जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / स्वस्तात कार खरेदीची जबरदस्त संधी, Honda Cars वर बंपर डिस्काउंट

स्वस्तात कार खरेदीची जबरदस्त संधी, Honda Cars वर बंपर डिस्काउंट

स्वस्तात कार खरेदीची जबरदस्त संधी, Honda Cars वर बंपर डिस्काउंट

देशातील प्रसिद्ध कार निर्माता कंपनी होंडा कार्स इंडियाने काही निवडक मॉडेलवर डिस्काउंट ऑफर केला आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही बाजारातील किंमतीहून कमी किंमतीत कार खरेदी करू शकता. होंडाच्या काही कार्सवर 45000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 डिसेंबर : तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. देशातील प्रसिद्ध कार निर्माता कंपनी होंडा कार्स इंडियाने काही निवडक मॉडेलवर डिस्काउंट ऑफर केला आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही बाजारातील किंमतीहून कमी किंमतीत कार खरेदी करू शकता. तुम्ही होंडा कारच्या काही कार्सवर 45000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. या सूटमध्ये रोख डिस्काउंटपासून अॅक्सेसरीज ऑफर सामिल आहे. या ऑफर्स 31 डिसेंबरपर्यंत आहेत. Honda Jazz Price - होंडा कंपनी न्यू होंडा Jazz वर 35,147 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. यात 10000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा 12,147 रुपयांपर्यंत अॅक्सेसरीज घेता येतील. त्याशिवाय 5000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंटही घेता येईल. कंपनी आपल्या ग्राहकांना 5000 रुपयांचा होंडा कस्टमर लॉयल्टी बोनस देत आहे. होंडा कार एक्सचेंज नव्या कार खरेदीवर 4000 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंटही घेता येईल.

ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG; नेमकी कशी चालते नितीन गडकरींची ही खास कार

Honda WR-V Price - Honda WR-V वर 28000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. या सूटमध्ये 9,000 रुपये ऐक्सचेंज बोनस, 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट, 5,000 रुपये लॉयल्टी बोनस आणि 10,000 रुपयांचा ऐक्सचेंज डिस्काउंट देण्यात आला आहे. Honda WR-V कारवर कोणतीही रोख सूट दिली जात नाही.

नकली हेल्मेट, प्रेशर कुकर विकणाऱ्यांविरोधात सरकारचं मोठं पाऊल

Honda Amaze Price - होंडा कारच्या सेडान न्यू होंडा Amaze वर तुम्ही महिन्याच्या शेवटी 15000 रुपयांचा एक्स्ट्रा बेनिफिट घेऊ शकता. होंडा कस्टमर लॉयल्टी बोनस म्हणून 5,000 रुपये, होंडा कार एक्सचेंज बोनस 6000 रुपये आणि 4000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट ऑफर केला जात आहे. Honda City Price - होंडाची अतिशय पॉप्युलर सेडान ऑल न्यू होंडा सिटीवर 45,108 रुपयांची ऑफर दिली जात आहे. Honda City कार एक्सचेंजवर 30 हजार रुपयांचा फायदा मिळेल. यात 7500 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा 8108 रुपयांपर्यंत अॅक्सेसरीज, 15,000 रुपयांपर्यंत कार एक्सचेंजवर डिस्काउंट, 5000 रुपये होंडा कस्टमर लॉयल्टी बोनस, 9000 रुपये होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळतो आहे.

30 रुपयांत 185 किमी! इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने तयार केली इलेक्ट्रिक कार

होंडाच्या सेडान 4th जेनरेशन कारवरही 22 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यात कस्टमर लॉयल्टी बोनस 5000 रुपये, होंडा कार एक्सचेंज बोनस 9,000 रुपये आणि 8000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात