जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / 30 हजार रुपयांत मिळतेय TVS Jupiter, 64KM मायलेजसह मिळतील जबरदस्त फीचर्स

30 हजार रुपयांत मिळतेय TVS Jupiter, 64KM मायलेजसह मिळतील जबरदस्त फीचर्स

30 हजार रुपयांत मिळतेय TVS Jupiter, 64KM मायलेजसह मिळतील जबरदस्त फीचर्स

TVS Jupiter केवळ 30 हजार रुपयांत खरेदी करता येईल. बाजारात सध्या या स्कूटरची किंमत 66,273 रुपयांपासून 76,573 रुपयांपर्यंत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : भारतातील टू-व्हिलर सेगमेंट अतिशय मोठं आहे. स्कूटरची सरासरी किंमत 50 हजार रुपयांहून अधिक आहे. परंतु एक अशी ऑफर आहे, ज्यात केवळ 30 हजार रुपयांत स्कूटर खरेदी करता येऊ शकते. या ऑफर अंतर्गत TVS Jupiter केवळ 30 हजार रुपयांत खरेदी करता येईल. बाजारात सध्या या स्कूटरची किंमत 66,273 रुपयांपासून 76,573 रुपयांपर्यंत आहे. या खास डीलमध्ये स्कूटर निम्म्या किंमतीत 30 हजार रुपयांत खरेदी करता येईल. ही स्कूटर सेकंड हँड बाइक डील करणारी वेबसाइट BIKES24 वर लिस्टेड आहे. TVS ची ही स्कूटर सिंगल सिलेंडर असून यात 110 cc इंजिन देण्यात आलं आहे. ही स्कूटर 7.88 पॉवर आणि 8.8 nm टॉर्क जनरेट करतं. त्याशिवाय यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. TVS Jupiter च्या ब्रेकिंग सिस्टमबाबत दिलेल्या माहितीनुसार, यात कंपनीकडून फ्रंट व्हिलमध्ये डिस्क ब्रेक आणि रियर व्हिलमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. टीव्हीएस ज्यूपिटर 64 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

केवळ 1.93 लाखात मिळतेय Hyundai ची ही Car, पाहा डिटेल्स

BIKES24 वर लिस्टेट माहितीनुसार, हे 2015 सालातील मॉडेल असून आतापर्यंत ते 43 हजार किलोमीटरपर्यंत चाललं आहे. ही टीव्हीएस ज्यूपिटर स्कूटर फर्स्ट ओनर आहे. दिल्लीच्या DL 08 आरटीओमध्ये स्कूटर रजिस्टर्ड आहे.

केवळ 23 हजार रुपयांत मिळतेय Honda Activa Scooter, चांगल्या मायलेजसह मिळतील जबरदस्त फीचर्स

कंपनी या स्कूटरच्या खरेदीवर एक वर्षाची वॉरंटी देत आहे. त्याशिवाय सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी प्लॅनही देत आहे. मनी बॅक गॅरंटी अर्थात स्कूटर खरेदी केल्यानंतर सात दिवसांत गाडी न आवडल्यास कंपनीत पुन्हा परत करता येऊ शकते. यासाठी काही नियम आणि अटी आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही सेकंड हँड स्कूटर खरेदी करताना आधी त्याची संपूर्ण माहिती तपासा, इतर अटी-नियम तपासून, त्यानंतरच पुढील डील करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात