मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Hero Electric चा मोठा निर्णय; देशभर 1 लाख चार्जिंग स्टेशन्स उभारणार

Hero Electric चा मोठा निर्णय; देशभर 1 लाख चार्जिंग स्टेशन्स उभारणार

हीरो इलेक्ट्रिक आणि चार्जर (Hero-Charzer Agreement) देशभरात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी एकत्र काम करतील. कराराच्या पहिल्या वर्षात चार्जर देशातील टॉप 30 शहरांमध्ये 10,000 चार्जिंग स्टेशन्स स्थापित करेल.

हीरो इलेक्ट्रिक आणि चार्जर (Hero-Charzer Agreement) देशभरात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी एकत्र काम करतील. कराराच्या पहिल्या वर्षात चार्जर देशातील टॉप 30 शहरांमध्ये 10,000 चार्जिंग स्टेशन्स स्थापित करेल.

हीरो इलेक्ट्रिक आणि चार्जर (Hero-Charzer Agreement) देशभरात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी एकत्र काम करतील. कराराच्या पहिल्या वर्षात चार्जर देशातील टॉप 30 शहरांमध्ये 10,000 चार्जिंग स्टेशन्स स्थापित करेल.

मुंबई, 17 नोव्हेंबर : इलेक्ट्रिक व्हेईकल (Electric Vehicle) भविष्य आहे. त्यामुळेच अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन वाढवलं आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करताना चार्जिंग कुठे करायची असा प्रश्न ग्राहकांना पडतो. कारण गाडी चार्ज करण्यासाठी अजूनतरी चार्जिंग स्टेशन्स सहज उपलब्ध नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासोबत चार्जिंक स्टेशन्सची उभारणी करणे देखील गरजेचं आहे. हीच गरज लक्षात घेत हिरो इलेक्ट्रिक (Hero Elecrtic) भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीने तीन वर्षांत देशात एक लाख चार्जिंग स्टेशन्स बसवण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने बंगळुरू येथील EV चार्जिंग स्टार्ट-अप चार्जरशी (Charzer) करार केला आहे.

या कराराअंतर्गत हीरो इलेक्ट्रिक आणि चार्जर (Hero-Charzer Agreement) देशभरात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी एकत्र काम करतील. कराराच्या पहिल्या वर्षात चार्जर देशातील टॉप 30 शहरांमध्ये 10,000 चार्जिंग स्टेशन्स स्थापित करेल.

याशिवाय स्टार्टअप कंपनी चार्जर हिरो इलेक्ट्रिकच्या डीलरशिपमध्ये किराणा चार्जर (Kirana Charzer) स्थापित करेल. यामुळे ग्राहकांना त्यांची इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणे सोपे होणार आहे. कंपनी चार्जर मोबाईल अॅप्लिकेशन आणि इलेक्ट्रिक वाहन मालकांना जवळचे चार्जिंग स्टेशन आणि बुकिंग स्लॉट शोधण्यासाठी वेबसाईट देखील तयार करेल. सबस्क्रिप्शन-आधारित मॉडेलमध्ये (subscription-based model) इलेक्ट्रिक वाहन चालक चार्जिंग सुविधा देखील वापरू शकतात.

सॅमसंगने लॉन्च केला जबरदस्त बजेट Smartphone; पाहा फिचर्स आणि Specifications

हीरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल यांनी सांगितले की, आम्हाला विश्वास आहे की देशातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचे चांगले नेटवर्क असणे आवश्यक आहे. ही भागीदारी देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीस प्रोत्साहन देईल. ग्राहकांना त्यांची वाहने चार्ज करण्याची सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. गिल पुढे म्हणाले की, कंपनी देशात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर काम करत आहे. या भागीदारीद्वारे आम्ही ईव्हीकडे झेपावण्याचे आणि स्वच्छ आणि ग्रीन मोबिलिटी सोल्यूशनला प्रोत्साहन देण्याचे आमचे ध्येय आहे.

Apple कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने iPhone चं पितळ पाडलं उघडं; सिक्रेट्स आले समोर

Charzer हे एक EV स्टार्ट-अप आहे जे सार्वजनिक जागा, अपार्टमेंट आणि कार्यालयांसाठी चार्जिंग सोल्यूशन्स प्रदान करते. हे चार्जर्स सर्व EV मॉडेल्सना सपोर्ट करतात, जे इंटेलिजेंट सॉफ्टवेअरवर चालतात आणि सर्टिफाईड प्रोफेशनल्सद्वारे स्थापित आणि सर्व्हिस केले जातात. कंपनी सध्या बंगळुरू, पुणे, दिल्ली, हैदराबाद, मंगळुरू आणि विशाखापट्टणमसह 20 शहरांमध्ये आहे. या सहयोगाद्वारे, चार्जर हिरो इलेक्ट्रिकचा त्याच्या B2B व्यवसायात चार्जिंग भागीदार असेल.

First published:

Tags: Car, Electric vehicles