मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /E-Vehicle चालवताना खरंच शॉक बसतो? बॅटरी सेव्हिंगसह जाणून घ्या महत्त्वाच्या Tips

E-Vehicle चालवताना खरंच शॉक बसतो? बॅटरी सेव्हिंगसह जाणून घ्या महत्त्वाच्या Tips

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) बिघडत चाललेली परिस्थिती पाहता आज इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) वापरासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) बिघडत चाललेली परिस्थिती पाहता आज इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) वापरासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) बिघडत चाललेली परिस्थिती पाहता आज इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) वापरासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

  मुंबई, 14 सप्टेंबर : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) बिघडत चाललेली परिस्थिती पाहता आज इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) वापरासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. व्यावसायिक वापरासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच वैयक्तीक वापरासाठीही लोकांचा कल आता पेट्रोल-डिझेलच्या गाडी ऐवजी इलेक्ट्रिक कार (Electric Car), इलेक्ट्रिक स्कूटर (E-Scooter) यांच्या खरेदीकडे दिसू लागला आहे. पण ई-वाहनांचा वापर करताना इलेक्ट्रिक शॉक (Electric Shock) बसून दुर्घटना तर होणार नाही ना, असे प्रश्नही लोकांच्या मनामध्ये आहेत.

  याबाबत न्यूज 18 ने दोन वेगवेगळ्या तज्ज्ञांशी संवाद साधला. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेतील (CRRI) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कुमार म्हणाले, ‘ई-वाहनात इलेक्ट्रिक शॉक किंवा करंट लागण्याचा कोणताही धोका नाही. इतर इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कम्पोनंट खूप कमी असतात. बॅटरीवर चालणाऱ्या यंत्रणाही व्यवस्थित कव्हर करण्यात येतात. हे सर्किटवर आधारित असल्यामुळे यामध्ये शॉक बसण्याचा कमी धोका असतो.’

  दिल्लीमधील पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट, काउंसिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट ऍण्ड वॉटर ( CEEW) च्या वरिष्ठ प्रोग्राम लीड हिमानी जैन म्हणाल्या, ‘इलेक्ट्रिक वाहनामुळे चालक किंवा प्रवाशाला करंट लागण्याचा धोका नसतो. हे वाहन पूर्णपणे सुरक्षित आहे.’ बॅटरी बॅकअप (Battery Backup), पॉवर बॅकअप मोड याबाबत सांगताना जैन म्हणाल्या, ‘ई-वाहनामध्ये पॉवर सेव्हिंग मोडची (Power Saving Mode) सुविधा नाही, पण इतर अनेक गोष्टी वैशिष्टपूर्ण आहेत.’

  जैन पुढे म्हणाल्या, ‘इलेक्ट्रिक वाहनामध्ये आधुनिक ‘फ्यूल इकॉनोमी मोड’ आहे. पेट्रोल किंवा डिझेल वाहनांचा विचार केल्यास त्याप्रमाणेच हा मोड आहे. त्यामुळे, ई-वाहनदेखील ऊर्जा कार्यक्षम मोडमध्ये कार्यरत आहेत. ई-वाहनांमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग टेक्नॉलॉजी (वाहनाचा वेग कमी करण्याच्या प्रक्रियेत बॅटरी चार्ज करण्याची यंत्रणा) वापरून ब्रेक लावणं, वेग वाढवणं किंवा कमी करण्याची सुविधा आहे. यामुळे ऊर्जा कार्यक्षमता (Energy efficiency) वाढते.’

  इको-ड्रायव्हिंग मुळे वाढेल बॅटरीचं आयुष्य

  डॉ.रवींद्र कुमार म्हणाले, ‘वीज किंवा बॅटरीच्या बचतीचा विचार केल्यास पेट्रोल-डिझेल वाहनांसारखेच ई-वाहनांमध्ये इको-ड्रायव्हिंग (Eco-driving) किंवा ग्रीन ड्रायव्हिंग (Green Driving) आहे. जसे पेट्रोल किंवा डिझेल वाहनांमध्ये इको- ड्रायव्हिंगमुळे 11 ते 50 टक्क्यांपर्यंत इंधन वाचवता येते, त्याचप्रमाणे ई वाहनांमध्ये इको-ड्रायव्हिंगद्वारे बॅटरी वाचवता येते. त्यामुळे बॅटरी दीर्घकाळ टिकते. ई-वाहनामध्ये एक बॅटरी साधारणपणे तीन ते चार वर्षे टिकते, परंतु इको-ड्रायव्हिंग केल्यास बॅटरीचे आयुष्य 10 ते 15 टक्क्यांनी वाढवता येते. कोणत्याही वाहनासाठी ड्रायव्हिंग पद्धत अत्यंत महत्वाची असते.

  त्यामुळे तुम्ही ई-बाईक किंवा कार घेण्याच्या विचारात असाल तर लक्षात ठेवा त्या वाहनाच्या वापरावेळी तुम्हाला शॉक बसण्याची शक्यता खूपच कमी आहे. पर्यावरणासाठी हे वाहन चांगलं आहे त्यामुळे तुम्ही हे वाहन खरेदी करू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Electric vehicles