Home /News /auto-and-tech /

Electric Bike: काय सांगता! फक्त 7 रुपयांत 100 किमी धावते ही इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या फिचर्स

Electric Bike: काय सांगता! फक्त 7 रुपयांत 100 किमी धावते ही इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या फिचर्स

Electric Bike: फक्त 7 रुपयांत 100 किमी धावते ही इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या फिचर्स

Electric Bike: फक्त 7 रुपयांत 100 किमी धावते ही इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या फिचर्स

Electric Bike: गेल्या काही दिवसात पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा एखादा व्यक्ती नवीन गाडी घेण्यासाठी जातो, तेव्हा गाडी खरेदीसाठी लागणाऱ्या पैशाइतकीच ती खरेदी केल्यावर तिच्यात पेट्रोलसाठी लागणाऱ्या पैशाचीही चिंता सतावते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 जून: गेल्या काही दिवसांत महागाईनं कळस गाठलाय. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात लोकांना मोटारसायकल खरेदीपेक्षा पेट्रोलच्या वाढत्या किमतीची चिंता अधिक दिसून येत आहे. एकवेळ सामान्य माणूस हिंमत दाखवून मोटारसायकलसाठी मोठी रक्कम खर्च करतोही, पण दररोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या किमतींनी लोकांच्या कपाळावर आट्या अधिक गडद केल्या आहेत. अशा परिस्थितीत लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) अधिकाधिक वळू लागले आहेत. यामुळेच अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या, अनेक वाहन निर्मात्या कंपन्या बाजारात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्यात गुंतलेल्या आहेत, विशेषत: दुचाकी विभागात. काही दिग्गज खेळाडू या सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स सादर करत असताना, स्टार्टअप्सही मागे नाहीत. हैदराबादमधील स्टार्टअप Atumobile Pvt Ltdने सुद्धा आपली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. Atumobile Pvt Ltdच्या Atum 1.0 इलेक्ट्रिक बाईकबद्दल (Electric Bike) बोलायचे झाल्यास, तिची सुरुवातीची किंमत रु 74,999 (एक्स-शोरूम) आहे. तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये ही बाईक प्री-बुक करू शकता. ही बाईक सर्वसामान्याना खिशाला परवडणारी तर आहेच, याशिवाय ती चालवण्याचा खर्च देखील कमी आहे. हेही वाचा: Elecric Scooters: देशात सर्वाधिक विकल्या जातात 'या' 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; भारतीयांना लावलंय वेड कशी आहे ही इलेक्ट्रिक बाईक?- ही देशातील सर्वात परवडणारी कॅफे रेसर इलेक्ट्रिक बाइक आहे, जी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे देशभरात उपलब्ध आहे. कंपनीने या बाइकमध्ये पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 4 तास लागतात. कंपनीचा दावा आहे की ही बाईक एका चार्जमध्ये 100 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या बाईकच्या बॅटरीसोबत 2 वर्षांची वॉरंटीही दिली जात आहे. या बाईकची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही. वास्तविक, या बाइकचा टॉप स्पीड कमीत कमी ठेवण्यात आला आहे. यात 6 किलोची बॅटरी असून ती पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 1 युनिट वीज लागते. ज्यासाठी तुम्हाला साधारणपणे 6 ते 7 रुपये खर्च करावे लागतील. या अर्थाने ही बाईक अवघ्या 7 रुपयांमध्ये 100 किमीपर्यंतची रेंज देईल.
    Published by:user_123
    First published:

    Tags: Electric vehicles

    पुढील बातम्या