नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : टॉलिवूड अभिनेता ज्यूनियर एनटी रामा राव (Jr NTR) चित्रपटात आपल्या अॅक्शन पॅक्ड सीन्ससाठी ओळखला जातो. परंतु सध्या त्याच्या नव्या लॅम्बोर्गिनी (Lamborghini) कारची मोठी चर्चा आहे. Jr NTR ने इम्पोर्टेड लॅम्बोर्गिनी यूरस ग्रेफाइट कॅप्सूल कार (Lamborghini Urus Graphite Capsule) 3 कोटी रुपयांत खरेदी केली आहे. जितकी मोठी या कारची किंमत आहे, त्यानुसारच कारच्या नंबर प्लेटची निवड करण्यासाठीही मोठी रक्कम खर्च केली गेली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्यूनियर एनटीआरची ही कार भारतातील पहिली Lamborghini Urus Graphite Capsule कार आहे. त्याने आपल्या कारसाठी एक फॅन्सी रजिस्ट्रेशन नंबर मिळवण्यासाठी मोठी अमाउंट खर्च केली आहे. त्याच्या कारची नंबर प्लेट नुकतीच हैदराबाद येथील खैरताबाद RTO कार्यालयात रजिस्टर केली गेली आहे.
नंबर प्लेटसाठी लाखो रुपये खर्च -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्याने आपल्या कारसाठी फॅन्सी रजिस्ट्रेशन नंबर TS09 FS 9999 मिळवण्यासाठी 17 लाख रुपये दिले आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये Lamborghini Urus Graphite Capsule ब्लॅक मॅट फिनिशसह लाँच करण्यात आली. हैदराबादमध्ये आणण्यात आलेल्या या कारची किंमत 3.16 कोटी रुपये आहे. Lamborghini Urus Graphite Capsule घेणारा Jr NTR हा पहिलाच भारतीय आहे. त्याने नुकताच कारसोबत शेअर केलेला एक फोटो जबरदस्त व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
Lamborghini Urus Graphite Capsule कारमध्ये काय आहे खास?
3 कोटीहून अधिक रुपयांची असलेली ही SUV 4.0 लीटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 पेट्रोल इंजिनसह ऑटोड्राईव्ह कार आहे. ही कार 650hp आणि 850Nm टॉर्क जनरेट करते. 305kph टॉप स्पीड आणि केवळ 3.6 सेकंदमध्ये 0-100kph वेगात पोहोचू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car