मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

नवी कार घेताय? Car loan घेताना आवश्यक आहेत हे पात्रता निकष आणि कागदपत्रं

नवी कार घेताय? Car loan घेताना आवश्यक आहेत हे पात्रता निकष आणि कागदपत्रं

नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळतं, तसंच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. त्यासाठी कागदपत्रं आणि निकष सारखेच असतात. जाणून घ्या काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रं...

नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळतं, तसंच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. त्यासाठी कागदपत्रं आणि निकष सारखेच असतात. जाणून घ्या काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रं...

नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळतं, तसंच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. त्यासाठी कागदपत्रं आणि निकष सारखेच असतात. जाणून घ्या काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रं...

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकांना आपली स्वत:ची कार (Car) घेण्याची इच्छा असते. काही स्वतःच्या वापरासाठी कार घेतात, तर काही लोक व्यवसाय करण्यासाठी वाहनं खरेदी करतात. स्वतःसाठी, कुटुंबासाठी घेतल्या जाणाऱ्या वाहनांना पॅसेंजर व्हेईकल्स (Passenger Vehicle) म्हटलं जातं. यामध्ये हॅचबॅक, सेदान, एसयूव्ही अशा अनेक प्रकारच्या कार्स उपलब्ध असतात. आकार, सुविधा यानुसार या कार्सची किंमत वाढत जाते. छोट्या कार्सची किंमत चार ते पाच लाखांपासून सुरू होते, तर त्याहून मोठ्या कार्सची किंमत पाच, सहा लाखांपासून पुढे असते. अलिशान कार्सची किंमत, तर काही लाखांपासून कोटींपर्यंत असते. त्यामुळे आपली आवडती कार घेण्यासाठी बहुतांश लोकांना कर्ज घेण्याची गरज भासते. त्याकरता बँक किंवा वित्तीय संस्थाची मदत घेतली जाते.

कार घेण्यासाठी कर्ज मिळण्यासाठी आपण बँक (Bank) किंवा वित्तीय संस्थेकडे (Financial Institution)अर्ज केल्यास कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँक किंवा वित्तीय संस्था कर्जदाराची काही पात्रता निकषांनुसार (Eligibility Criteria) पडताळणी करतात. ते सर्व निकष कर्जदार पूर्ण करत असेल तरच कर्ज मंजूर केलं जातं. तसंच कर्ज मिळण्यासाठी काही कागदपत्रंही (Documents)आवश्यक असतात. नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळतं, तसंच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. त्यासाठी कागदपत्रं आणि निकष सारखेच असतात. जाणून घ्या काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रं...

पात्रता निकष -

वाहन कर्ज मिळण्यासाठी 18 ते 75 वर्षे वयाची व्यक्ती अर्ज करू शकते. त्या व्यक्तीचे किमान मासिक उत्पन्न (Monthly Income) 20 हजार रुपये असणं आवश्यक आहे. ती व्यक्ती जिथे नोकरी करत असेल, तिथे गेल्या एका वर्षापासून काम करत असल्याचं प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. कर्ज मिळण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती सरकारी किंवा खासगी कंपनीत नोकरी करणारी किंवा व्यावसायिक असणं आवश्यक आहे.

हे सर्व निकष पूर्ण होत असतील तरच बँक किंवा वित्तीय संस्था वाहन कर्ज मंजूर करतात. हे निकष सिद्ध करणारी काही कागदपत्रं देणंही अनिवार्य असतं. या कागदपत्रांमध्ये वैध ओळखपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, प्रमाणपत्र आदींचा समावेश असतो.

Savings Vs Current | सेव्हिंग अकाउंट की करंट अकाउंट तुमच्या फायद्याचं कोणतं?

आवश्यक कागदपत्रे -

ओळखीचा पुरावा देण्यासाठी (Indentity Proof) आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी एक ओळखपत्र असणं आवश्यक असतं.

पत्त्याचा पुरावा (Address Proof) देण्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड, वीज, पाणी, दुरध्वनी यांची बिलं यापैकी एक कागदपत्र असणं महत्त्वाचं आहे.

यासह उत्पन्नाचा पुरावा देणंही आवश्यक आहे. याकरता फॉर्म 16, नोकरदार असल्यास मासिक उत्पन्नाची स्लिप, इन्कमटॅक्स रिटर्न (Income Tax Return)आणि गेल्या सहा महिन्यांचं बँक स्टेटमेंट (Bank Statements)ही कागदपत्रं देणं आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे वरील कागदपत्रंच सगळीकडे ग्राह्य धरली जातात आणि त्याचीच मागणी केली जाते. तरीही प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या कागदपत्रांचीही गरज भासू शकते. कर्जदाराच्या स्थितीनुसारही कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

घराचं स्वप्नं साकारण्यासाठी होम लोन हवंय; कोणती बँक देते सर्वात स्वस्त गृहकर्ज?

बँक किंवा वित्तीय संस्था गेल्या तीन किंवा सहा महिन्यांची पेमेंट स्लिप, दोन वर्षांचं इन्कमटॅक्स रिटर्न्स मागवते, कारण त्या आधारे कर्जदाराची कर्ज परतफेडीची क्षमता तपासली जाते. आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट याद्वारे कर्जदाराचं नागरिकत्व, ओळख आणि कायमचा पत्ता याची खात्री पटवली जाते. पॅनकार्डचा उपयोग कर्जदाराने आधी काही कर्ज घेतलं आहे का? याची खात्री घेण्यासाठीही केला जातो.

त्याचप्रमाणे कारचं डीलरकडे बुकिंग झाल्यानंतर पावत्याही द्याव्या लागतात. जेणेकरून बँक कर्जाची रक्कम आणि कारची किंमत याची पडताळणी करते. कार इश्युरन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स हेदेखील तपासलं जातं. त्या आधारे सर्व कायदेशीर बाबींचं पालन केलं गेलं असल्याची खात्री केली जाते.

Special Story: कोणत्या बँकेचं Education Loan तुमच्यासाठी सर्वांत योग्य? वाचा

आजकाल वाहन कर्ज मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि जलद झाली आहे. कार डीलर्स किंवा कार उत्पादक कंपन्यांनी बँका किंवा वित्तीय संस्थांशी सहकार्य करार केलेला असतो. त्यामुळे ग्राहक डीलरकडे कार खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा त्याला कर्ज घ्यायचं असल्यास तिथेच त्याला कर्ज सुविधा पुरवल्या जातात. आवश्यक कागदपत्रं दिल्यानंतर अत्यंत जलदगतीने कर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

अनेकदा कर्ज प्रक्रिया शुल्क माफीची सवलतही दिलेली असते किंवा अन्य काही फायदे दिलेले असतात. त्याचा लाभही ग्राहकांना मिळतो. ग्राहकाने त्याला आवडलेली जी कार बुक केली आहे, तिच्या ऑन रोड किमतीच्या 80 ते 90 टक्के रक्कम कर्जाऊ मिळते. त्यामुळे अनेकांचं महागडी कार घेण्याचं स्वप्नही सहजपणे पूर्ण होतं. फक्त आवश्यक तेवढं डाउन पेमेंट केलं, की ग्राहक आपली आवडती कार घरी घेऊन येऊ शकतो.

First published:

Tags: Car, Loan