जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / तुमचं Facebook हॅक झालंय? जगभरातील लोकांच्या न्यूज फीडमध्ये दिसू लागल्या विचित्र पोस्ट

तुमचं Facebook हॅक झालंय? जगभरातील लोकांच्या न्यूज फीडमध्ये दिसू लागल्या विचित्र पोस्ट

तुमचं Facebook हॅक झालंय? जगभरातील लोकांच्या न्यूज फीडमध्ये दिसू लागल्या विचित्र पोस्ट

तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तुमचे न्यूज फीड तपासा. तुम्हाला तेथे काहीतरी विचित्र दिसत आहे का ते पाहा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 24 ऑगस्ट : सोशल मीडिया हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे लहानांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत आपल्याला सगळेच लोक सोशल मीडियावर असलेले पाहायला मिळतात. त्यात बहुतांश लोक हे फेसबुक वापतात. येथे आपल्याला फोटो, व्हिडीओ, टेक्स स्वरुपात माहिती मिळते. तसेच आपल्या मित्रांशी बोलणे आणि नवीन मित्र बनवणे शक्य होते. परंतु फेसबुकबाबात एक अशी माहिती समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच गोंधळात टाकलं आहे. जगभरातील अनेक लोकांना हा अनुभव आला आहे की, त्यांना विचित्र फोटो पाहायला मिळत आहेत. तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तुमचे न्यूज फीड तपासा. तुम्हाला तेथे काहीतरी विचित्र दिसत आहे का? ते पाहा हे वाचा : तुमच्या फोनमध्ये Spyware तर नाही ना? असं करा चेक, खूपच सोपी आहे पद्धत! येथे एखाद्या सेलिब्रिटीचे अकाउंट हॅक झाल्याचे दिसत आहे, तर कधी असे दिसते की एकत्र भरपूर अकाउंट हॅक झाले आहेत. वास्तविक, जगभरातील वापरकर्तांना न्यूज फीडमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत. असं का होत आहे? फेसबुक युजर्सचे फीड अनोळखी लोकांच्या पोस्ट्सने भरून गेले आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजल्यापासून वापरकर्त्यांना ही समस्या दिसू लागली आहे. याची तक्रार अनेक लोक ट्विटरवर करत आहेत. हे वाचा : Googleचं नवं अपडेट कार चालकांसाठी ठरतंय डोकेदुखी; Samsung, Xiomi, Oneplus युजर्स हैराण आता प्रश्न असा उपस्थीत राहातो की, असं का घडत आहे? तसे पाहाता कंपनीने याबाबात अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगभरातील युजर्सना ही समस्या भेडसावत आहे. सध्या, हे कोणतेही हॅकिंग आहे असे तरी वाटत नाही, उलट ते एकाद्या त्रुटीमुळे देखील घडू शकतं असं म्हटलं जात आहे. भारतातील विविध मोठ्या शहरांमध्यील लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. काही लोक याबद्दल मीम्स शेअर करत आहेत, तर काही असे ही लोक आहे, जे यामागचं कारण जाणून घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात