मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Tata ची SUV Tata Punch भारतात लाँच, जाणून घ्या जबरदस्त कार्सचे फीचर्स आणि किंमत

Tata ची SUV Tata Punch भारतात लाँच, जाणून घ्या जबरदस्त कार्सचे फीचर्स आणि किंमत

Tata ची मायक्रो SUV Tata Punch भारतात लाँच झाली आहे. ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात जबरदस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Tata ची मायक्रो SUV Tata Punch भारतात लाँच झाली आहे. ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात जबरदस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Tata ची मायक्रो SUV Tata Punch भारतात लाँच झाली आहे. ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात जबरदस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : देशात Tata Punch लाँच होण्यापूर्वीच या कारची मोठी चर्चा होती. अखेर Tata ची मायक्रो SUV Tata Punch भारतात लाँच झाली आहे. ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात जबरदस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मागील अनेक दिवसांपासून SUV Tata Punch ची मोठी चर्चा होती. अखेर या बहुचर्चित कारची भारतात एन्ट्री झाली आहे.

SUV Tata Punch ची सुरुवातीची किंमत 5.49 लाख रुपये आहे. Tata Nexon आणि Tata Altroz नंतर आता Tata Punch ला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. लाँच होण्यापूर्वीच टाटा मोटर्सने टाटा पंच आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात सुरक्षित कार असल्याचं म्हटलं आहे. ग्लोबल NCAP मध्ये टाटा पंचला अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 5-स्टार रेटिंग (16,453) आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 4-स्टार रेटिंग (40,891) मिळालं आहे.

अवघ्या 57 मिनिटांत 25000 Mahindra XUV700 ची विक्री, आता मोजावी लागणार अधिक रक्कम

Tata Punch मध्ये इतर SUV प्रमाणे 4 प्रमुख फीचर्स देण्यात आले आहे. जे त्याला छोट्या साइजमध्ये Complete SUV बनवतात. यात उंच ग्राउंड क्लियरेन्स, कमांडिंग ड्राइव्ह पोजिशन, चांगली स्पेस, हाय-एंड फीचर्स सामिल आहेत. या कारचा ग्राउंड क्लियरेन्स 193mm आहे, जो हॅचबॅक कारमध्ये 170mm आहे. यात 16 इंची डायमंड-कट व्हील आहे, ज्यामुळे ड्राइव्ह अधिक स्मूद ठरतं.

Tata Punch मध्ये 1.2 लीटर रेवोट्रॉन बीएस-6 इंजिन देण्यात आलं आहे, जे डायना-प्रो टेक्नोलॉजीसह येतं. हे इंजिन 85hp क्षमता आणि 113Nm टॉर्क जेनरेट करतं. कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रान्समिशन मोड आहे. त्याशिवाय यात गरजेनुसार, सिटी आणि इको ड्राइव्ह मोड निवडता येतो.

या दिवाळीत Hero Electric Scooter पूर्ण मोफत खरेदी करण्याची संधी,पाहा काय आहे ऑफर

Tata Punch देशातील टॉप-10 कार्समध्ये सामिल करण्यात आली आहे. या कारची साइज 3.82 मीटर आहे. ही कार हॅचबॅक श्रेणीमध्ये एक पॉवरपॅक SUV आहे. टाटा पंच प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz प्रमाणे अल्फा प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आली आहे.

First published:

Tags: Car, Tata group