Home /News /auto-and-tech /

दिवाळीआधी घरी आणा Mahindra XUV300, मिळेल 44 हजारांचा बेनिफिट आणि स्वस्त EMI ऑप्शन

दिवाळीआधी घरी आणा Mahindra XUV300, मिळेल 44 हजारांचा बेनिफिट आणि स्वस्त EMI ऑप्शन

Mahindra & Mahindra वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनी XUV300 वर तब्बल 44 हजार रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स देत आहे आणि त्यासोबत EMI ऑप्शनही देत आहे.

  नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : फेस्टिव्ह सीजनपूर्वी ऑटोमोबाइल कंपन्यांनी डिस्काउंट्स आणि ऑफर्सची घोषणा केली आहे. Mahindra & Mahindra वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनी XUV300 वर तब्बल 44 हजार रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स देत आहे आणि त्यासोबत EMI ऑप्शनही देत आहे. जर तुम्हीही दिवाळीआधी घरी नवी कार आणू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Mahindra XUV300 सर्वात सुरक्षित SUV - XUV300 देशातील सर्वात सुरक्षित मिड-साइज SUV आहे. या कारला ग्लोबल NCAP कार क्रॅश रेटिंग्समध्ये 5 स्टार मिळाले आहेत. या SUV मध्ये हायटेक फीचर्ससह पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय मिळतो. अशात ग्राहक आपल्या आवडीनुसार आणि गरजेप्रमाणे यापैकी कोणत्याही मॉडेलची निवड करू शकतात.

  बाबो! या अभिनेत्याने खरेदी केली लाखोंची नंबर प्लेट आणि कोट्यवधींची Lamborghini

  Mahindra XUV300 सनरुफ - महिंद्राने ही SUV लग्जरी कारप्रमाणे डिझाइन केली आहे. कंपनीने लग्जरी कारमध्ये मिळणारं इलेक्ट्रिक सनरुफ फीचर या कारमध्ये दिलं आहे, जो पर्यावरणाशीही कनेक्ट करतं. त्याशिवाय Mahindra XUV300 मध्ये फ्रंटला पार्किंग सेंसरही देण्यात आला आहे. Mahindra XUV300 Specifications - या SUV मध्ये कंपनीने पॉवर स्टेयरिंग, पॉवर विंडो, फ्रंट अँटी ब्रेकिंग सिस्टम, ड्रायव्हर आणि पॅसेंजर Airbags दिले आहेत. त्याशिवाय या SUV मध्ये फ्रंट अलॉय व्हिल आणि मल्टी फंक्शन स्टियरिंग व्हिलदेखील आहे.

  Volkswagen ची जबरदस्त Taigun SUV भारतात लाँच, काय आहे किंमत

  कंपनीने पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही मॉडेल लाँच केले आहेत. यात 1497cc चं डिझेल इंजिन दिलं आहे आणि 1197cc चं पेट्रोल इंजिन दिलं आहे. या दोन्ही इंजिनसह मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल. तसंच 17 ते 20 kmpl मायलेज ही SUV देते.

  'जाऊ द्या ना साहेब' म्हणायची येणार नाही वेळ, मोबाइलमध्ये ठेवा लायसन्सची ही कॉपी

  या SUV च्या बेस वेरिएंटची पुण्यातील एक्स-शोरुम किंमत 7,95,963 रुपये आहे. तर याच्या टॉप वेरिएंटची पुण्यातील एक्स-शोरुम किंमत 11,46,735 रुपये आहे. Mahindra XUV300 SUV ही EMI ऑप्शनवर खरेदी करायची असल्यास, याचा सुरुवातीचा EMI 12,908 रुपये असेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Tech Mahindra

  पुढील बातम्या