मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ऑनलाइन डेटिंग नको रे बाबा! भारतीयांना आहे ही भीती, Macfee चा अहवाल

ऑनलाइन डेटिंग नको रे बाबा! भारतीयांना आहे ही भीती, Macfee चा अहवाल

Risk of Cyberattack

Risk of Cyberattack

वेगवेगळ्या अ‍ॅप्सवरून अगदी सहजपणे खाद्यपदार्थाची ऑनलाइन ऑर्डर (Online Food Orders) देणाऱ्या भारतीयांना ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सबाबत (Online Dating Apps) मात्र भीती वाटत असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.

नवी दिल्ली, 30 जानेवारी: वेगवेगळ्या अ‍ॅप्सवरून अगदी सहजपणे खाद्यपदार्थाची ऑनलाइन ऑर्डर (Online Food Orders) देणाऱ्या भारतीयांना ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सबाबत (Online Dating Apps) मात्र भीती वाटत असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे, भारतातील चारपैकी तीन लोकांनी (74 टक्के) त्यांना सायबर गुन्ह्यांमुळे (Cyber Attacks) भीती वाटत असल्याचं सांगितलं आहे; तर पाचपैकी एकाने (20 टक्के) सायबर हल्ले रोखण्याच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. ‘2021 कन्झ्युमर सिक्युरिटी माईन्डसेट रिपोर्ट बाय सायबर सिक्युरिटी फर्म मॅकफी' या अहवालात ही निरीक्षण नोंदवण्यात आली आहेत.

मॅकफीनं (Macfee) केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलं की, भारतातील एक तृतीयांश म्हणजे जवळपास 78 टक्के  लोकांनी क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याची माहिती (Bank account ) यासारख्या आर्थिक गोष्टीची माहिती चोरीला जाण्याची त्यांना सर्वाधिक भीती वाटत असल्याचं कबुल केलं आहे,  तर 74 टक्के लोकांना वाढदिवस, पत्ता आदी त्यांची वैयक्तिक माहिती हॅक होण्याची भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे.

‘एखादी समस्या उद्भवल्यावर ती दूर करण्यापेक्षा अशी स्थिती उद्भवू नये यासाठी उपायोजना करणं योग्य असते. आपण नेहमीच  घेतलेले अ‍ॅप्स, वेबसाइट आणि ईमेल्स याबाबत दक्षता बाळगली पाहिजे. त्याची सुरक्षितता जाणून घेतली पाहिजे, असं मॅकॅफीच्या कन्झ्युमर बिझनेस विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष टेरी हिक्स यांनी म्हटलं आहे.

ते पुढं म्हणाले, ‘यासाठी आपली मानसिकता आणि वर्तन यामध्येही बदल करणं महत्त्वाचं आहे. आपल्यासाठी मौल्यवान असलेल्या गोष्टी, माहिती, त्यासंबंधीची गोपनीयता, आपली ओळख आणि खासगीपणा याबाबी आपल्याला मानसिक शांतता देतात.’

(हे वाचा - युनिक कंम्युटर लँग्वेजने केली जाणार शेती; सरकारकडून तयारी सुरू)

अशा सुरक्षेच्या संदर्भात भारतीय लोक सोयीला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. 2020 मध्ये भारतीयांनी टेक्स्ट, ईमेल नोटिफिकेशन (67 टक्के), लॉग इन / रिमेंबर यूजर क्रेडेन्शियल्स (39 टक्के), स्टोअर आणि ऑटो पॉप्युलेट क्रेडिट कार्ड (36 टक्के) यासारख्या सोयीच्या फीचर्सचा वापर करण्यावर भर दिल्याचं या सर्वेक्षणात आढळलं आहे.

सर्वेक्षण केलेल्या जवळपास अर्ध्या (51 टक्के) कुटुंबांमध्ये 18 वर्षाखालील मुले ऑनलाइन अॅक्टीव्हिटी करत असल्याचं दिसून आलं, तर 28 टक्के कुटुंबांमध्ये 12 वर्षाखालील मुले ऑनलाइन अॅक्टीव्हिटी करत असल्याचं आढळलं त्यामुळे सुरक्षित ऑनलाइन अनुभव अत्यंत आवश्यक असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं  आहे. 10 पैकी 9 म्हणजे 94 टक्के भारतीयांनी चलनाप्रमाणे सोयीस्कर ऑनलाइन व्यवहार करता आले, तर त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्याबाबत ते अधिक दक्ष असतील, असं मत व्यक्त केलं. 2020मध्ये किमान एक कनेक्ट केलेले डिव्हाइस खरेदी केल्याचे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 83 टक्के लोकांनी सांगितलं, तर तीनपैकी एकानं तीन कनेक्टेड डिव्हाइसेस खरेदी केल्याचंही समोर आलं आहे. ग्राहकांच्या या खरेदी करण्याच्या सवयींवरून नवीन डिजिटल लाईफमध्ये त्यांचे वर्तन कसे असेल याचा अंदाज येतो.

(हे वाचा-OMG! याचा हात आहे की मधमाश्यांचं घर; डेअरिंगला द्यायला हवी दाद)

ग्राहक ऑनलाइन माहिती शेअर करण्याबाबत फार दक्षता घेत नाहीत, सहजपणे ते त्यांची माहिती शेअर करताना दिसतात; हा फार मोठा धोका आहे. विशेषत: अशा सेवांमध्ये जिथं वेगवेगळ्या संपर्क पर्यायांची  माहिती विचारली जाते, तिथं हा धोका अधिक असतो, असं या अहवालात म्हटलं आहे.

First published:

Tags: Cyber crime, Online shopping, User data