मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /30 रुपयांत 185 किमी! इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने तयार केली इलेक्ट्रिक कार

30 रुपयांत 185 किमी! इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने तयार केली इलेक्ट्रिक कार

अवघ्या 30 रुपयांमध्ये 185 किलोमीटर्स धावणारी इलेक्ट्रिक कार बनवली असून, यासाठी फक्त 2 लाख रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे, या 5 सीटर कारचा लूक व्हिंटेज जीपसारखा (Vintage jeep) आहे.

अवघ्या 30 रुपयांमध्ये 185 किलोमीटर्स धावणारी इलेक्ट्रिक कार बनवली असून, यासाठी फक्त 2 लाख रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे, या 5 सीटर कारचा लूक व्हिंटेज जीपसारखा (Vintage jeep) आहे.

अवघ्या 30 रुपयांमध्ये 185 किलोमीटर्स धावणारी इलेक्ट्रिक कार बनवली असून, यासाठी फक्त 2 लाख रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे, या 5 सीटर कारचा लूक व्हिंटेज जीपसारखा (Vintage jeep) आहे.

    मुंबई, 04 डिसेंबर : सध्या जगभरात पर्यावरणासाठी (Enviroment) घातक ठरणारं वायू प्रदूषण (Air Pollution) टाळण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या वाहनांपेक्षा विजेवर चालणाऱ्या वाहनांना (Electric Vehicles) प्रोत्साहन दिलं जात आहे. आपल्या देशातही अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात असून, अनेक वाहन उत्पादक कंपन्याही (OEM) इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) निर्मिती करत आहेत. त्यांच्या किमती कमी करता याव्यात, त्यांचा वापर अधिकाधिक सहज व्हावा यासाठी संशोधन सुरू असून, सरकारी पातळीवर, तसंच वाहन कंपन्यांच्या स्तरावर देखील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना (Engineering Student) नावीन्यपूर्ण वाहननिर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. यासाठी अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. या पार्श्वभूमीवर सध्या चर्चा आहे ती मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याने तयार केलेल्या अनोख्या इलेक्ट्रिक कारची.

    मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातल्या (Sagar) मकरोनिया इथला (Macronia) रहिवासी असलेला आणि सध्या गांधीनगर इथं इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या हिमांशू भाई पटेल (Himanshu Bhai Patel) या विद्यार्थ्याने अवघ्या 30 रुपयांमध्ये 185 किलोमीटर्स धावणारी इलेक्ट्रिक कार बनवली असून, यासाठी फक्त 2 लाख रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे, या 5 सीटर कारचा लूक व्हिंटेज जीपसारखा (Vintage jeep) आहे. त्यामुळे ती दिसतेही अत्यंत आकर्षक त्याचबरोबर आधुनिक कारमध्ये असणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा त्या कारमध्ये आहेत. तिची बॅटरी (Battery) सुमारे 4 तासांत पूर्ण चार्ज होते.

    बँकेची कागदपत्र बाहेर काढली तर महागात पडेल, नवाब मलिकांचा दरेकरांना थेट इशारा

    एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड वाढत आहेत, तर दुसरीकडे पर्यावरणाचंही प्रचंड नुकसान होत आहे, याचा विचार करून ही इलेक्ट्रिक कार बनवण्यात आली असल्याचं हिमांशू पटेल यानं सांगितलं. ही कार धावेल त्याबरोबरच तिची बॅटरी चार्ज होईल. एकदा चार्ज केल्यानंतर ती 185 किलोमीटर्स धावेल. त्यासाठी फक्त 30 रुपये खर्च येईल. ही कार आधुनिक वाहनांसारखी बनवण्यात आली असून इतर वाहनांप्रमाणे ही कारही रिमोटने (Remote) चालते. त्याचा स्पीडोमीटर गती, तसंच बॅटरी पॉवर दाखवतो. ही कार 1 तासात 50 किलोमीटर अंतर कापते. यात रिव्हर्स मोडसाठी (Reverse Mode) वेगळं बटण आहे. तसंच गाडी चोरीला जाऊ नये म्हणून अलार्मही (Alarm) बसवण्यात आला आहे. याशिवाय त्यामध्ये एमसीबी बॉक्सचीही (MCB Box) व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून कोणताही बिघाड लगेच लक्षात येईल.

    अरे वाह! आता सुरु करा स्वतःचा बिझिनेस; असं सुरु करा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

    या कारमध्ये सीटखाली बॅटरी बसवण्यात आली असून, बॉनेटखाली स्टेपनी बसवली आहे. इतर कोणत्याही कारप्रमाणे, समोरचे आरसे फोल्ड होणारे आहेत. ते उघडले आणि बंद केले जाऊ शकतात, असंही हिमांशू पटेल यानं सांगितलं. सध्या सर्वत्र या कारची चर्चा असून या कारचा फॉर्म्युला ऑटोमोबाइल कंपन्यांना (Automobile Companies) आवडला तर इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेला (EV Market) नवी दिशा मिळेल, असं मानलं जात आहे. हिमांशू पटेल याचं या अनोख्या कारच्या निर्मितीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

    First published:
    top videos