मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

5 स्टार AC आता होणार 4 स्टार; जाणून घ्या का होतोय रेटिंगवर परिणाम

5 स्टार AC आता होणार 4 स्टार; जाणून घ्या का होतोय रेटिंगवर परिणाम

ऑफिसमध्ये एसी ही नियमित वापराची गोष्ट झाली आहे. काही ठिकाणी 12 महिने एसी गरजेचा असतो, विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी एसीशिवाय काम करणं याची कल्पनाच करवत नाही. नवीन एसी घेतेवेळी किती 'स्टार रेटिंग'चा एसी घ्यावा हा प्रश्न ग्राहकासमोर असतो.

पुढे वाचा ...
मुंबई, 22 जून-   ऑफिसमध्ये एसी ही नियमित वापराची गोष्ट झाली आहे. काही ठिकाणी 12 महिने एसी गरजेचा असतो, विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी एसीशिवाय काम करणं याची कल्पनाच करवत नाही. नवीन एसी घेतेवेळी किती 'स्टार रेटिंग'चा एसी घ्यावा हा प्रश्न ग्राहकासमोर असतो. स्टार रेटिंगनुसार एसीचा वीज वापर ठरतो. म्हणजेच AC ला 1 किंवा 2 स्टार रेटिंग दिलेलं असेल तर जास्त वीज लागते आणि 5 स्टार रेटिंग दिले असतील तर कमी वीज लागते, असं मानलं जातं. आता या एसीच्या `एनर्जी रेटिंग'मध्ये (Energy Rating) 1 जुलै 22 पासून बदल होणार आहेत. म्हणजे तुमचा 5 स्टार एसी आता 4 स्टार होईल. 5 स्टार एसी मॉडेलसाठी कार्यक्षमता गाईडलाईन (Energy Efficiency) जारी केली जाणार आहे, या बाबतचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे. स्टार रेटिंग एसी किंवा अन्य उपकरणांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता दर्शवली जाते. हे रेटिंग बीईई किंवा ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीद्वारे जारी केलं जातं. 2018 पासून हे बंधनकारक करण्यात आलं आहे. हे ग्राहकांना एसी वापरताना किती वीज लागेल, हे सांगतं. थोडक्यात काय, तर अधिक स्टार म्हणजे जास्त ऊर्जाबचत आणि कमी वीज बिल देणारा एसी. हे रेटिंग EER किंवा ऊर्जा कार्यक्षमता रेशोवर आधारित आहे. ग्राहक ISEER रेटिंग मानकांवरून ऊर्जा रेटिंग पाहू शकतात. खरं तर ISEER हे CSTL (Coling Seasonal Total Load) आणि CSEC (Cooling Seasonal Energy Consumption) यांचं गुणोत्तर आहे. हे जर तुम्हाला सोप्या भाषेत समजलं, तर एसी तो बसवलेल्या ठिकाणची एका वर्षात किती उष्णता काढून टाकू शकतो आणि त्यासाठी किती ऊर्जा लागेल याचे प्रमाण लक्षात येईल. नवीन स्टार रेटिंग येताच आता एसी एनर्जीचे स्टार रेटिंग एकने कमी होणार आहे. म्हणजेच या वर्षी खरेदी केलेला 5 स्टार एसी पुढील महिन्यापासून 4 स्टार एसी होईल. विंडो आणि स्प्लिट या दोन्ही प्रकारांसाठी स्टार वेगवेगळे असतील. (हे वाचा:Smartphones: स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी! खास फिचर्सनी युक्त 3 स्वस्त फोन या आठवड्यात होणार लॉन्च ) याचा परिणाम फ्रीजवरही होईल. पण, पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2023 पासून फ्रीजचं रेटिंगही बदललं जाणार आहेत. 'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, खर्चात वाढ झाल्यामुळे 4 आणि 5 स्टार फ्रीज बनवणं कठीण होईल, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, रेटिंग हे जानेवारी 2022 बदलेलं जाणार होतं, मात्र कंपन्यांच्या विनंतीनंतर 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कंपन्यांचा युक्तिवादानुसार कोविडमुळे जुना स्टॉक संपलेला नाही. यामुळे त्यांना अधिक वेळ हवा होता. 2025 मध्ये एसीच्या रेटिंगमध्ये पुन्हा बदल होणार आहे. 1 जुलैपासून लागू झालेला बदल डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. नवीन रेटिंग एसीच्या किमतीत 7 ते 10 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. उत्पादन खर्चात झालेली वाढ हे त्याचे कारण आहे, असं कंपन्यांचं म्हणणं आहे.
First published:

Tags: Tech news, Technology

पुढील बातम्या