• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवले पैसे; 30 लाख बुडल्याने तरुणाचा झाला भयानक अंत

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवले पैसे; 30 लाख बुडल्याने तरुणाचा झाला भयानक अंत

पैशांची लूट करण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीचे लोक कुठलं अमिष देतील सांगता येत नाही. मध्य प्रदेशात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 जानेवारी : बिटकॉईन (Bitcoin) हे आधुनिक जगातलं चलन (currency) आहे. बिटकॉईनची वाढती मागणी लक्षात घेत आता गुन्हेगारांनी याही चलनाला फसवणुकीसाठी वापरायला सुरू केलं आहे. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) ग्वालियर (Gwalior) जिल्ह्यात बहोडापूर इथला रहिवासी असलेल्या तरुणाचे 30 लाख रुपये एका फायनान्स कंपनीनं (finance company) लुटले. हा इतक्या मोठ्या नुकसानाचा धक्का सहन न झाल्यानं हा युवक प्रचंड अस्वस्थ झाला. या अस्वस्थतेतूनच त्याला ब्रेन हॅमरेजचा (brain hemorrhage) झटका आला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे ही वाचा-सोनमने साक्षीला तिसऱ्यांदा हरवलं; लकवा असलेल्या हातानेच खेचून आणलं यश या तरुणाच्या पत्नीनं आता पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींवर एफआयआर दाखल केली आहे. बहोडापूर पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी प्रशांत यादव यांनी सांगितलं, की या प्रकरणात गिरीश दुबे या तरुणाचा ब्रेन हॅमरेजनं मृत्यू झाला. हा तरुण कामदागिरी अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याची पत्नी पूजा हिनं पोलीस स्थानकात तक्रार केली आहे, की तिच्या पतीनं कोरेक्स नावाची फायनान्स कंपनी चालवणाऱ्या हेमंत यादव, प्रमोद शर्मा आणि अमित जैन यांच्या बोलण्याला भुलून त्यांना 30 लाख रुपये दिले होते. या लोकांनी गिरीशला लालूच दाखवलं होतं, की त्यांची कंपनी क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवते. यात सहा महिन्यात पैसे डबल होतात. मात्र पैसे (money) गुंतवूनही काहीच परतावा (return) न मिळाल्यानं गिरीशनं पैसे परत मागितले. मात्र तिघांनी पैसे द्यायला नकार दिला. यानंतर मोठाच धक्का बसल्यानं गिरीशला थेट ब्रेन हॅमरेज झालं. आता हेमंत यादवविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: