मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Googleचं नवं अपडेट कार चालकांसाठी ठरतंय डोकेदुखी; Samsung, Xiomi, Oneplus युजर्स हैराण

Googleचं नवं अपडेट कार चालकांसाठी ठरतंय डोकेदुखी; Samsung, Xiomi, Oneplus युजर्स हैराण

Googleचं नवं अपडेट कार चालकांसाठी ठरतंय डोकेदुखी; Samsung, Xiomi, Oneplus युजर्स हैराण

Googleचं नवं अपडेट कार चालकांसाठी ठरतंय डोकेदुखी; Samsung, Xiomi, Oneplus युजर्स हैराण

Google चे नवीन अँड्रॉइड ऑटो (Android Auto 7.8.6) अपडेट जगभरातील अनेक वापरकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 ऑगस्ट:  गुगलचं (Google) नवीन अँड्रॉइड ऑटो (Android Auto 7.8.6) अपडेट जगभरातील अनेक वापरकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरलं आहे. या अपडेटनंतर आपला स्मार्टफोन कारच्या इन्फोटेनमेंट सिस्टमशी कनेक्ट होत नसल्याची तक्रार युजर्सनी केली आहे. युजर्सच्या मते, नवीन अपडेटनंतर इन्फोटेनमेंट सिस्टमच्या स्क्रीनवर 'phone not compatible' दिसत आहे. वापरकर्त्यांनी Google सपोर्ट फोरमवर Android Auto मध्ये येत असलेल्या या समस्येबद्दल तक्रार केली आहे.

Asus, Samsung, Xiaomi आणि OnePlus मध्ये देखील समस्या –

9 टू 5 Google च्या मते, Android Auto मधील या दोषानं अनेक लोकप्रिय स्मार्टफोन मॉडेल्स वापरणाऱ्या कार चालकांवर परिणाम झाला आहे. Google सपोर्ट फोरमवर, बहुतेक Samsung Galaxy S9, S10, S20, S21, S22, Note 20 आणि Galaxy Z Flip 3 वापरकर्त्यांनी Android Auto विषयी समस्येच्या तक्रारी नोंदवल्या. सॅमसंग व्यतिरिक्त, Xiaomi, Asus आणि OnePlus च्या अनेक डिव्हाइसेसमध्ये Android Auto पेअरिंगमध्ये समस्या येत आहे. एका Google Pixel वापरकर्त्यानंही Android Auto वर नवीन अपडेट्सची तक्रार केली.

निरनिराळ्या कारमध्ये वेगळा असू शकतो मेसेज-

अँड्रॉइड ऑटो अ‍ॅपद्वारे फोन पेअर करताना सर्व वापरकर्त्यांना 'phone not compatible' असा संदेश मिळत आहे. हा संदेश वेगवेगळ्या कंपन्यांच्या कारमध्ये भिन्न असू शकतो, परंतु याचा अर्थ असा आहे की डिव्हाइस आणि कारची इन्फोटेनमेंट सिस्टम Android Auto द्वारे कनेक्ट होऊ शकत नाही.

हेही वाचा- Tata Nexonला टक्कर देणार ही नवी Electric SUV, लवकरच होणार लाँच

Android Auto टीमला दिली माहिती-

Google सपोर्ट फोरमवरील या समस्येबाबत कंपनीच्या एका उत्तर देत या समस्येबद्दल डिटेल्स शेअर करण्यास सांगितलं आहे. प्रतिनिधीनं युजर्सना Android Auto वर्जन क्रमांकासह स्मार्टफोन आणि कारचे मेक/मॉडेल सांगण्यासही सांगितलं आहे. नवीन अपडेटनंतर, युजर्स गेल्या तीन दिवसांपासून याबद्दल तक्रार करत आहेत, परंतु Google ने अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत विधान जारी केलेलं नाही. तथापि  कंपनीनं निश्चितपणे सांगितले आहे की, Android Auto टीमला या समस्येबद्दल माहिती देण्यात आली आहे. नवीन अपडेटच्या माध्यमातून ही समस्या निवारण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी अपेक्षा आहे.

First published:

Tags: Google, Smartphone