Home /News /auto-and-tech /

Electric Vehicle वर सरकार किती इन्सेन्टिव देतं? थेट ग्राहकाला होता फायदा

Electric Vehicle वर सरकार किती इन्सेन्टिव देतं? थेट ग्राहकाला होता फायदा

इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर इन्सेन्टिव देत आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होते. हा इन्सेन्टिव वेगवेगळ्या कॅटेगरीतील गाड्यांनुसार मिळतो.

  नवी दिल्ली, 15 जानेवारी : इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर इन्सेन्टिव देत आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होते. हा इन्सेन्टिव वेगवेगळ्या कॅटेगरीतील गाड्यांनुसार मिळतो. फेम-2 स्कीमअंतर्गत (FAME-II scheme) देण्यात आलेल्या सवलतीमुळे इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीत वाढ पाहायला मिळत आहे. नॅशनल पोर्टल ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हा इन्सेन्टिव देश आणि राज्य दोन्ही लेवलवर उपलब्ध आहे. सरकारने फेम-2 स्कीमअंतर्गत तीन वर्षांसाठी 10 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. याअंतर्गत लोकांना स्वस्त दरात ई-व्हीकल उपलब्ध होऊ शकेल. देश स्तरावर कसा असेल इन्सेन्टिव? देश स्तरावर दिला जाणाऱ्या इन्सेन्टिवमध्ये अर्थात डिस्काउंटमध्ये आणि राज्य स्तरावर मिळणाऱ्या इन्सेन्टिवमध्ये फरक आहे. टू-व्हीलर - सध्या सरकारकडून टू-व्हीलरवर फेम-2 स्कीमअंतर्गत प्रति किलोवॅट (kWh) 15 हजार रुपयांचा इन्सेन्टिव मिळतो आहे. हा इन्सेन्टिव वाहनाच्या किंमतीच्या 40 टक्के असतो. टू-व्हीलरमध्ये बॅटरीचा आकार जवळपास 2 kWh असतो. थ्री व्हीलर - फेम-2 स्कीमअंतर्गत तुम्ही थ्री व्हीलर खरेदी करत असाल, तर सरकारकडून यात 10000 रुपये प्रति किलोवॅटच्या दराने इन्सेन्टिव असतो. थ्री व्हीलर बॅटरीचा आकार 5 kWh आहे. फोर व्हीलरमध्ये हा 10 हजार रुपये प्रति किलोवॅट आहे. या वाहनाच्या बॅटरीचा आकार 15 kWh आहे. ई-बस आणि ई-ट्रक सरकारकडून इलेक्ट्रिक बस किंवा ट्रकसाठी फेम स्कीमअंतर्गत इन्सेन्टिव असतो. या वाहनांसाठी इन्सेन्टिव 20 हजार रुपये प्रति किलोवॅट आहे. याच्या बॅटरीचा आकार 250 kWh आहे.

  हे वाचा - नवी बजेट Car घेताय? देशात महाराष्ट्रामध्ये Electric Car वर मिळतेय सर्वाधिक सबसिडी

  दरम्यान, देशात महाराष्ट्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सर्वाधिक 2.5 लाख रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात आहे. सबसिडीसाठी 31 डिसेंबर 2021 शेवटची तारीख होती. परंतु सरकारने या योजनेची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. महाराष्ट्र राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास सर्वाधिक 2.5 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Electric vehicles, Vehicles

  पुढील बातम्या