मराठी बातम्या /बातम्या /real-estate /घराचं स्वप्नं प्रत्यक्षात साकारण्यासाठी HOME LOAN हवंय; कोणती बँक देते सर्वात स्वस्त गृहकर्ज?

घराचं स्वप्नं प्रत्यक्षात साकारण्यासाठी HOME LOAN हवंय; कोणती बँक देते सर्वात स्वस्त गृहकर्ज?

कोणत्याही प्रकारच्या गृह कर्जासाठी व्याज दर (Home loan interest rate) हा महत्त्वाचा घटक असतो. तो तुमच्या घर खरेदीच्या एकूण खर्चावर परिणाम करू शकतो.

कोणत्याही प्रकारच्या गृह कर्जासाठी व्याज दर (Home loan interest rate) हा महत्त्वाचा घटक असतो. तो तुमच्या घर खरेदीच्या एकूण खर्चावर परिणाम करू शकतो.

कोणत्याही प्रकारच्या गृह कर्जासाठी व्याज दर (Home loan interest rate) हा महत्त्वाचा घटक असतो. तो तुमच्या घर खरेदीच्या एकूण खर्चावर परिणाम करू शकतो.

मुंबई, 26 नोव्हेंबर : शहरी भागात स्वमालकीचं घर किंवा प्रॉपर्टी (Property) खरेदी करण्यासाठी गृहकर्ज म्हणजेच होम लोन (Home Loan) घेणं ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. आज अनेक खासगी, सरकारी बॅंका, तसंच वित्तसंस्था गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत (Home Loan tips) . वेगवेगळ्या उद्देशांसाठी विविध प्रकारचं गृहकर्ज वितरित करतात. यामध्ये नवीन घरासाठी कर्ज, पूर्व मंजूर गृह कर्ज, गृह खरेदी कर्ज, घर बांधण्यासाठी कर्ज, प्लॉटसाठी कर्ज, होम लोन टॉप अप, घर दुरुस्तीसाठी कर्ज, शिल्लक हस्तांतरण गृह कर्ज असे विविध प्रकार असतात.  घर खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमचं आर्थिक नियोजन, क्रेडिट स्कोअर आणि गृह कर्जासाठी वित्तसंस्थेची निवड करताना तज्ज्ञांचा सल्ला आणि संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे (Tips for home loan).

कोणत्याही प्रकारच्या गृह कर्जासाठी व्याज दर (Home loan interest rate) हा महत्त्वाचा घटक असतो. तो तुमच्या घर खरेदीच्या एकूण खर्चावर परिणाम करू शकतो. या पार्श्वभूमीवर गृह कर्जासाठी कोणत्या बॅंकेची ऑफर (Bank home loan Offer) चांगली आहे, असा प्रश्न नक्कीच पडतो. त्यामुळे प्रमुख बॅंकांच्या योजना, त्यांच्या गृह कर्जांची वैशिष्ट्यं, तसंच ऑफर्स यांविषयी जाणून घेऊया.

कोटक महिंद्रा बॅंक (Kotak Mahindra Bank) : गृह खरेदीसाठी कमी व्याजदर (Lowest Interest Rate) हे या बॅंकेचं वैशिष्ट्य म्हणता येईल. या बॅंकेच्या गृह कर्जासाठीचा व्याज दर 6.50 टक्क्यांपासून सुरू होतो. बॅंक कर्ज रकमेच्या 0.50 टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आकारते. 30 वर्षं कालावधीकरिता गृह कर्ज मिळू शकतं. प्री पेमेंटसाठी शुल्क आकारलं जात नाही.

स्टेट बॅंक ऑफ इंडिया ब्रिज होम लोन (SBI Bridge Home Loan) : अल्प मुदतीकरिता (Short term) गृह कर्ज हवं असल्यास एसबीआय ब्रिज होम लोन योजना फायदेशीर ठरते. या बॅंकेचा व्याज दर 9.50 टक्के प्रति वर्षापासून सुरू होतो. एकूण कर्ज रकमेवर 0.35 टक्के प्रक्रिया शुल्क आकारलं जातं. या योजनेंतर्गत 2 वर्षं कालावधीकरिता गृह कर्ज दिलं जातं. कोणतेही छुपे चार्जेस बॅंकेकडून आकारले जात नाहीत.

हे वाचा - Home Loan: होम लोनविषयी जाणून घ्या सर्वकाही, घर बांधण्यासाठीही मिळतं कर्ज?

आयसीआयसीआय बॅंक एक्स्ट्रा होम लोन (ICICI Bank Extra Home Loan) : ज्या ग्राहकांना दीर्घ मुदतीकरिता (Long term) गृहकर्ज हवं आहे, त्यांच्यासाठी आयसीआयसीआय बॅंकेची गृहकर्ज योजना उपयुक्त ठरू शकते. या योजनेंतर्गत किमान व्याजदर 6.90 टक्क्यांपासून सुरू होतो. 30 वर्षं कालावधीकरिता गृह कर्ज मिळू शकतं. एकूण कर्ज रकमेवर 0.5 टक्के इतकं कमी प्रक्रिया शुल्क आकारलं जातं. व्यावसायिक आणि नोकरदार अशा दोन्ही वर्गांना यातून गृहकर्ज मिळू शकतं.

कॅनरा बँक हाउसिंग लोन (Canara Bank Housing Loan) : ज्या महिला (Women) गृहकर्ज घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी कॅनरा बँक रास्त व्याज दरानं कर्ज उपलब्ध करून देते. महिलांसाठी गृह कर्जाकरिता किमान व्याज दर 6.90 टक्के आकारला जातो. कमाल 30 वर्षांकरिता गृहकर्ज मिळू शकतं. या कर्जाच्या माध्यमातून घरखरेदी किंवा घरबांधणीही करता येते.

एचडीएफसी रिच होम लोन्स फॉर सेल्फ एम्प्लॉइड प्रोफेशनल्स (HDFC Reach Home Loans for Self Employed Professionals) : जे व्यावसायिक नव्या घरासाठी गृह कर्ज घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी एचडीएफसीची ही योजना फायदेशीर ठरते. यात 8.75 टक्के दरानं कर्ज मिळू शकतं. कर्ज परतावा कालावधी 30 वर्षं आहे. एकूण कर्ज रकमेवर 2 टक्के प्रक्रिया शुल्क आकारलं जातं. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये आहे, त्यांनाही कर्ज दिलं जातं.

डीएचएफएल रिनोव्हेशन लोन (DHFL Renovation Loan) : ज्या ग्राहकांना घराचं नूतनीकरण करायचं आहे, त्यांच्यासाठी डीएचएफएल गृह कर्ज उपलब्ध करून देतं. यासाठी 8.75 टक्क्यांपासून व्याज दर सुरू होतो. या योजनेतून 10 वर्षं कालावधीकरिता कर्ज मिळतं. यासाठी 2500 रुपये प्रक्रिया शुल्क आकारलं जातं.

हे वाचा - घर घेण्यासाठी Home Loan घेताय? करसवलत मिळण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

पीएनबी एचएफएल प्लॉट लोन (PNB HFL Plot Loan) : ग्राहकास प्लॉट खरेदी करून घर बांधायचं असेल तर पीएनबी एचएफएल ही योजना उपयुक्त ठरू शकते. या योजनेत 7.20 टक्के व्याजदरापासून कर्ज मिळतं. या कर्जाचा कालावधी 30 वर्षापर्यंत असतो. खर्च वाढल्यास कर्जदेखील वाढवता येतं.

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लोन फॉर कन्स्ट्रक्शन (Indiabulls Housing Finance Loan For Construction) : एखाद्या ग्राहकाला घर बांधण्यासाठी गृहकर्ज हवं असेल तर ते इंडियाबुल्सच्या या योजनेतून मिळू शकतं. या योजनेत 8.65 टक्के व्याजदरापासून कर्ज मिळतं. कर्ज परताव्यासाठी लवचिक पर्याय मिळतात. सर्व कर्जप्रक्रिया ऑनलाइन होते.

अॅक्सिस बॅंक एनआरआय होम लोन (Axis Bank NRI Home Loan) : अनिवासी भारतीय ग्राहकांना घरखरेदीसाठी या योजनेतून कर्ज मिळू शकतं. यासाठी अॅक्सिस बॅंक 6.90 टक्क्यांपासून व्याज दर आकारते. 25 वर्षं कालावधीकरिता हे कर्ज मिळू शकतं. यासाठी नाममात्र प्रक्रिया शुल्क आकारलं जातं.

एलआयसी एचएफएल होम लोन फॉर पेन्शनर्स-सीनिअर सिटिझन्स (LIC HFL Home Loan For Pensioners - Senior Citizens) : एखादा सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक घरासाठी कर्ज घेऊ इच्छित असेल तर त्याला एलआयसी एचएफएलची ही योजना फायदेशीर ठरू शकते. या योजनेतून प्रति वर्ष 6.90 टक्क्यांपासून व्याजदर आकारणी केली जाते. या कर्जासाठी 15 वर्षं किंवा वयाच्या 70 वर्षांपर्यंत कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यासाठी 10 हजार ते 15 हजारांपर्यंत प्रक्रिया शुल्क आकारलं जातं.

हे वाचा - Home Loan घ्यायचा विचार करताय? आधी जाणून घ्या यासंबंधी महत्त्वाच्या बाबी

याव्यतिरिक्त एसबीआय, एचडीएफसी, युनियन बॅंक, आयआयएफएल स्वराज आदी बॅंका आणि वित्तसंस्थांकडून वेगवेगळ्या प्रकारचं गृहकर्ज उपलब्ध करून दिलं जातं. गृहकर्जाच्या योजनांविषयीची सविस्तर आणिताजी माहिती ग्राहक संबंधित बॅंक किंवा वित्तसंस्थेची वेबसाइट किंवा शाखेतून मिळवू शकतात.

First published:

Tags: Home Loan, Money, Real estate, बँक