• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • 'जाऊ द्या ना साहेब' म्हणायची येणार नाही वेळ, मोबाइलमधील ड्रायव्हिंग लायसन्सची ही कॉपी ठरेल ग्राह्य

'जाऊ द्या ना साहेब' म्हणायची येणार नाही वेळ, मोबाइलमधील ड्रायव्हिंग लायसन्सची ही कॉपी ठरेल ग्राह्य

रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं वाहन चालवताना तुम्ही तुमचं शिकाऊ किंवा पक्कं लायसन्स, वाहनाच्या इन्शुरन्सची कागदपत्रं, आर. सी. बुक, रोड टॅक्स पावती आदी कागदपत्रं जवळ बाळगणं आवश्यक असतं. आता तुम्ही काही खास App मध्ये ही कागदपत्र सेव्ह करून ठेवू शकता.

  • Share this:
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं वाहन चालवताना तुम्ही तुमचं शिकाऊ किंवा पक्कं लायसन्स, वाहनाच्या इन्शुरन्सची कागदपत्रं, आर. सी. बुक, रोड टॅक्स पावती आदी कागदपत्रं जवळ बाळगणं आवश्यक असतं. वाहतुकीचा नियम मोडल्यास, अपघात झाल्यास किंवा अगदी पोलिसांनी अडवल्यास ही कागदपत्रं सादर करावी लागतात. यापैकी एखादी गोष्ट जरी जवळ नसेल तरी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा प्रसंगी तुमच्यावर परवाना रद्द होण्यासारखी कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते. मात्र आता सर्व शासकीय दस्तऐवजांचं डिजिटायझेशन (Digitization of Important Documents) झालं आहे. त्याला वाहनांसंबंधीची कागदपत्रंही अपवाद नाहीत. त्यामुळे प्रवासासाठी बाहेर पडताना तुम्ही गाडीची कागदपत्रं विसरलात तरी काळजी करण्याचं कारण नाही. केंद्र सरकारने डिजिलॉकर (Digilocker) आणि एम-परिवहन (M-Parivahan) यांसारखी मोबाइल अ‍ॅप्स विकसित केली असून, या अ‍ॅप्सवर तुम्ही तुमच्या वाहनांच्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी (Digital Copy of Vehicle Documents) स्टोअर करून ठेवू शकता. समजा तुम्हाला पोलिसांनी अडवलं, तर त्यांना ही डिजिटल कागदपत्रं दाखवू शकता. ते कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरलं जाणार आहे. हे वाचा-Amazon Great Indian Festival 2021 ची घोषणा, डिस्काउंटसह मिळतील जबरदस्त ऑफर्स रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं गेल्या काही वर्षांत वाहनचालकांच्या हिताचे आणि सुरक्षेविषयी काही निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारनं देशातल्या कोट्यवधी वाहनचालकांना दिलासा देऊन एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सरकारनं वाहन कायद्यातल्या नियम क्रमांक 139 मध्ये सुधारणा केली आहे. यानुसार वाहनचालकांना प्रवास करताना महत्त्वाची कागदपत्रं जवळ बाळगण्याची गरज नाही. ही कागदपत्रं वाहनचालक मोबाइलमध्ये सेव्ह करू ठेवू शकतात आणि गरज पडेल तेव्हा ती पोलिसांना दाखवू शकतात. याबाबत सरकारनं नुकतंच नोटिफिकेशनही जारी केलं आहे. डिजिलॉकर किंवा एम-परिवहन या सरकारमान्य अ‍ॅप्समध्ये दस्तऐवज स्टोअर करून ठेवणं सुरक्षित आणि अधिकृत मानलं जातं. परंतु, अन्य अ‍ॅप्समध्ये दस्तऐवज स्टोअर करून ठेवल्यास त्यांना मूळ दस्तऐवज म्हणून मान्यता नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर दिल्ली-एनसीआरसह देशभरात कुठेही वाहन चालवताना वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसेन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि पीयूसी सर्टिफिकेट जवळ बाळगण्याची गरज नाही. वाहनचालक वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना डिजिलॉकर किंवा एम-परिवहन मोबाइल अॅप्सवर डिजिटली स्टोअर केलेली डॉक्युमेंट्स दाखवू शकतात. हे वाचा-1 रुपयात घरबसल्या पोर्ट करता येणार Mobile Number, SIM Card बाबत नवा नियम जारी परिवहन विभागानं जारी केलेल्या सूचनेनुसार, वाहतूक पोलिस आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची एन्फोर्समेंट ब्रॅंच डिजिलॉकर किंवा एम-परिवहन मोबाइल अ‍ॅप्सवरील इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असलेले ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ग्राह्य मानणार आहे. डिजिलॉकर किंवा एम-परिवहन अ‍ॅपवरचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी या कागदपत्रांच्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील तरतुदींनुसार मूळ दस्तऐवज म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सरकार याबाबत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन लोकांना माहिती देत आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, डिजिलॉकर आणि एम-परिवहनमधले दस्तऐवज दाखवल्यानंतर वाहतूक पोलिस तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीची हार्ड कॉपी दाखवण्यासाठी भाग पाडू शकणार नाहीत. सरकारी आदेशानुसार, डिजिलॉकर किंवा एम-परिवहन अॅप्सवरचं डिजीटल ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि आरसी (RC) ही मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत वैध कागदपत्रं आहेत. ही परिवहन विभागानं जारी केलेल्या मूळ प्रमाणपत्रांसारखीच कायदेशीर मान्यताप्राप्त आहेत.
First published: