नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : देशात Electric Scooter, इलेक्ट्रिक वाहनांची- E Vehicles मागणी वाढत असल्याचं चित्र आहे. पर्यावरणाचं पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या प्रदूणषणापासून संरक्षण करणं, तसंच इंधनाच्या वाढत्या दरांमुळे अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटर्स, कारकडे वळत आहेत. अशातच एका इलेक्ट्रिक स्कूटरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघून त्या स्कूटरला आग लागल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीड मिनिटांच्या हा व्हिडीओ ट्विटरवर एका @in_patrao या ट्विटर युजरने शेअर केला आहे. आतापर्यंत 2800 वेळा हा पाहिला गेला आहे. व्हिडीओमध्ये एक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी असल्याचं दिसतंय. स्कूटरमधून प्रचंड धूर निघत असतो. बराच वेळ मोठ्या प्रमाणात निघालेल्या धूरानंतर वाहनाला आग लागते.
E-Vehicle चालवताना खरंच शॉक बसतो? बॅटरी सेव्हिंगसह जाणून घ्या महत्त्वाच्या Tips
हा व्हिडीओ नेमका कधी आणि कुठे काढण्यात आला आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट नाही. नेहमीच्या पेट्रोल-डिझेल इंधन वाहनापेक्षा लोक आता ई-स्कूटर, बाईकला प्राधान्य देत असताना, अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.
Buy a E Scooter and suffer pic.twitter.com/OGX6CxMmMb
— Patrao (@in_patrao) September 29, 2021
याबाबत बोलताना अनेक अग्निशामक दलांनी अशी बाब समोर आणली, की अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये बाजारातील लोकल बॅटरीमुळे कदाचित अशा समस्या असू शकतात. मूळ स्कूटरसह येणाऱ्या बॅटरी नाही, तर त्यानंतर बदलण्यात येणाऱ्या बॅटरीमुळे अशी आग लागण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आता सरकार ई-चार्जिंग स्टेशन लावण्यासाठी देणार सब्सिडी; जाणून घ्या डिटेल्स
दरम्यान, केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेतील (CRRI) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कुमार म्हणाले, ‘ई-वाहनात इलेक्ट्रिक शॉक किंवा करंट लागण्याचा कोणताही धोका नाही. इतर इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कम्पोनंट खूप कमी असतात. बॅटरीवर चालणाऱ्या यंत्रणाही व्यवस्थित कव्हर करण्यात येतात. हे सर्किटवर आधारित असल्यामुळे यामध्ये शॉक बसण्याचा कमी धोका असतो.’