मुंबई, 08 ऑक्टोबर: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा आणि महिंद्राचे (
Mahindra & Mahindra) अध्यक्ष आनंद महिंद्रा (
Anand Mahindra Latest News) यांनी नुकताच आपल्या कंपनीच्या नवीन एसयूव्हीची (
Mahindra & Mahindra New SUV) झलक पाहण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीचे फोटो शेअर करत, आम्ही भारतीय कारवेडे आहोत याचा हा पुरावा अशी प्रतिक्रिया ट्विटरवर (
Anand Mahindra Twitter) दिली आहे. ही गर्दी झाली होती कंपनीने 30 सप्टेंबर 2021 रोजी दाखल केलेल्या XUV700 या नवीन एसयूव्हीसाठी.
महिंद्राच्या या बहुचर्चित एसयूव्हीने बाजारपेठेत दाखल होताच खळबळ माजवली असून तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान महिंद्राकडून असा दावा करण्यात येत आहे की गुरुवारी 7 ऑक्टोबर रोजी या एसयूव्हीच्या पहिल्या 25 हजार बुकिंगसाठी सुरुवात होताच अवघ्या 57 मिनिटांच्या विक्रमी वेळात हे बुकिंग पूर्ण झालं आहे. मिंटने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पहिल्या 25 हजार कारच्या बुकिंगसाठी या एसयूव्हीची किंमतही विशेष (
Special Price for Mahindra & Mahindra SUV) ठेवण्यात आली होती. या 25 हजार बुकिंगनंतर किमती बदलणार असल्याचं कंपनीनं जाहीर केलं होतं. पहिल्या बुकिंगसाठी तिची किंमत (बेस एमएक्स व्हेरियंटसाठी) 11.99 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरू झाली होती. आता पहिली 25 हजार बुकिंग पूर्ण झाल्यानं कंपनीनं पुढील 25 हजार बुकिंगसाठी नवीन किंमती जाहीर केल्या असून, आज सकाळी 10 वाजल्यापासून नवीन बुकिंगला सुरुवात झाली आहे.
नवीन बुकिंगसाठी 5 आसन क्षमता असणाऱ्या एमएक्स पेट्रोल व्हेरियंटची किंमत आता 12.49 लाख (एक्स-शोरूम) रुपये तर डिझेल व्हेरियंटची किंमत 12.99 लाख (एक्स-शोरूम) रुपये करण्यात आली आहे.
नवी कार घ्यायची आहे? Honda Cars वर बंपर डिस्काउंट; 53,500 रुपयांपर्यंत होईल बचत
प्रथम बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या एसयूव्हीचा ताबा मिळण्यासाठी सहा महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पेट्रोल व्हेरियंट (
Petrol Variant SUV) आधी मिळणार असून, डिझेल एमहॉक पॉवरट्रेनयुक्त व्हेरियंटसाठी त्यापुढे आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.
महिंद्रा XUV700 डिझेल आणि पेट्रोल इंजिन प्रकारात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनसह तसेच पाच आणि सात आसनी क्षमतेसह उपलब्ध असून, ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) मध्ये देखील हे पर्याय उपलब्ध आहेत. एमएक्स (MX) आणि अड्रेनॉक्स एएक्स (AdrenoX -AX) अशा दोन मॉडेल्समध्ये ही एसयूव्ही उपलब्ध करण्यात येत असून, AX7 व्हेरियंट पर्यायी लक्झरी पॅकसह उपलब्ध असेल. यामध्ये थ्री डी साउंड, इलेक्ट्रिकली डिप्लॉयड स्मार्ट डोअर हँडल्स, 360 डिग्री सराउंड व्ह्यू, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्क ब्रेक, ड्रायव्हर एअरबॅग, पॅसिव्ह की लेस एंट्री आणि वायरलेस चार्जिंग अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
Mercedes-Benz ने लाँच केली 'मेड इन इंडिया' S-Class, पुण्यात होणार निर्मिती
महिंद्राच्या या बहुचर्चित एसयूव्हीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता, भारतीय बाजारपेठेत एसयूव्हीसाठी असलेली क्रेझ स्पष्ट झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीला मिळणारा प्रतिसाद वाहन कंपन्यांचा उत्साह दुणावणारा आहे. ग्राहकांनाही स्पर्धात्मक किमतीत उच्च दर्जाच्या अत्याधुनिक वाहन खरेदीची संधी यामुळे मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.