नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : बजाज कंपनीच्या 220 F या स्पोर्ट्स बाइकला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेकांमध्ये या बाइकची क्रेझ होती. परंतु आता मीडिया रिपोर्टनुसार कंपनी ही बाइक (Bajaj 220 F popular bike discontinued) बंद करण्याच्या तयारीत आहे. कारण काही काही दिवसांपूर्वी बजाजने 250 N आणि 250 F या दोन बाइक लॉन्च केल्या होत्या. त्यामुळे कदाचित आता 220 F बाइकला बंद करण्याचा निर्णय बजाजने घेतला असावा असं बोललं जात आहे. बजाजच्या पल्सर (pulsar 250 review) 250 या बाइकची किंमत 1.38 लाख, तर 250F ची 1.40 लाख इतकी आहे.
काय आहेत फीचर्स?
बजाजच्या नव्या पल्सर 250 या बाइकमध्ये फॅमिली आणि फुल LED हेडलँप, DRL, प्रोजेक्टर हेडलँप, LED इंडीकेटर, Split Taillights, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मस्कुलर फ्यूल टँक आणि स्प्लिट सीट सेटअपसारखे आकर्षक फीचर्स देण्यात (Bajaj pulsar NS 250 new model 2021) आले आहेत.
त्याचबरोबर यात सिग्नेचर पल्सर स्टाइलसह आधुनिक Elements चा ही समावेश आहे. या बाईकमध्ये F 250 आणि N 250 असे दोन प्रकार आहेत. पल्सर N250 Naked Standard Model मध्ये, तर पल्सर F 250 Quarter Liter Motorcycle च्या स्वरूपात असणार असेल. बजाज कंपनीची पल्सर 250 जगातील सर्वात शक्तिशाली पल्सर बाईक असणार आहे. कारण त्यात लिक्विड-कूल्ड इंजिन (24.5 PS) आणि 5 Speed Gearbox Transmission ची सुविधा असणार आहे.
त्याचबरोबर 300 MM चे डिस्क ब्रेक आणि 230 MM Rear Disc असेल. बजाजने पल्सर 250 शिवाय 250 F च्या अपडेटेड व्हर्जनलाही लॉन्च केलं आहे. त्यामुळे आता इतर कंपन्यांच्या स्पोर्ट्स बाइकसाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Auto expo, Tech news, Technology