आहे. (वाचा-WhatsApp: 15 मेपर्यंत Privacy Policy न स्वीकारल्यास अकाउंट बंद होणार नाही, पण...) डॉ. पंकड हे सध्या त्यांच्या जुन्या घरामध्ये एकटेच राहतात. त्यांच्याकडे कुटुंबातील दुसरे कोणतेही सदस्य जात नाहीत. कुटुंबीय बाहेरच त्यांच्यासाठी जेवण ठेवून निघून जातात. कुटुंबातील सदस्यांशी बोलणं गरजेचंच असेल तर ते फोनवर बोलतात, पण एकमेकांशी संपर्क त्यांनी टाळला आहे. डॉ. पंकड जेव्हाही घरी जातात तेव्हा मुलं धावत त्यांना भेटायला येतात. पण त्यांनी कोरोनामुळं मुलांशी दुरावाच ठेवला आहे. अनेक दिवसांपासून तर त्यांनी मुलांना मिठीही मारलेली नाही. (वाचा-Covid-19च्या काळात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट, कोरोना रुग्णांना करतायेत लक्ष्य) डॉ. गहरवार कोविडशिवाय इतर रुग्णांवरही उपचार करतात. त्यांनी कामात एवढं झोकून दिलंय की प्रचंड काम केल्यानं त्यांची तब्येतही बिघडू लागली आहे. आजारपण विसरून पीपीई किट परिधान करून ते रुग्णसेवेसाठी तयार होतात. मऊगंज रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी दहा बेड आहेत. सर्व बेड फुल असून आतापर्यंत तीन रुग्ण बरे झाले आहेत. या संकटाच्या काळात कोरोना रुग्णांवर उपचार करून त्यांना बरं करण्याबरोबरच कुटुंबाला या संसर्गापासून लांब ठेवण्याची जबाबदारी असल्याचंही डॉक्टर सांगतात. यासाठीच कुटुंबापासून दूर जाल्याचं ते म्हणतात. इतर डॉक्टरांनीही कुटुंबीयांना वाचवण्यासाठी अशी पावलं उचलण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आपण कामाने कितीही थकलो असलो तरी घरी गेल्यानंतर चिमुकल्यांच्या एका मिठीनं सर्व थकवा दूर होतो. पण अशा कोरोना वॉरीयर्सना सध्या एवढा प्रचंड कामाचा ताण आहे आणि थकवा घालवण्यासाठी हे मिठीचं घरगुती औषधही ते वापरू शकत नाही. तरीही काहीही तक्रार न करता कर्तव्य बजावणाऱ्या अशा लाखो कोरोना वॉरीयर्सना सलाम.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Madhya pradesh

    पुढील बातम्या