मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /काय आहे FAME-II सबसिडी, कसा मिळतो Electric Vehicle खरेदीवर बंपर फायदा

काय आहे FAME-II सबसिडी, कसा मिळतो Electric Vehicle खरेदीवर बंपर फायदा

मोटर वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सकारात्मकता आहे. त्यासाठीच भारत सरकार फेम-2 सबसिडीचा फायदा देत आहे.

मोटर वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सकारात्मकता आहे. त्यासाठीच भारत सरकार फेम-2 सबसिडीचा फायदा देत आहे.

मोटर वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सकारात्मकता आहे. त्यासाठीच भारत सरकार फेम-2 सबसिडीचा फायदा देत आहे.

नवी दिल्ली, 28 जानेवारी : भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (Electric Vehicle) हळू-हळू सकारात्मकता दिसून येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित एक नाव फेम-2 (FAME-II) अनेकदा ऐकिवात आहे. ही एक प्रकारची सबसिडी आहे, ज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीवेळी डिस्काउंट उपलब्ध होतो. फेमचा फुल फॉर्म फास्टर अडॉप्शन ऑफ इलेक्ट्रिक व्हिकल्स इन इंडिया (FAME) असा आहे. आणि 2 चा अर्थ याच्या दुसऱ्या एडिशनशी संबंधित आहे. जाणून घ्या काय आहे FAME-II सबसिडी आणि याचा कसा होतो फायदा -

मोटर वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सकारात्मकता आहे. त्यासाठीच भारत सरकार फेम-2 सबसिडीचा फायदा देत आहे. FAME-2 सबसिडी मागील वर्षापासून प्रचलित असून ही 2019 मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती.

हे वाचा - Electric Car: EV खरेदी करण्याचा विचार करताय? मग ही बातमी वाचाच

फेम-2 सबसिडी मिळाल्यास वाहनाच्या खरेदीवर सुरुवातीला 10000 रुपये प्रति किलोवॅट-आर पर्यंत बेनफिट निश्चित करण्यात आला होता. परंतु इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने जून 2021 मध्ये ही मर्यादा वाढवून 15000 रुपये प्रति किलोवॅट-आर केली.

हे वाचा - Electric Vehicle वर सरकार किती इन्सेन्टिव देतं? थेट ग्राहकाला होता फायदा

इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर किती फायदा?

तुम्ही एखादी एथर 450 प्लसची (Ather 450 Electric Scooter) दिल्ली एक्स शोरुम किंमत 1,71,520 रुपये आहे आणि यासह कंपनीने 2.9 किलोवॅट-आर बॅटरी पॅक लावला असेल, तर फेम-2 सबसिडी अंतर्गत 2.9 ने 15000 गुणा केल्यास 43,500 रुपये होतात. जर तुम्ही एथर 459 प्लस खरेदी केली, तर भारत सरकार तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीवर 43500 रुपये सूट देईल. त्यामुळे तुमच्या गाडीची किंमत कमी होवून तुम्हाला 1,28,020 रुपये भरावे लागतील. ही सबसिडी ग्राहकांना खरेदीवेळी मिळेल.

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या बेनिफिटशिवाय इलेक्ट्रिक वाहनांवर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ऑफर्स असतात.

First published:
top videos

    Tags: Car, Electric vehicles, Scooter ride