जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / टॉप 5 सुरक्षित गाड्यांमध्ये मारुतीची एकही कार नाही, मग आहे तरी कोण?

टॉप 5 सुरक्षित गाड्यांमध्ये मारुतीची एकही कार नाही, मग आहे तरी कोण?

और क्या चाहिये? भारतातील रस्त्यांनुसार तयार केल्या आहेत या 5 गाड्या, चुकून अपघात झाला तरी कुटुंब राहिल सुरक्षित

और क्या चाहिये? भारतातील रस्त्यांनुसार तयार केल्या आहेत या 5 गाड्या, चुकून अपघात झाला तरी कुटुंब राहिल सुरक्षित

Safest Cars in India Global NCAP: ग्लोबल NCAP ने 35 मेड-इन-इंडिया कारच्या क्रॅश चाचण्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 5 मॉडेल्स आहेत ज्यांना 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. यामध्ये टाटाच्या 3 आणि महिंद्राच्या 2 कारचा समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जून : ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामने (NCAP) भारतातील सर्वात सुरक्षित कारची (Safest Cars in India Global NCAP) यादी जाहीर केली आहे. ग्लोबल NCAP ने 35 मेड-इन-इंडिया कारच्या क्रॅश चाचण्यांची (Crash Test) यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त 5 कार मॉडेल्स आहेत, ज्यांना 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. यामध्ये टाटाच्या 3 आणि महिंद्राच्या 2 मॉडेल्सचा समावेश आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला देशातील सर्वात सुरक्षित 5 कारबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून आकस्मिक अपघात (Accident) झाल्यास तुम्ही आणि तुमचं कुटूंब पूर्णपणे सुरक्षित राहील.

  1. टाटा पंच (Tata Punch)-

देशातील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत टाटा पंच पहिल्या क्रमांकावर आहे. ग्लोबल NCAP ने क्रॅश चाचणीसाठी तिला 5 स्टार रेटिंग दिले आहे. या कारला अडल्ट ऑक्युपेंटसाठी 17 पैकी 16.45 गुण मिळाले. त्याच वेळी, चाईल्ड ऑक्युपेंटसाठी  49 पैकी 40.89 गुण मिळाले. म्हणजेच 66 पैकी एकूण 57.34 गुण मिळाले. टाटा पंचची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.82 लाख रुपये आहे. त्याच वेळी, टॉप मॉडेलची किंमत 9.48 लाख रुपये आहे. हेही वाचा5 स्टार AC आता होणार 4 स्टार; जाणून घ्या का होतोय रेटिंगवर परिणाम

  1. महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300)-

महिंद्राची XUV300 देशातील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्लोबल NCAP ने क्रॅश चाचणीसाठी हे 5 स्टार रेटिंग दिले आहे. या कारला प्रौढ व्यक्तीसाठी (अडल्ट ऑक्युपेंट) 17 पैकी 16.42 गुण मिळाले आहेत. त्याच वेळी, लहान मुलांसाठी म्हणजेच चाईल्ड ऑक्युपेंटसाठी 49 पैकी 37.44 मिळाले. म्हणजेच 66 पैकी एकूण 53.86 गुण मिळाले. Mahindra XUV300 ची एक्स-शोरूम किंमत 8.42 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 12.38 लाख रुपये आहे.

  1. टाटा अल्ट्रोझ(Tata Altroz)-

देशातील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत Tata Altroz ​​तिसऱ्या क्रमांकावर आहे. ग्लोबल NCAP ने क्रॅश चाचणीसाठी 5 स्टार रेटिंग दिले आहे. या कारला प्रौढ व्यक्तीसाठी 17 पैकी 16.13 गुण मिळाले. त्याच वेळी, लहान मुलांसाठी म्हणजेच चाईल्ड ऑक्युपेंटसाठी 49 पैकी 29.00 गुण मिळाले. Tata Altroz ​​ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.20 लाख रुपये आहे. त्याच वेळी, टॉप मॉडेलची किंमत 10.15 लाख रुपये आहे. हेही वाचा:  Electric Bike: काय सांगता! फक्त 7 रुपयांत 100 किमी धावते ही इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या फिचर्स

  1. टाटा नेक्सॉन (Tata Nexon)-

देशातील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत टाटा नेक्सॉन चौथ्या क्रमांकावर आहे. ग्लोबल NCAP ने क्रॅश चाचणीसाठी हे 5 स्टार रेटिंग दिले आहे. या कारला प्रौढ व्यक्तीसाठी 17 पैकी 16.06 गुण मिळाले, तर मुलांच्या सुरक्षिततेबाबत 49 पैकी 25 गुण मिळालेTata Nexon ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.54 लाख रुपयांपासून सुरु होते.

  1. महिंद्रा एक्सयूव्ही 700 (Mahindra XUV 700)-

देशातील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत महिंद्रा XUV700 पाचव्या क्रमांकावर आहे. ग्लोबल NCAP ने क्रॅश चाचणीसाठी या कारला 5 स्टार रेटिंग दिले आहे. या कारला प्रौढ व्यक्तीसाठी 17 पैकी 16.03 गुण मिळाले आहेत, तर लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत या कारला 49 पैकी 41.66 गुण मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात