नवी दिल्ली, 16 जून :'BMW Motorrad India'ने S 1000 R ही बाईक भारतात लाँच केली आहे. या बाईकचं स्टँडर्ड व्हर्जन 17.90 लाख रुपयांना असून, Pro M Sport version हे 22.50 लाख रुपयांना आहे. या दोन्ही एक्स-शोरूम किमती आहेत. या बाईल्स कम्प्लिटली बिल्ट युनिट (CBU) म्हणून उपलब्ध असतील. तसंच, BMW मोटररॅड इंडियाच्या सर्व डीलर्सकडे 15 जूनपासून त्या उपलब्ध झाल्या आहेत.
'BMW ग्रुप इंडिया'चे अध्यक्ष विक्रम पावा यांनी सांगितलं, 'BMW S 1000 R या बाईकची सेकंड जनरेशन पॉवर पॅक्ड रोडस्टर (Power packed roadster) म्हणून सादर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सुरक्षितता, सुप्रीम रायडिंग डायनॅमिक्स, अॅथलेटिक कॅरेक्टर ही या बाइकची वैशिष्ट्यं असून, नेहमीच्या वापरासाठीही उपयुक्त आहे. भारतातल्या हौशी बाईकस्वारांसाठी हा एक मास्टरपीस आहे.'
शार्प एजेस (sharp edges) आणि अॅक्सेंच्युएटेड बीड्स (accentuated beads) ही S 1000 R या बाईकची वैशिष्ट्यं आहेत. 'टेल अप - नोज डाउन' अशा प्रकारचा (Tail up nose down) लूक या बाईकला देण्यात आला असल्याने व्हिज्युअल इम्पॅक्ट उत्तम आहे. रिव्हर्सिबल हँडलबार क्लँप (reversible handlebar clamp), सीट हाइट अॅडजस्टमेंट यामुळे रायडिंग पोझिशन उत्तम प्रकारे साधता येते.
रेसिंग रेड नॉन मेटॅलिक (Racing Red non-metallic) या बेसिक रंगात ही मोटारबाईक उपलब्ध आहे. तसंच, स्टाईल स्पोर्ट आणि एम पॅकेज ऑप्शनमध्ये एम मोटरस्पोर्ट पेंट फिनिशेसही उपलब्ध आहेत. स्टाईल स्पोर्ट ऑप्शनमध्ये बेसिक रंग हॉकेनहेम सिल्व्हर मेटॅलिक असून, मॅट कॉपर मेटॅलिकसह रिअर फ्रेम सेक्शन, इंजिन साइड कव्हर्स आणि ग्रे अॅनोडाइज्ड कम्पोनंट्स उपलब्ध आहेत. एक्स्क्लुझिव्ह एम मोटरस्पोर्ट पेंट फिनिश एम पॅकेजसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यात बेस कलर लाइट व्हाइट नॉन-मेटॅलिक असून, लाइट ब्लू, डार्क ब्लू आणि रेड यांचं कॉम्बिनेशन आहे.
BMW S 1000 R या बाइकला नव्याने विकसित केलेलं वॉटर कूल्ड 4 सिलिंडर इन लाइन इंजिन (water-cooled 4-cylinder) असून, त्याची क्षमता 999 सीसी आहे. S 1000 RR वर हे इंजिन आधारित असून, स्पोर्टी परफॉर्मन्ससाठी (Sporty performance) मॉडिफाय केलेलं आहे. या बाईकचा जास्तीत जास्त आउटपुट 11,000 rpm ला 165 hp (121 kW) एवढा आहे. तसंच 9,250 rpm ला जास्तीत जास्त टॉर्क 114 Nm एवढा आहे. 0 ते ताशी 100 किलोमीटर हा वेग ही बाईक 3.2 सेकंदांमध्ये देऊ शकते. ताशी जास्तीत जास्त 250 किलोमीटरपर्यंतचा वेग आहे.
चौथा, पाचवा आणि सहावा या गिअर्सना लाँगर गिअर रेशो आहे. त्यामुळे आवाज कमी होतो, इंधन कमी लागतं आणि स्पीड जास्त राखता येतो. स्मूदर, सेल्फ रीइन्फोर्सिंग अँटी हॉपिंग क्लच (Anti hopping Clutch) हे या बाईकचं वैशिष्ट्य आहे. तसंच पहिल्यांदाच ऑप्शनल एक्स्ट्रा म्हणून या बाईकला इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल ही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे पाठीमागचं चाक घसरण्यापासून रोखलं जातं.
आधीच्या मॉडेलच्या तुलनेत BMW S 1000 R मधील न्यूली इंजिनीअर्ड सस्पेन्शनमुळे वजन कमी झालं आहे. यामध्ये फ्लेक्स फ्रेमचा समावेश आहे. त्यामुळे मोटारसायकलच्या एअरोडायनॅमिक्समध्ये (aerodynamics) सुधारणा होते आणि वजन कमी राखायला मदत होते. नव्या सस्पेन्शन जॉमेट्रीमुळे राइडचा काटेकोरपणा आणि मागच्या चाकाची मेकॅनिकल ग्रिप (Mechanical Grip) सुधारते.
BMW S 1000 R या बाईकला चार मोड्स आहेत. रेन, रोड, डायनॅमिक आणि डायनॅमिक प्रो. बाईक चालवणाऱ्याची स्वतःची कौशल्य पातळी आणि चालवण्याची पद्धत यानुसार मोड सिलेक्ट करून त्यात इंजिन थ्रॉटल, इंजिन ब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हिली कंट्रोल, एबीएस, एबीएस प्रो आदींवर नियंत्रण ठेवता येतं. डायनॅमिक प्रो हा फुल्ली कॉन्फिगरेबल मोड आहे. 'रायडिंग मोड्स प्रो' ऑप्शनमध्ये इंजिन ब्रेक फंक्शन, इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल, पॉवर व्हिली फंक्शन्स आहेत. डायनॅमिक ब्रेक कंट्रोलमुळे इमर्जन्सी ब्रेकिंगच्या वेळी रायडरला सपोर्ट मिळतो.
BMW S 1000 R ला 6.5 इंची टीएफटी डिस्प्ले अर्थात मल्टिफंक्शनल इंस्ट्रुमेंट पॅनेल आहे. त्यावर महत्त्वाची माहिती दर्शवली जाते. या बाईकला बीएमडब्ल्यू मोटररॅड कनेक्टिव्हिटी अॅपही जोडलेलं आहे. त्याद्वारे प्रॅक्टिकल अॅरो नॅव्हिगेशन, रूट इम्पोर्ट, मल्टिपल वेपॉइंट गाईडन्स गोष्टी डिस्प्लेवर दिसू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike riding