मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Volkswagen ची जबरदस्त Taigun SUV भारतात लाँच, काय आहे किंमत

Volkswagen ची जबरदस्त Taigun SUV भारतात लाँच, काय आहे किंमत

बहुप्रतीक्षित Volkswagen ची Taigun ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच झाली आहे. Volkswagen च्या या Compact SUV ची किंमत 10.5 लाखांपासून सुरू होत असून, तिच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे.

बहुप्रतीक्षित Volkswagen ची Taigun ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच झाली आहे. Volkswagen च्या या Compact SUV ची किंमत 10.5 लाखांपासून सुरू होत असून, तिच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे.

बहुप्रतीक्षित Volkswagen ची Taigun ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच झाली आहे. Volkswagen च्या या Compact SUV ची किंमत 10.5 लाखांपासून सुरू होत असून, तिच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : सध्या भारतीय बाजारपेठेत (Indian Auto market) कॉम्पॅक्ट (Compact) आणि सब-कॉम्पॅक्ट (Sub Compact SUV) एसयूव्ही कार्सना चांगली मागणी आहे. याच श्रेणीतील एक बहुचर्चित बहुप्रतीक्षित Volkswagen ची Taigun ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच झाली आहे. या SUV मुळे याच सेगमेंटमध्यल्या Hyundai Creta, Kia Seltos, Tata Harrier, MG Hector Plus तसंच Skoda Kushaq यांना तगडी स्पर्धा आहे. Volkswagen च्या या Compact SUV ची किंमत 10.5 लाखांपासून सुरू होत असून, तिच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

Volkswagen च्या पुण्याजवळच्या चाकण इथल्या प्रकल्पात ऑगस्ट महिन्यापासून या कारच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. ही कार MQB A0-IN या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली असून, विशेषत्वाने भारतीय बाजारासाठी विकसित करण्यात आली आहे. स्पर्धात्मक किमतीत ही कार उपलब्ध करण्यासाठी स्थानिक स्पेअर पार्ट्सचा वापर करण्यावर भर देण्यात आला, असून जवळपास 95 टक्के सुटे भाग स्थानिक पातळीवर निर्माण करण्यात आले आहेत.

Taigun ची किंमत 10.5 लाखांपासून ते 17.49 लाखांपर्यंत आहे. Taigun यलो, वाईल्ड चेरी रेड, कॅन्डी व्हाईट, रिफ्लेक्स सिल्व्हर आणि कार्बन स्टील ग्रे अशा पाच रंगांत उपलब्ध आहे. डायनॅमिक आणि परफॉर्मन्स लाईन अशा दोन प्रकारात Taigun ची विविध मॉडेल्स लाँच करण्यात आली आहेत.

Ola नंतर आता आणखी एक E-Bike लॉन्च, किंमत पेट्रोल बाईकपेक्षाही कमी!

Dynamic Line वेरिएंट्समध्ये 1.0 लिटर क्षमतेचं इंजिन (Engine) असून, कम्फर्टलाइन, हायलाइन आणि टॉप लाइन असे तीन वेरिएंटस उपलब्ध आहेत. Performance Line प्रकारात 1.5 लिटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन असून, GT आणि GT Plus अशा दोन वेरियंटसमध्ये ती उपलब्ध आहे. GT वेरिएंटमध्ये Manual Gearbox आहे, तर GT Plus मध्ये 7-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन देण्यात आलं आहे.

Taigun मधील दोन्ही इंजिन्स टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन्स असून, 1.0 लीटर क्षमतेचे इंजिन तीन-सिलेंडर TSI मोटरसह येतं. हे इंजिन 113 बीएचपी पॉवर आणि 175 nm टॉर्क देते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

आता भारतात उडणार Flying Car, कशी असेल ही कार; सरकारने जारी केले PHOTO

1.5 लिटर क्षमतेचे इंजिन चार-सिलेंडर TSI मोटरसह येतं. ते 148 बीएचपी पॉवर आणि 250 nm टॉर्क देतं. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.

Taigun SUV च्या किमती मॉडेल्सनुसार वेगवेगळ्या आहेत. डायनॅमिक लाइनमधील कम्फर्टलाइन वेरिएंटची किंमत (एक्स-शोरूम) 10.49 लाख आहे. हायलाईन वेरिएंटची किंमत 12.79 लाख, तर टॉप लाइन वेरिएंटची किंमत 14.09 लाख रुपये आहे. टॉप लाइनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन वेरिएंट देण्यात आले असून, मॅन्युअल वेरिएंटची किंमत 14.56 लाख, तर ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 15.9 लाख रुपये आहे.

Renault 10 years celebration:आता खरेदी करा Car आणि 2022 मध्ये द्या पैसे,पाहा ऑफर

परफॉर्मन्स लाइनमधील 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या जीटी व्हेरियंटची किंमत (एक्स-शोरूम) 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते तर जीटी प्लस व्हेरियंटची किंमत 17.49 लाख रुपये आहे.

6 एअरबॅग्ज, एबीएस अशी अनेक वैशिष्ट्यं या SUV मध्ये आहेत. बऱ्याच कालवधीनंतर Volkswagen ने भारतीय बाजारपेठेत अत्याधुनिक आणि आलिशान SUV अत्यंत स्पर्धात्मक किमतीत दाखल केली आहे. या SUV ला चांगला प्रतिसाद मिळेल आणि या श्रेणीत आपले स्थान मजबूत होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे.

First published:

Tags: Car