नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : फेस्टिव्ह सीजनमध्ये अनेकदा वाहन, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर सूट मिळते. यंदाही अनेक कंपन्यांनी नवरात्रीसह आगामी दिवाळीसाठीही खास ऑफर्स आणल्या आहेत. जर तुम्हीही फेस्टिव्ह सीजनमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी कंपनी हिरो इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी एका खास ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत दररोज एका ग्राहकाला हिरो इलेक्ट्रिक स्कूटर फ्रीमध्ये दिली जाणार आहे. तो ग्राहक कोण असेल, याचा निर्णय कंपनी लकी ड्रॉच्या माध्यमातून करेल. कॉन्टेस्टमध्ये विजेत्याची निवड लकी ड्रॉद्वारे केली जाईल.
दिवाळीत टूव्हीलर घेण्याचा विचार आहे? वाचा Royal Enfieldच्या प्रीमियम बाईक्सविषयी
30 दिवस, 30 बाइक्स ऑफर - मंगळवारी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आपल्या सर्व 700 हून अधिक डिलरशिपवर एक मोफत हिरो इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची संधी मिळेल. कंपनीने या ऑफरचं नाव 30 दिवस, 30 बाइक्स असं ठेवलं आहे. कंपनीची ही ऑफर 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2021 पर्यंत सुरू आहे.
नवी कार घ्यायची आहे? Honda Cars वर बंपर डिस्काउंट; 53,500 रुपयांपर्यंत होईल बचत
हिरो इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणारे सर्व ग्राहक या कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकतात. 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2021 दरम्यान स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी दररोज एका विजेत्याला कंपनी एक्स शोरुम किंमत परत करेल.
Bring Joy, Bring Hero home!
— Hero Electric (@Hero_Electric) October 11, 2021
We are making this festive season brighter by gifting free Hero Electric e-bikes every day. Join us in spreading the festive cheer, book your bike today#HeroElectric #SwitchToElectric #GreenMobility #ElectricIsTheFuture #TheSmartMove #FestiveOffer pic.twitter.com/1hsLUNvokB
हिरो इलेक्ट्रिक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून खरेदी करता येईल. अधिक ग्राहक या ऑफरचा फायदा घेण्यासाठी कंपनी EMI सह सोपे फायनान्सिंग ऑप्शनही देत आहे. हिरो इलेक्ट्रिक स्कूटरवर कंपनीकडून पाच वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.