मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

आता टाटा समूह बनवणार मेड इन इंडिया आयफोन; Appleचा चीनपेक्षा भारतावर जास्त विश्वास!

आता टाटा समूह बनवणार मेड इन इंडिया आयफोन; Appleचा चीनपेक्षा भारतावर जास्त विश्वास!

भारत हा स्मार्टफोनसाठी सर्वात मोठी बाजरपेठ बनला आहे. त्यामुळे टेक कंपन्या देखील भारताकडे आकर्षित होत आहेत. याच कारणामुळे अनेक टेक कंपन्यां चीनपेक्षा भारताला आधिक पसंती देत आहेत.

भारत हा स्मार्टफोनसाठी सर्वात मोठी बाजरपेठ बनला आहे. त्यामुळे टेक कंपन्या देखील भारताकडे आकर्षित होत आहेत. याच कारणामुळे अनेक टेक कंपन्यां चीनपेक्षा भारताला आधिक पसंती देत आहेत.

भारत हा स्मार्टफोनसाठी सर्वात मोठी बाजरपेठ बनला आहे. त्यामुळे टेक कंपन्या देखील भारताकडे आकर्षित होत आहेत. याच कारणामुळे अनेक टेक कंपन्यां चीनपेक्षा भारताला आधिक पसंती देत आहेत.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 22 सप्टेंबर : जगभरातील दिग्गज टेक कंपन्या आता भारताकडे आकर्षित होत आहे. आयफोन निर्माता कंपनी अॅप्पल देखील याला अपवाद नाही. भारतात स्मार्टफोनची मागणी वाढल्याने आता अ‍ॅप्पल लवकरच भारतात देखील आयफोन बनवणार आहे. यासाठी टाटा ग्रुपने प्रयत्न सुरु केले असून भारतात आयफोन बनवणारी कंपनी विस्त्रो कॉर्पशी (Wistron Corp) टाटा ग्रुपने चर्चा सुरू केली आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार हा करार यशस्वी झाल्यास टाटा ग्रुप ही आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी असू शकते. देशात सध्या स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. युवा वर्गात या स्मार्टफोनबाबात प्रचंड आकर्षण आहे. तसेच जागतीक पातळीवर विचार केल्यास भारत हा स्मार्टफोनसाठी सर्वात मोठी बाजरपेठ बनला आहे.

Facebook वापरताना 'या' चूका पडतील महागात, तुम्हाला देखील अशा सवयी असतील, तर त्या आताच बदला

टेक कंपन्या देखील भारताकडे आकर्षित होत आहेत. याच कारणामुळे अनेक टेक कंपन्यां चीनपेक्षा भारताला आधिक पसंती देत आहेत. यात आता टाटा ग्रुपच्या माध्यमातून अ‍ॅप्पल देखील देशात एंट्री करत आहे. त्यामुळे भारतीय यूजर्संना आता मेड इन इंडिया आयफोन उपलब्ध होणार आहे. अॅप्पलची चीनपेक्षा भारताला पसंती महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी चीनमध्ये काही ठिकाणी अजूनही कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे टेक कंपन्यांना व्यवसाय करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. चीनमधील या त्रासाला कंटाळून अॅप्पल कंपनी चीनमधून आपले यूनिट शिप्ट करण्याच्या तयारीत आहे. भारतातील बाजारपेठ पाहाता आणि आयफोन बनवण्यासाठी लागणारी कॉस्टचा विचार करून अॅप्पलने भारताला प्राधान्य दिले आहे. अ‍ॅप्पल तीन लाख यूनिट शिप्ट करणार अॅप्पल चीनमधून जवळपास 3 लाख 70 हजार यूनी भारतात शिफ्ट करण्याचा विचारात आहे. या यूनिटची संख्या आणखी वाढून 2022 मध्ये 5 लाख 70 हजार देखील होण्याची शक्यता आहे. तसेच यासाठी लागणारी मॅनिफॅक्चरिंग कॉस्ट देखील चीनच्या तुलनेत भारतात कमी आहे. त्यामुळे कंपनी भारतात आपले यूनिट सुरु करणार आहे. स्मार्टफोन कॅमेरा मोजणार रक्तातली ऑक्सिजन पातळी; मिळणार लाखोंना जीवदान 2025 पर्यंत भारतात 25 टक्के प्रोडक्शन रिपोर्टनुसार भारतात अ‍ॅप्पलचे प्रोडक्शन सुरु झालाल्यानतंर पुढील तीन वर्षात जवळपास 25 टक्के प्रोडक्ट्स भारतात तयार करण्यात येणार आहे. याचाच अर्थ असा की 2025 नंतर प्रत्येक चार आयफोनपैकी एक आयफोन हा मेड इन इंडिया असेल. ॲपलने आपल्या व्यवसाय चीनमधून भारतात शिफ्ट करावा यासाठी भारत सरकार देखील प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे.
First published:

Tags: Lifestyle, Techonology

पुढील बातम्या