नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : केंद्र सरकारने इशारा देऊनही देशविरोधी प्रचार करणारी आणि प्रक्षोभक मजकूर प्रसारित करणारी ट्विटर हँडल्स Twitter ने हटवली नाहीत म्हणून मोदी सरकार आता या मायक्रोब्लॉगिंग साइटविरोधात आणखी कडक धोरण अवलंबणार आहे. Twitter वर कायदेशीर कारवाईची चाचपणी करत असतानाच मोदी सरकारने त्याला पर्याय म्हणून स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग अॅपचा प्रसार सुरू केला आहे. Koo नावाच्या या made in India मोबाईल अॅप्लिकेशन मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आयटी मंत्रायाने स्वतःचं व्हेरिफाइड अकाउंट उघडलं आहेच. शिवाय MyGov, Digital India, India Post, NIC, NIELIT, SAMEER, कॉमन सर्विसेज सेंटर, UMANG, डिजी लॉकर, NIXI, STPI, CDAC आणि CMET या सरकारी, निमसरकारी संस्थांचीसुद्धा अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स Koo वर दिसू लागली आहेत.
काय आहे Koo?
हे अॅप अगदी ट्विटरसारखंच आहे. यामध्ये गोष्टी पोस्ट केल्या जाऊ शकतात, तसंच फोटो आणि व्हिडिओही जोडता येतात. इतर पोस्टवर कमेंट्स सोबत तुम्ही त्यांना फॉलोही करू शकता. यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि मजकूर असे तिन्ही पर्याय उपलब्ध आहे.
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवले पैसे; 30 लाख बुडल्याने तरुणाचा झाला भयानक अंत
कंपनीने या अॅपला हिंदी भाषेव्यतिरिक्त तमिळ, कन्नड आणि तेलगू भाषेत बाजारात आणलं आहे. त्याचबरोबर कंपनी मराठी, गुजराती, पंजाबी, आसामी, बांगला, मल्याळम, उडिया या भाषांमध्येदेखील हे अॅप आणणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एका अहवालानुसार, भारतातील अजूनही बहुतेक लोक इंग्रजीऐवजी मातृभाषेत बोलणं पसंत करतात. त्यामुळे Koo App सारखं माध्यम तयार करण्यात आलं आहे. जिथे लोक त्यांना हव्या त्या भाषेमध्ये बोलू शकतात आणि वाचू शकतात. त्यामुळे Koo ची रचना त्यादृष्टीने करण्यात आली आहे.
ऑनलाइन डेटिंग नको रे बाबा! भारतीयांना आहे ही भीती, Macfee चा अहवाल
ट्विटरवर कारवाई का?
गुरुवारी सरकारने ट्विटरला (Twitter) नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये सरकारने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्वीटरला 1178 अकाऊंट्स ब्लॉक करण्यास सांगितले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या सर्व ट्वीटर अकाऊंटचा संबंध खलिस्तान किंवा पाकिस्तानशी आहे. याआधी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्वीटरला आदेश दिले होते की, 30 जानेवारीला चुकीचे, धमकावणारे आणि चिथवणारे ट्वीट टाकणारे 257 अकाऊंट बंद करा, जे ट्विटमध्ये हॅशटॅगसोबत चिथवणारे संदेश पोस्ट करत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ट्विटरसाठी आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. गृहमंत्रालय आणि अन्य सुरक्षा एजन्सींचा सल्ला घेतल्यानंतर नुकतंच आयटी मंत्रालयाकडून ट्विटरला हे सर्व अकाऊंट बंद करण्याबाबत सांगण्यात आलं आहे. पण ट्विटरने सरकारच्या या मागणीवर अद्याप प्रतिसाद दिला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News, Koo App, Tech news